ना कळे, कधी, कसे मन वेडे गुंतले - प्रतिभा चांदूरकर

 ना कळे, कधी, कसे मन वेडे गुंतले...

प्रतिभा चांदूरकर


गुलाबी रंगाची साडी, त्याला मॅचिंग ब्लाऊज, हातात , गळ्यात सोन्याचे दागिने, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र, नाकात नथ अश्या रेणूवरून समीरचे डोळे हटतच नव्हते. " समीर " अशी हाक गुरुजींनी मारली आणि तो भानावर आला. सगळे त्याला चिडवत होते. " तेरे चेहरे से नजर नहीं हटती, हम ये पूजा कैसे करे.." अस स्वतः च गाणं बनवून..
कालच समीर आणि रेणूच लग्न झालं. आज
सत्यनारायणाची पूजा होती.
दोघे पूजेला बसले आणि रेणूच्या मनात आल,  सगळ कस स्वप्नासारखं वाटतंय.
पहिली नजर में प्यार वैगरे वर विश्वास नसणारी मी. ह्या विषयावरून तावातावाने भांडणारी मी. आज समीरची अर्धांगिनी आहे.
तिच्या डोळ्यासमोरुन मागच्या काही दिवसातल्या घटना सरकू लागल्या.
" अग.. आवरल का नाही , अजून?" रेणूच्या आईने , माधवीने आवाज दिला.  रेणूने पटापट आवरायला घेतलं.  " आई..साडीच्या निऱ्या करून दे ना ग" रेणू बोलली.
" हं..आले बाई. मैथिलीच लग्न होईल आज, आता आपण ही लग्नाचा विचार करावा." माधवी निऱ्या करून देता देता नाटकी आवाजात बोलली.
निळ्या रंगाची साडी, मोठे जरीचे काठ, डिझायनर ब्लाऊज, त्यावर मॅचिंग इमिटेटेड ज्वेलरी , हलका मेकअप..रेणू फार सुंदर दिसत होती. खूप गोरी नाही पण गोऱ्यात जमा होणारी, सरळ नाक, नाजूक जिवणी, तिच्या सौंदर्यात भर टाकणारे कुरळे केस. अशी रेणू पाहताक्षणी आवडेल अशीच होती.
" किती गोड दिसतय माझ पिल्लू!" अस म्हणत माधवीने हाताने दृष्ट काढली.
रेणू आणि मैथिली खास मैत्रिणी. मैथिलीच लग्न ठरल्यापासून खरेदी , पार्लर,  मेंदी , हळद अश्या सर्व कार्यक्रमांना रेणू हजर होती. सगळी मदत करत होती. पण नेमक लग्नाच्या दिवशीच महत्वाची मीटिंग ठेवली होती कंपनीने. सुट्टीचा दिवस नसल्याने थोडा गोंधळ झाला . दोघी खूप वैतागल्या. पण काय करणार? नोकरी ही महत्वाची आहेच.
काल रात्री हॉल वरून परत घरी येताना पाय निघत नव्हता तिचा. पण यावं लागलं. खूप विनंत्या केल्यावर अर्धा पाऊण तास मीटिंग अटेंड केल्यावर साहेब जा म्हणाले. पटकन ओला करून ती घरी आली आणि आता तयार होऊन निघाली. नशिबाने मुहूर्त पावणेबारा चा होता.
तोवर दहा फोन आले मैथिली चे.
लग्नाच्या हॉलमध्ये दोघी मायलेकी पोचल्या. मुहूर्ताच्या आधी अर्धा तास. " हुश्श..वेळेत आलो " म्हणत रेणू नवरीच्या खोलीत गेली. रेणू गौरीहार पूजण्याच्या तयारीत होती. तिला बघून मैथिलीच्या आईलाही हुश्श झाल.
" आई आलीय ना ग? " त्यांनी विचारलं. " हो..तिला घेऊन येते." अस म्हणत रेणू माधवी ला घेऊन आली.
दोघी भेटल्या. माधवीने मैथिलीला प्रेमाने मिठी मारली. नकळत डोळे पाणावले.
