गंधा - डॉ विवेक वैद्य

 "गंधा"

डॉ विवेक वैद्य

 सकाळी थोरात उठला. वातावरण प्रसन्न होते. उत्तराखंडला ट्रिप काढल्याबद्दल त्याने ऑफिसस्टाफ आणि मॅनेजरचे आभारच मानले. जिकडेतीकडे हिरवळ, मधुनच येणारा पाऊस, थंडगार आणि आल्हाददायक हवा.फ्रेश होऊन तो लाँजमध्ये आला. हे हॉटेल गावापासून थोडे दूर डोंगराजवळ होते. त्याने चहा बिस्कीट घेतले. आज कुठे निघायचे हे विचारायला हवे सोबत्यांना. प्रोग्राम फिक्स होता पण आजचा प्रोग्राम थोरात विसरला. निघायला वेळ असल्याने थोरात सहज चक्कर मारायला निघाला. गावाबाहेर असल्याने दुकानें नव्हती. तो रोडने पायी निघाला. थोडे अंतर जाताच एक मोठे get असलेली आणि भलेमोठे कंपाऊंड असलेली जागा दिसली.आतमध्ये बहुदा कुठलीतरी इंडस्ट्री असावी. थोरातने सहज इकडेतीकडे नजर फिरवली. गेटजवळ उभ्या असलेल्या गुरख्याशी कोणीतरी बोलत होते. तो परत येण्यासाठी मागे फिरला आणि त्याच्या डोक्यात एकदम काहीतरी आले. तो पुन्हा पळत गेटजवळ आला. एव्हाना ती व्यक्ती आतमध्ये चालली होती. थोरातने जोरात आवाज दिला 
"माधव..???.."
*****

त्यादिवशी त्या गच्च भरलेल्या हॉलमध्ये अनेक मोठे इंडस्ट्रियलिस्ट बसले होते. प्रत्येक कंपनीचा एक प्रतिनिधी येऊन त्यांच्या प्रॉडक्टची आणि कंपनीची माहिती देत होते.त्याचवेळेस काही नवीन गोष्टीही सांगत होते. नंबर येताच एक चुणचुणीत तरुणी उठून उभी राहिली आणि आत्मविश्वासाने बोलू लागली. तिच्या दहा मिनिटाच्या भाषणात तिने श्रोत्यांवर चांगलाच प्रभाव टाकला.

कार्यक्रम संपल्यावर सगळेजण बुफेचा आनंद घेत असतांना त्या तरुणीला कोणीतरी हाक मारली. एक तरुण तिला बोलावत होता.
"येस सर?"
"हाय... I am ronak rajpal फ्रॉम rajpal and sons."
"Oh.. I m sugandha. Nise to meet u sir. Are u intereted to buying our company's products sir?"
"No. I m interested in u. Will u join our company ?

*******

 
          सकाळी शार्प साडेदहा वाजता तिने ऑफिसमध्ये प्रवेश केला. आपल्या केबिनकडे जात असतांना ऑफिसमधील प्रत्येक कर्मचारी तिला उठून गुड मॉर्निंग मॅम म्हणत होता त्याचा मान लवून स्वीकार करत ती तिच्या केबिनमध्ये गेली आणि तिच्या चेअरवर विसावली. टेबलवरच्या बाटलीतले थोडेसे पाणी प्यायली. आपल्या चेहऱ्याचा मेकअप पुसला जाणार नाही इतक्या हलक्या हाताने तिने रुमालाने ओठ पुसले. तिची सेक्रेटरी आत येत तिच्या उजव्या बाजूला फाइल्सकडे निर्देश करत म्हणाली.

" मॅम या आजच्या फाइल्स. "

"ओके." तिने तिचा कॉम्प्युटर चालू केला.

" मॅम. ऑफिसमध्ये दिल्लीच्या आपल्या ब्रँचचा एक एम्प्लॉयी बदलून आला आहे. त्याला पाठवते इंट्रो साठी. "

" हो. पाठव. "

  थोड्याच मिनिटात केबिनच्या दारावर क्नॉक होत आवाज आला. " मे आय कम इन मॅम? "

" येस "

तिने कॉम्प्युटर वरची नजरही हटवली नव्हती.तोच आश्चर्ययुक्त स्वर कानावर आला. " सुगंधा तूं? "

 सुगंधाने चमकून वर पाहातले आणि तिच्याही तोंडून निघाले "माधव तू?"
दोन क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. सुगंधा भानावर आली. त्याच्या हातातली फाईल घेत म्हणाली.

" वेलकम मिस्टर माधव भंडारी.  आमचे सिनियर मॅनेजर रानडे तुम्हांला ऑफिसची माहिती देतील. तुम्ही आमच्या दिल्ली ऑफिसला होता त्यामुळे तुम्हाला नवीन काही सांगण्याची जरुरी नाही. ओके? "
माधव गोंधळलेल्या अवस्थेत उभा होता.

" यू मे गो नौ मिस्टर भंडारी. "

माधव निमूटपणे निघून गेला.
******

 मोजून चार दिवसानंतर सुगंधाने माधवला केबिनमध्ये बोलावले.
 
"येस मॅम?"

" मी. भंडारी. मला तुमच्याशी काही पॉईंट डिस्कस करायचे आहेत. तुम्ही संध्याकाळी साडेसात वाजता ब्लू डायमंड हॉटेलला भेटा मला. टेबलं  19 बुक आहे. तिथे थांबा. "

""ओके मॅम " माधव जायला निघाला तेवढ्यात सुगंधा त्याला थांबवता म्हणाली.

"ही भेट कॉन्फिडनशिअल आहे. कोणाला सांगू नका याबद्दल."

""हो मॅम "

संध्याकाळी सात वाजताच माधव पोहचला हॉटेलला.

साडेसातला बरोबर सुगंधा आली.

"गुड इव्हनिंग मॅम." माधव अडबीने म्हणाला तशी ती म्हणाली.

"नो फॉर्मॅलिटी माधव. आता आपण ऑफिसच्या बाहेर आहोत.  बरं ते जाऊ दे. तू काय घेणार? अगोदर ड्रिंक घेणार?"

"नाही. मी ड्रिंक घेत नाही."

" तू तसाच आहेस अजून माधव. काहीच बदलला नाहीस चार वर्षात. "

"मॅम काय डिसकस करायचे आहे?"

" सूप सांगू? Veg.. Nonveg? "

"Veg"

"ओके. आता डायरेक्ट पॉईंटला येते. का आलास माझ्या आयुष्यात परत?"

"जाणूनबुजून नाही आलो मॅम."

"मॅम नाही. सुगंधा म्हटले तरी चालेल.. एकेरी उल्लेखाने."

"ठीक. पूर्ण गोष्ट सांगावी लागेल. चालेल?

"चालेल. सांग सविस्तर."

"तू हळूहळू अलिप्त होत गेलीस आणि मी सैरभैर होत गेलो. चूक काय तेही कळेना. Third year ला  दोन विषयात चक्क नापास झालो. तू फायनल पासऊट होऊन गेली तेव्हा मी कॉलेज सोडण्याच्या बेतात होतो. पण कुलकर्णी सरांनी मला खूप समजावले.मग सावरलो.पास झालो. तरीही मन थाऱ्यावर नव्हते. तुझी आठवण येऊ नये म्हणून महाराष्ट्रात यायचेच नव्हते. मग फुटकळ नौकऱ्या केल्या,अगदी उत्तराखंडात राहिलो. तिथेच आपल्या बॅच चा थोरात भेटला. तिथे ट्रिपवर आला होता. मला बघून आश्चर्यचकित झाला. म्हणाला "तुझ्यासारखा स्कॉलर माणूस अशी नौकरी करतो?" जबरदस्ती मला दिल्लीला घेऊन आला. त्याच्या ऑफिसला जागा होती. तिथल्या मॅनेजर शी बोलून मला तुझ्या कंपनीत लावले. थोरातने खूप मदत केली. मीही मन लावून काम केले. मग इथल्या ब्रँचला एका हुशार माणसाची गरज होती. मी यायला राजी नव्हतो पण थोरात म्हणाला तू मुंबईला जा खूप पुढे जाशील. मग आलो इकडे. तोपर्यंत Rajpal and sons ही तुमची कंपनी आहे हे आई शपथ  माहित नव्हते. "

"आमची म्हणजे ही माझ्या सासऱ्यांची कंपनी. मला तुला भेटण्यासाठी थाप मारावी लागली कि मला इथले जेवण आवडते."

"पण तू माझ्यापासून दूर का झाली? माझ्याकडून काही चूक झाली का?"

"नाही रे. तूझ्या सारख्या भाबड्या निष्पाप माणसाकडून कशी चूक होईल?. जाऊ दे त्या गोष्टी.तुझी फसवणूक केली हे मान्य."

"पण का केले गंधा तू हे सर्व?"

" जाऊ दे म्हणाले ना? पण तू समोर दिसलास कि वेदना होतात बघ मनाला. ते सोड.. जेवण काय मागवू? "

" खिचडी कढी मिळेल? "

"कधी बदलणार रे बाबा माधवा तूं?" सुगंधा डोकयाला हात लावत म्हणाली. "

*****

 सुगंधा घाईने ऑफिसला आली आणि आल्या आल्या सेक्रेटरीला म्हणाली
" मी. भंडारीना पाठवा. ताबडतोब... "

" मे आय कम इन मॅम. "

" माधवा काय हे? तूं पुन्हा दिल्लीला बदली करून घेतली? तेही मला न समजता. थेट headoffice शी संपर्क साधून? "

"हो मॅम."

" मॅम गेली खड्यात. का केलेस तूं असे? "

"मग काय करू? तुला रोज बघून झुरु?

"म्हणजे?"

" जातो दिल्लीला. तिथे सुखी होतो. इथे तुझ्यामुळे मला त्रास आणि मला बघून तुला... "

"अरे पण अजून महिनाही नाही झाला तुला येऊन. मिळाली कशी ट्रान्सफर?"

" मिळवली. सांगितले इथली हवा मानवत नाही. दिल्लीच्या ब्रँच मॅनेजरला तर माझ्यासारखा माणूस हवाच होता "

"जा माझ्यासमोरून निघून जा."

" मॅम?? "

"Just get lost "

*****

 आज ऑफिस सोडले माधवने. घरी आराम करत असतांना मोबाईल वाजला. मॅम चा फोन?

"येस मॅम."

" माधव दिल्लीची flight कधीची आहे? "

"संध्याकाळची आहे मॅम "

ठीक आहे. आवरासावर झाली? "

"हो. सामान आहेच कितीसे? "

"ठीक आहे. मी भेटायला येते आहे तुला. फ्लॅटवर एकटाच राहतो ना?पत्ता तूं ऑफिसला दिला तोच ना?"

"  हो. "

" मी येतेय... तोपर्यंत शॉवर घेऊन ठेव. "

" शॉवर?  सकाळी अंघोळ झालीय माझी. "

"मी सांगते तेवढं कर. मॅम म्हणतोय ना अजून मला?"

"ओके ".


*****

  सुगंधा माधवच्या फ्लॅटमध्ये आली  तसा माधव उभा राहिला आणि म्हणाला "काय झाले मॅम. का भेटायला आलात तुम्ही?"

" मॅम नाही तुझी सुगंधा भेटायला आली आहे तुला. " माधव पुढे काही बोलणार तोच सुगंधाने त्याला घट्ट मिठी मारली.

"मॅम? काय करता आहात तुम्ही?" माधव तिला दूर करण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

"माधव मला दूर लोटू नको. तुझी खूप फसवणूक केली मी. पण आता एकदा मनसोक्त भेटू दे." त्याला अधिकच घट्ट पकडत सुगंधा म्हणाली. तो पुढे काही बोलणार तोच सुगंधाने त्याच्या ओठावर ओठ टेकवले. तिने लावलेल्या महागड्या सेंटचा वास, तिच्या चुंबनाची अमृतगोडी.. माधव वेडावला. नकळत त्याचे हात तिच्या पाठीवर फिरू लागले.पाठीवरून खाली येऊ लागले.
"थांब " सुगंधाच्या शब्दाने तो थांबला.

"सॉरी गंधा.. मी वाहवत चाललो होतो."

"आज वाहायचेच आहे. प्रेमात मनसोक्त डुंबायचे आहे.मी थांब यासाठी म्हटले कि माझा ड्रेस खराब होईल. त्यापेक्षा मी तो व्यवस्थित काढून ठेवते."

" नको सुगंधा. तूं विवाहित आहेस. असे करणे चुकीचे आहे. माझ्याकडून नकळत चूक झाली. Please... "

सुगंधाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या अंगावरील एक एक वस्त्र उतरवायला सुरुवात केली. शेवटचे वस्त्र बाजूला काढून ठेवत तिने माधवला मिठी मारली. तिची संगमरवरी काया , कमनीय बांधा आणि वेड लावणाऱ्या उभारांनी माधवचा सय्यम संपला आणि वासनेचा वणवा पेटला. पुढील अर्धा तास त्या बेडरूम मध्ये फक्त सित्कार  ऐकू येत होते..
दोघेही शांत होऊन एकमेकांच्या मिठीत विसावल्यावर तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत माधव म्हणाला

"गंधा....अजूनही इतके प्रेम करतेस माझ्यावर तर मला सोडून का गेलीस?"

" माधव तू खूप साधा आहेस. निष्पाप.. निरागस. छक्के पंजे न खेळणारा. त्यामुळे कोण जाणे मला असे वाटले कि तूं खूप पुढे जाऊ शकणार नाही. लहानपणापासून मध्यमवर्गीय असल्याने मला हौसमौज करताच आली नाही. म्हणून मी ठरवलं आयुष्यात फक्त मोठंच नाही तर श्रीमंत व्हायचे. म्हणून मी पास होताच तुम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेली. तुम्हाला ना माझा पत्ता दिला ना नवा मोबाईल नंबर.. मला आज जे पाहिजे होते ते सगळे मिळाले. आमच्या 15 ब्रँचेस आहेत. मुंबईच्यास तीन पैकी एका ब्रँचची जबाबदारी माझ्याकडे आहे. बंगला.. 2-2 आलिशान गाड्या. सगळी सुखे आहेत. "

"नवरा वाईट आहे का? व्यसनी?"

"नाही रे. सगळे श्रीमंत वाईट आणि व्यसनी नसतात. नवरा चांगला आहे पण फार busy असतो."

"सगळे चांगले आहे तर मला भेटायला का आली?"

" कुठेतरी मनात अजून खंत आहे रे तुला खरेतर तुम्हा सगळ्यांना फसवल्याची. किती छान ग्रुप होता आपला. अगदी पैशांपासून ते शारीरिक बौद्धिक मदत करणारा. पण साधारण सेकंड इयर च्या शेवटी माझ्यातल्या महत्वकांक्षेने उचल खाल्ली आणि मग मी आपल्या ग्रुपमधून तटकतोड होत गेली. पण तरी कुठेतरी मनात ती सल राहिली किंवा जो guilty complex येतो अधुमधून त्याचा कदाचित हा परिणाम असावा. "

तिच्या वस्त्रहीन पाठीवरून हात फिरवीत माधव म्हणाला
" खरे सांगू?खूप मोहाचे  क्षण आले पण मी स्त्रीसूख उपभोगले नाही. पत्नीबरोबरच शरीरसूख घेईन हे ठरवले होते.  ते चुकले..पण...चूक दुरुस्त करता येईल. "

" म्हणजे? मी नाही समजले. "

"सोपं आहे गंधा. तूं नवऱ्यापासून घटस्फोट घे. आपण लग्न करू?"

"छे रे."

"का ग? तुला माहित आहे ना माझे पॅकेज काय आहे? आपल्या दोघांसाठी ते पुरेसे नाही?"

" अरे माझ्याकडे तुला आणि अनेकांना तेवढे package देणारा आहे. "

"असू दे ना? पाहिजे तर तुही सर्विस कर. बक्कळ कमावू."

"ते शक्य नाही."

"का शक्य नाही. आता तर तुझी श्रीमंतीची हाऊस फिटली असेल ना? घे घटस्फोट."

"नाही रे. नवरा चांगला आहे माझा. सोड त्या गोष्टी. चल मला निघायला हवं."
सुगंधा बेडवरून उठून कपडे घालू लागली. कपडे पूर्णपणे नेसल्यानंतर ती तृप्तीत झोपलेल्या माधवकडे आली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत प्रेमाने म्हणाली.

" राजा. आता छानशी मुलगी बघून लग्न करून टाक. उगाच इकडे तिकडे भटकत बसू नको."

"बघू नंतर. पण गंधा,तुझी एखादी वस्तू दे ना वापरात असलेली. तुझी आठवण म्हणून ठेवेन मी माझ्याजवळ."

" आता नाहीये रे काहीच. मी असं करते तुझा दिल्लीच्या पत्त्यावर पाठवेन.. येऊ मी? आणि आता मला विसरायचे... आठवणीत ठेवायचे नाही. Bye... "

"गंधा..." त्याने हाक मारली तोपर्यंत ति निघून गेली होती.

********

 काही दिवसानंतर त्याच्या नावे एक पार्सल आले. पाठवणाऱ्याचा नाव पत्ता नसला तरी ते कोणी पाठवले असावे ह्याचा त्याला अंदाज आला. त्याने पार्सल उघडले त्यात एक सेंटची बाटली होती आणि एक चिठठी.

" माधव.... ह्यात जी सेंट ची बाटली आहे ति तूं वापरली तरी संपेल आणि नाही वापरली तरी काही दिवसांनी त्यातले द्रावण उडून जाईल. माझ्या आठवणीही अश्याच आहेत. तू मला काही दिवसांनी विसरणार आहेच.सुगंध हा  फक्त काही वेळ मन प्रसन्न करतो पण नंतर काही वेळात विरून जातो. तू समजदार आहेस. जास्त सांगत नाही....... गंधा... "

माधवने सेंटची बाटली उघडली आणि हवेत फवारा उडवला. तो वास घेताच तो थरारला. सुगंधा वापरात असलेल्या सेंटचा तो वास होता. त्याने पुन्हा हवेत चहुंकडे तो फवारा उडवला. सेंटचा वास सगळीकडे पसरला.  त्याने डोळे लाऊन घेतले आणि बेडवर अंगावर चादर घेऊन पडून राहिला.त्याच्या मनोराज्यात सुगंधाने त्याला घट्ट मिठी मारली होती....
******समाप्त.
©® विवेक चंद्रकांत वैद्य.

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments