प्रित तुझी माझी.
©® सौ.अंजली माधव देशपांडे.नाशिक.
दिनेश थोरात छोट्या कंपनीचा मालक.घरात
तो व घरातील सर्व काम करणारा रघु. रघु अतिशय विश्वासु माणुस.दिनेश कोणीच नातेवाईक
नव्हते.त्या मुळे प्रेम त्याला कधी मिळाले नाही.माया प्रेम करणारे कोणी नसल्या
मुळे त्याचा स्वभाव रूक्ष झाला होता.दिनेश वेळ पाळण्याच्या बाबतीत फार कडक आणि
शिस्तप्रिय होता.त्याला सर्व वेळेवर लागायचे.जरा उन्नीस बीस झाले तरी चालायचे
नाही.कंपनीत पण कामगारांना जरा जरी उशीर झाला तरी त्याला चालायचे नाही.रघु पण
त्याच्या सर्व वेळा पाळायचा.तो लग्नाच्या विरुध्द होता.रघुनी जर लग्नाचा विषय
काढला कि तो टाळायचा.त्याच एकच वाक्य शिस्त म्हणजे शिस्त.त्यात चालढकल केलेली
त्याला चालायची नाही.
असे
असुनही त्याला मित्रपरिवार होता.राजेश जोशी हा मित्र खास त्याच्या
मर्जीतला.राजेशची बायको सरीता पण फार चांगली होती.एके दिवशी एका मित्राच्या
लग्नाच्या पार्टीचे त्याला आमंत्रण आले.लगेच राजेशचा पण फोन आला कि `` दिनेश,तू
उद्या पार्टीला येतोय ना?``दिनेशने नकार दिला.तरी सुध्दा राजेशने त्याला
जबरदस्तीने पार्टीत नेले.पार्टीत गेल्यावर सर्वांचे ड्रिंक घेणे सुरू झाले.दिनेशला
कुठलेच व्यसन नव्हते.त्याने आपल्या करीता कोकाकोला मागवला.वेटर सर्वांचे ग्लास
भरुन आणु लागला.मित्रांना वाटले दिनेशची थोडी चेष्टा करावी म्हणुन त्यांनी
दिनेशच्या कोकाकोला मध्ये बर्यापैकी दारु मिसळली.व तो ग्लास दिनेशला आणुन
दिला.कारण मित्रांनी ठरवलेच होते कि दिनेशला एकदा तरी दारु पाजायचीच.दिनेशने आपला
ग्लास तोंडाला लावला व रिकामा केला.
थोड्या
वेळाने दारुने आपला रंग दाखवायला सुरुवात केली.कारण त्याला माहीतच नव्हते कि
कोकाकोला च्या ग्लासात बर्यापैकी आपल्या मित्रांनी दारु मिसळली आहे.
दारुच्या अमलाखाली आल्यावर दिनेश
वाट्टेल ते बरळु लागला.आता राजेशला वाटले याने अजुन काही घोळ घालायला नको.त्या
आधीच याला त्याच्या घरी पोचवलेले बरे.राजेशने सरिताला सांगितले`` तू,मैत्रिणींन
बरोबर घरी जा.मी दिनेशला त्याच्या घरी सोडुन येतो.`` कारण सरिताला पण कळले होते कि
सर्व मित्रांनी दिनेशला दारु पाजली आहे.ती ``बर``म्हणाली.
राजेश दिनेशला घेऊन त्याला त्याच्या घरी सोडवण्यासाठी कारने निघाला.पण
त्याला आठवले कि आपल्याला संध्याकाळी रोहीतच्या बहिणीच्या लग्नाला पण जायचे
आहे.रोहित हा राजेशचाच मित्र होता.तो मद्रासी होता.त्याचे पूर्ण नाव रोहित शेट्टी
असे होते.त्याची बहिण प्रेमा.रोहितला बर्या पैकी हिंदी बोलता येत होते.पण
प्रेमाला फक्त मद्रासीच बोलता यायचे.राजेशला वाटले लग्नाचा हाॅल आपल्या जायच्या
रस्तावरच आहे.तर दिनेश गाडीत बसेल व आपण रोहितला भेटुन लगेच निघुन येऊ.लग्नाच्या
मांडवापुढे राजेशने गाडी थांबवली.आणि दिनेशला म्हणाला`` तू,गाडीतच थांब.मी माझा
मित्र रोहितला भेटुन लगेच येतो.आज त्याच्या बहिणीचे लग्न आहे.असे म्हणुन राजेश
रोहितलि भेटायला मांडवात निघुन गेला,गाडीत दिनेश अजुन नशेतच होता.
रोहितने त्याला गाडीतच थांबायला सांगितले असुनही नशेच्या अवस्थेतच दिनेश
गाडीतन ऊतरुन मांडवाकडे निघाला.इकडे लग्नात वरपक्षाकडुन काहीतरी अवाजवी मागण्या
व्हायल्या लागल्या.व त्यातुन बरीच बोलाचाली होऊन लग्न मोडले.व वरपक्षाकडील लोक
मंडप सोडुन लग्न न करता निघुन गेले.
या रितीने लग्न मोडल्यामुळे रोहित खुप दु:खी झाला.आता आपल्या बहिणीशी कोण
लग्न करणार या काळजीने त्याला ग्रासले.मांडवातले सर्व चिंतातुर असतांना तिथे दिनेश
आला.व म्हणाला``मी करतो प्रेमाशी लग्न.कारण त्याने थोडेबहुत ऐकले होते.पण पूर्ण
काही कळत नव्हते.प्रेमाचे लग्न मोडले आहे.हे त्याला कळले होते.पण आपण काय गाढवपणा
करत आहोत याचे फारसे भान त्याला नव्हते.राजेशने त्याला खुप समजावले.कि ``तू,हे काय
करत आहेस.चल पाहु इथुन.`` पण दिनेश तिथुन हलायला तयार नव्हता.
तो हट्टालाच पेटला कि
मी प्रेमाशी लग्न करणार. शेवटी दिनेशचे प्रेमाशी लग्न झाले.राजेश दोघांना घेऊन
दिनेशच्या घरी आला.या गडबडीत खूप रात्र झाली होती.त्यामुळे रघु आपल्या खोलीत झोपला
होता.त्याला हा प्रकार काहीच माहित नव्हता.दिनेशने आपल्या जवळच्या किल्लीने लॅच
ऊघडले.व सर्व जण घरात आले.यांना घरी पोचवुन राजेश आपल्या घरी निघुन गेला.हा सर्व
प्रकार दिनेश दारुच्या अमलाखाली असतांना झाला.कारण आपण काय करत आहोत हेच त्याला
कळले नाही.कधी न दारु घेणारा त्याला एक ग्लास पुरे झाला.
त्या आवेशात लग्नकरुन प्रेमाला घरी आणले.सकाळी ६ वाजता नेहमी प्रमाणे रघु
दिनेश ऊठवायला गेला व त्याच्या बेडरुमच्या दारावर टकटक केले.त्या आवाजाने दिनेश
जागा झाला.
ऊठल्यावर त्याने पाहिले कि आपल्या पलंगावर आपल्या शेजारी एक बाई झोपलेली
आहे.त्याची जी थोडी बहुत नशा होती ती खाडकन ऊतरली.त्याला कळेना ही बाई कोण आहे.आणि
हि माझ्या पलंगावर कशी.त्याने थोडा आठवायचा प्रयत्न केला.आणि त्याला लक्षात आले की
आपल दारुच्या नशेत हा गाढवपणा केलेला आहे.तीच्या गळ्यातल मंगळसुत्र बघुन याला
खात्रीझाली कि नक्कीच आपल रात्री हिच्याशी लग्न केलेले आहे.आता काय करायचे.गाढवपणा
तर करुन बसलो.
रघु
सारखा दार वाजवत होता.पटकन दिनेशने दार ऊघडले.रघु आत ट्रे ठेवायला जाऊ लागला
तेवढ्यात रघुने त्याला थांबवले.आणि म्हणाला``रघु,मी काल रात्री लग्न केले.``
हे ऐकुन रघुला धक्काच बसला.तो
म्हणाला`` काय,तुम्हीं खरच लग्न केले.मग वहिनी कुठे आहे.`` दिनेश म्हणाला माझ्या
खोलीत.`` व दिनेश स्व:हा चहाचा ट्रे घेऊन आत गेला.व दार लाऊन घेतले.प्रेमा
झोपलेलीच होती.दिनेश या प्रकाराने फार गोंधळलेला होता.कि आपण हे काय करुन
बसलो.बराच वेळ असाच गेला.थोड्या वेळाने प्रेमा जागी झाली.आजुबाजुला बघायला लागली.व
खाडकन ऊठुन बसली.
इकडे रघु मनात विचार करु लागला कि लग्न
या नावानेपण साहेब चिडायचे.आणि आता चक्क लग्न करुन आले आणि ते पण मला न सांगता.
प्रेमा ऊठुन बसली.दिनेशला कळेना तिच्याशी काय बोलावे.तो तिला मराठीतून
सांगायला लागला`` कि हे बघ प्रेमा मला काल रात्री माझ्या मित्रांनी माझ्या
कोकाकोलाच्या ग्लासात माझी चेष्टाकरावी म्हणुन दारु मिसळली.मी कधीच दारु पीत
नाही.आणि तो दारु मला चढली व दारुच्या अमलाखाली असल्यामुळे माझ्याकडुन खुप मोठी
चुक झाली.मी तुझ्याशी लग्न करुन बसलो.पण तूझी इच्छा असेल तर मी घटस्फोट द्यायला
तयार आहे.असे ही मला लग्न करायचे नव्हते. पण अनवधानाने माझाकडुन हे कृत्य घडले.``
तिला यातल काहीच कळल नाही.कारण तिला मराठी,व हिंदी दोन्हीही भाषा येत
नव्हत्या.त्यामुळे ती मद्रासी भाषेत हावभाव करुन बोलायला लागली.दोघांची आपआपल्या
भाषेत जुगलबंदी सुरु झाली.त्याला वाटायला लागले की कुठुन हि बला गळ्यात बांधुन
घेतली.या पासुन आता सुटका कशी करावी. तिच्या हावभावावरुन त्याला असे लक्षात आले कि
तिला घटस्फोट नको आहे.
दुसर्या
दिवशी राजेश व त्याची बायको सरिता प्रेमाला भेटायला दिनेशकडे आले.सरिताला कळले
होते कि दिनेशने लग्न केले आहे.दिनेशला मित्रांनवर खुप राग आला होता.कि यांनी मला
दारु पाजुन माझा घात केला.प्रेमाला तो बायको मानायला तयार नव्हता.असेच हळुहळु दिवस
पसार होऊ लागले.आता प्रेमाने पण थोडेबहुत मराठी शिकुन घेतले.प्रेमाच्या सानिध्यात
राहुन दिनेशचा स्वभावपण बदलायला लागला.त्याला तिच्यामुळे प्रितीची ओळखपटायला
लागली.हळुहळु त्याचा मनात प्रितीचे अंकुर फुटायला लागला.त्याचा रुक्ष स्वभाव
बदलायला लागला.आता त्याला प्रेमा आवडायला लागली.प्रेमाने त्याला प्रेमानेच जिंकुन
घेतले.आता तो सर्वांन मध्ये हसत खेळत मिळुन मिसळुन वागायला लागला.खरच प्रेमात किती
ताकद आहे ना?दिनेशला कधीच प्रेम मिळाले नव्हते.तस बघायला गेलो तर तो प्रेमाचा
भुकेला होता.पण प्रेमा घरात आल्यामुळे त्याचे जीवन नंदनवन झाले.
©® सौ.अंजली माधव देशपांडे.नाशिक.
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box