तेवढ्यात गुरुजी , "गौरीहार पूजायला बसा " म्हणत आत आले.
थोड्या वेळाने मामा मुलीला मंडपात नेण्यासाठी आला.
ज्या क्षणाची वाट बघत होती मैथिली तो क्षण आला खरा, पण हृदयाची धडधड वाढवून.
" सुमुहूर्त सावधान" अस म्हणत मैथिली आणि विशालने एकमेकांच्या गळ्यात माळ घातली.
रेणूच्या हातात कलश आणि मैथिलीच्या चुलत बहिणीच्या हातात तामण होत.
रेणू कलशातल पाणी , बोटांनी
विशालच्या डोळ्यांना लावत होती, तितक्यात तिला जोराचा धक्का बसला.
" कोण आहे? समोर बघ ना!" अस जोरात ओरडत,  कोण धक्का देतेय, म्हणून मान वळवली. तर समोर दिसायला ठीकठाक असलेला तरुण होता. तिच्या ओरडण्याने गोंधळला होता. खर तर बाजूला असलेला पाट न दिसल्याने गडबडीत त्याचा धक्का लागला होता. एकमेकांना बघताच मनातून काहीतरी हलचल झाली.
" सॉरी..सॉरी.." अस म्हणत तो नवरदेवाच्या म्हणजे विशालच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
" चिल..काही झालं नाहीये एवढं.." अस म्हणत विशालने रेणूला खूण केली. दोघे एकमेकांच्याकडे अधूनमधून बघत होते.
मग सगळे विधी झाले. नवरा, नवरी कपडे बदलून स्टेजवर आले.
तोवर जवळचे नातेवाईक सोडून सर्वांनी जेवणाची वर्दी लावली.
स्टेजवर आल्यावर विशालने त्यांच्या मामेभावाशी समीरशी रेणूची ओळख करून दिली.
" सॉरी ह. पण कित्ती जोरात ओरडता हो तुम्ही "  तो हसत बोलला. बोलण्यातून चांगल्या घरातला, सुसंस्कृत वाटत होता. रेणू थोडी ओशाळली.
स्टेजवर भेटायला लोकं येत होते. ओळख करून देणं सुरू होत सर्वांचं. मग रेणू आणि समीर तिथेच थोड बाजूला बसले.
आधी थोड अवघडत, नंतर मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. त्यातून कळलं,  समीरचे वडील मोठे व्यावसायिक होते. तो इंजिनियर होता आणि बिझनेस मॅनेजमेंट विषय घेऊन मास्टर्स केलं होत यू एस मधून. वडलांच्या दोन कंपन्या आता तो सांभाळत होता.  एक औषधांची आणि दुसरी रेडिमेड गारमेंडची.
रेणूने तिची माहिती दिली. ती मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्ट वर होती. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तिनेही मास्टर्स केलं होत .
खर तर पहिल्या भेटीत कोणी कोणाला आवडतं, ह्यावर रेणू चा मुळीच विश्वास नव्हता. ती म्हणायची असा विश्वास ठेवणं, भावनेच्या भरात निर्णय घेणं, म्हणजे मूर्ख पणा असतो..
पण समीरला पाहताच मनात तरंग उठले होते.  सारख त्याच्याकडे बघावं, त्याच्याशी बोलावं अस वाटत होत.   ज्यावर विश्वास नाही, तेच घडल होत. समीरला ही " कुछ कुछ होता है" सारख फिलिंग येत होत. भेटणारे येऊन गेले आणि जेवणाची पंगत बसली. उखाणा घ्या करत , चेष्टा , मस्करी करत जेवणं झाली. मैथिली सासरी निघाली. मुली कितीही शिकल्या, स्वावलंबी झाल्या, तरी आईवडलांना सोडून जाताना मन हळव होतंच. असाच हा हळवा क्षण..
रेणू आणि मैथिली तर गळ्यात गळे घालून खूप रडल्या. शेवटी विशाल म्हणाला , " तू ही चल. आमच्या बरोबर. "
रेणू म्हणाली, " उद्या ऑफिस सुटल्यावर येते. "
लेक सासरी गेली की घर रिकाम वाटत. मुली त्यांच्या चिवचिवाटाने घर भरून टाकतात.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रेणू मैथिलीकडे गेली. सासरची माणसं खूप प्रेमळ होती.  खर तर कोणाचं काय ऐकून मुली आधीच सासर म्हणलं की घाबरतात.
काही वेळा मुलीची आई फार लुडबुड करते तिच्या संसारात. दोघांनी एकमेकांना नीट समजून घेतलं तर ही समस्या राहणार नाही.
" जेऊनच जा " असा आग्रह झाल्यामुळे रेणू जेऊन निघाली. दुसऱ्या दिवशी मैथिली आणि विशाल हनिमूनसाठी  सिंगापूरला जण्यार होते. समीर ही सकाळी निघणार होता.
समीर दादरला रहात होता. दादरमध्ये भला मोठा फ्लॅट होता त्यांचा . एक रूम तर घरात काम करणाऱ्यांसाठी होती. आई वडील आणि समीर, तिघे रहात होते. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होत. ती दुबईत रहात होती. विशाल मुलुंडमध्ये. मैथिली आणि विशाल एकाच कंपनीमध्ये काम करत होते. तिथेच त्यांच सुत जुळल आणि लग्न ही झालं.
आता रेणू आणि समीरची चांगली ओळख झाली होती.
ह्यावेळी मात्र दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. तसही फेसबुक, इंस्टाग्रामवर एकमेकांची प्रोफाईल चेक केली होतीच.
आता व्हॉट्सअपवर एकमेकांना मेसेज करून संवाद ही सुरू होता. एक दिवस समीरने तिला त्यांची कंपनी बघायला बोलावलं.
पिवळा, पांढरा अश्या मिक्स रंगाचा वन पिस रेणूने घातला होता. मोत्यांची नाजूक माळ आणि त्याला मॅचिंग कानात आणि हातात. मोकळे केस आणि हलका मेकअप.
तिला पाहून " कलेजा खलास झाला " अस काहीस फिलिंग समीरला आल आणि तिचीही अवस्था अशीच होती. डार्क निळ्या रंगाचा शर्ट , वर फिक्कट निळ्या रंगाचा कोट , केस थोडेसे वळवलेले . समीर आज खूपच हँडसम दिसत होता. तो जवळ आला आणि जॉय परफ्यूमचा मस्त सुगंध आला.
रेणूला बघून पुढे आला आणि वेलकम म्हणत तिचा हात हातात घेतला. दोघेही एकमेकांच्या स्पर्शाने मोहरले.
मग त्याने सगळी कंपनी तिला दाखवली. सगळे कर्मचारी, ऑफिसर त्यांच्याकडे थोडे कुतूहलाने बघत होते. समीरच्या स्वभावाप्रमाणे अगदी कामगारापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांशी त्याने स्नेहपूर्वक संबंध बघून रेणू खूप प्रभावित झाली.
आपल्या कंपनीत वरिष्ठच किती स्वतः ची स्पेस ठेवून असतात, अस तिच्या मनात आल.
" आता लंच ब्रेक. खूप भूक लागली आहे. "
" तुला काय आवडतं? ते मागवतो कॅन्टीन मधून." समीर बोलला.
"  पोळी , भाजी आणि दही. " असा साधा मेनू रेणूने सांगितला.
" अग..इथे पुलाव ही मस्त मिळतो. तो ही मागवतो." समीर बोलला. नंतर " कुछ मिठा हो जाए " म्हणत मँगो लस्सी मागवली. " दह्यावर लस्सी " अस तिने म्हणताच, "चालत ग" अस तो बोलला.
स्वभावाने एकदम मोकळा वाटला. आत, बाहेर काही नाही असा.
गप्पा मारत जेवण झालं. समीर बरच सांगत होता. कंपनीतर्फे सर्वांना सकाळी चहा, नाष्टा, जेवण आणि दुपारी चहा आणि स्नॅक्स असत. माणसाचं पोट भरलेलं असल ना की तो जास्त चांगल काम करतो. तसच योग्य सन्मान, कामाचा योग्य मोबदला, हेल्थची काळजी अस सर्व केलं की कंपनी छान चालते.
जास्त फायदा कमावण्याच्या नादात व्यावसायिक लोक महत्वाच्या गोष्टी विसरतात. ते म्हणजे रिलेशन.
" एक गोष्ट बोलू." तिच्या डोळ्यात पहात तो बोलला. तिने फक्त " ह " अस म्हणलं आणि तो बिनधास्त बोलला, " मला तू फार आवडलीस. तुला काय वाटत? "
तिला काय बोलावं सुचेना. चेहऱ्यावरची लाली सगळ सांगत होती. ती काहीच बोलली नाही.
" चल..तुला घरी सोडतो." अस म्हणत दोघे निघाले. गाडीत प्रेमाची सूचक गाणी लावून तो तिच्याकडे बघत होता.
रेणूला भावनेच्या भरात निर्णय घ्यायची सवय नव्हती, अस तिने सर्वांना सांगितल होत. आता मात्र स्वतः च मन आवरता आवरत नव्हत. "बोलणं सोप्प आहे " अस तिला मैत्रिणी म्हणायच्या , ते आठवत होत तिला.
मन  सारख सांगत होत हो म्हण.
घराजवळ गाडी थांबली. तिने विचारलं, " घरी येतोस? "
समीर मिश्किल हसत बोलला, " तू हो म्हणल्यावर.."
" मग होच समज.." अस लाजत बोलत तिने गाडीच दार लावलं. त्याने पटकन गाडीची काच खाली करत विचारलं, " काय? ऐकू नाही आल नीट."
" तू जे ऐकलीस तेच .बाय." अस म्हणत ती घराकडे निघाली.
आता घरी बोलायचा पाहिजे, अस दोघांच्याही मनात आल.
आता मैथिली आणि विशालची वाट बघावी लागेल असा विचार करत असतानाच मैथिलीचा फोन आला.
ती कालच आली होती. किती लवकर दिवस जातात, अस तिच्या मनात आल.
दोन दिवसांनी चौघांनी भेटायचं ठरवलं. थोड्या गप्पा झाल्या आणि समीरने विषयाला हात घालत सांगितल की रेणू आणि तो एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.
ते ऐकून मैथिली आणि विशाल आधी उडालेच, आणि खूष ही झाले.
" गुड चॉईस." अस म्हणत एकमेकांना टाळ्या दिल्या.
" खर तर रेणू फार विचार करून निर्णय घेणारी आहे. इतक्या झटपट तिने निर्णय घेतला म्हणजे,"  दिले नादान तुझे हुआ क्या है" असच झालंय तिचं.
त्यावर तिला मारल्याची ॲक्शन करत रेणू लाजली.
मैथिली आणि विशालने चांगल स्थळ आहे अस करत एकमेकांच्या घरी दोघांची नाव सुचवली. रेणूचे वडील आधीपासून लव मॅरेजच्या विरोधात होते.   काय काय कानावर पडत असत, म्हणून ते धास्तावलेले असायचे. पण सगळ चांगल आहे बघून त्यांनी होकार दिला.
दोन्ही घरची बोलणी झाली. खर तर नावं ठेवायला जागाच नव्हती. दोघे मेड फॉर इच आदर असेच होते.
एका सुहूर्तावर रेणू वैद्य,  सौ. रेणू समीर कुलकर्णी झाली.
" अहो..तुमचं लक्ष कुठाय? " गुरुजी रेणूला बोलले. " उद्या सकाळी कधी निघायचं? " त्याचा विचार सुरू आहे " अस म्हणत सगळे परत चिडवायला लागले. तिने लाजून समीरकडे पाहिल.
ते दोघं उद्या सकाळच्या विमानाने हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला निघणार होते.
स्वित्झर्लंडच्या स्वप्ननगरीत समीरच्या बाहुपाशात , तना मनाने तृप्त होत, कधी , कसे मन वेडे गुंतले हेच गीत मनात घोळत होते.

समाप्त

प्रतिभा चांदूरकर
ठाणे


disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments