प्यार किया तो डरना क्या - अरुंधती धर्माधिकारी कुंडले

प्यार किया तो डरना क्या 

अरुंधती धर्माधिकारी कुंडले

आज रविवार चा दिवस म्हणजे आराम . नो घाई गडबड.

मी आज जरा उशीराच उठले, सगळ आवरुन मी मस्त कडक आले युक्त चहा बनवला, आणि चहा चा कप घेऊन आरामात बसून चहाचा आस्वाद घेत होते.

घर खुप शांत वाटत होतं, म्हणून रेडिओ सुरू केला. प्यार किया तो डरना क्या हे गाणं रेडिओ वर सुरू होतं, आणि ते गाणं ऐकता ऐकता माझ मन भुतकाळा त पिंगा घालू लागल. 

प्रेम ही आयुष्यातली सुंदर अनुभुती आहे.एकदा का प्रेमाची जाणीव झाली की ते प्रेम आपलसं करण्यासाठी काहिही करण्याची हिंमत आणि धाडस निर्माण होत.

मला आठवत  आमच प्रेम, रवि आणि रेवा च प्रेम.  

आम्ही दोघेही एकाच शाळेत शिकत होतो. रेवा एक वर्ष माझ्या मागे होती.  गोबरया  गालाची  आणि टपोऱ्या डोळ्यांची. तिला बघताच कोणीही तिच्या प्रेमात पडाव. अशीच ती सुंदर होती.

मला ती शाळेपासून च  खुप आवडत होती. पण ते वय प्रेम व्यक्त करण्याचं नव्हतं

मी तिला रोज शाळेच्या मधल्या सुट्टीत चोरून बघायचो. ती मला दिसली की खुप बरं वाटायचं. मी तिला बघण्यासाठी म्हणून शाळेला कधी दांडी मारली नाही.

माझ चोरून बघणं तिच्या लक्षात आलं असावं. ती पण मला चोरुन बघते आहे, अस मला वाटायचं, पण नंतर माझी खात्री च झाली. कि ती पण मला चोरुन बघते आहे. एकदा असेच चोरट्या नजरेने बघताना दोघांचीही नजरानजर झाली, तेव्हा ती लाजून वर्गात पळाली. 

असाच नजरानजरेचा खेळ करताकरता शाळेचं शिक्षण संपवून college  ला जायची वेळ आली. 

मी सायन्स ला अँड मिशन घेतली, तर तिनं  commers  ला घेतली. 

दोघांचे ही college  वेगळे झाले. 

मला रोज तिला बघण्याची सवय असल्याने मला college  मध्ये  सारखी तिची आठवण त्रास द्यायची. माझ कशात लक्ष लागत नव्हतं.

एक दिवस हिंमत करून मी तिच्या college  जवळ गेलो, आणि तिची बाहेर येण्याची वाट बघु लागलो. ती लांबुन येताना मला दिसली. आमची नजरानजर झाली.मी तिला थांबण्याचा इशारा केला. ती लगेच मैत्रिणींना म्हणाली तुम्ही व्हा पुढे मी आलीच.

मी तिच्या जवळ गेलो आणि तिला म्हटलं मला तु खुप आवडतेस. हे वाक्य ऐकताच ती खुप लाजली.तिनेही लाजत च माझ्या बद्दलच्या प्रेमाची  कबुली दिली. तिचा होकार ऐकून मला जग जिंकल्याचा आनंद झाला.

College  मधलं प्रेम काही औरच असतं.ती प्रेमाची जादू काही न्यारीच असते दोस्ता. 

प्रेम हे एखाद्या फुला सारख असतं, ते बहरायला फारसा वेळ लागत नाही.

पहिले नुसतं च एकमेकांना बघण, एक दिवस जरी तो किंवा ती दिसली नाही तर लोकांच्या गर्दीत नजर एकमेकांना शोधत असते.

प्रेमाचे सुर हळूहळू जुळायला सुरुवात होते. प्रेम फूलायला बहरायला सुरुवात होते. प्रेमाची जादूच अशी काही असते की नुसता एकमेकांचा ध्यास लागलेला असतो. जळी स्थळी काष्टी पाताळी नुसते प्रेमाचेच भास होत असतात. प्रेम म्हटलं की गाठी भेटी होण साहाजिकच आहे. आम्ही दोघ ठरवुन भेटतं होतो. अर्थात अस भेटताना खुप भीती वाटत होती. अस कोणी बघितले तर घरी कळलं तर ,  पण लगेच मनात यायचं प्यार किया तो डरना क्या, आणि ह्या विचाराने आंतरिक हिंमत आणि बळ मिळायचे.

असच आम्ही चोरून भेटतं असताना, रवि चा मित्र म्हणाला, अरे माझी खोली दुपारी रिकामी च असते, मी संध्याकाळी च रुम वर जातो. तो म्हणाला तुम्ही माझ्या रुम वर भेटा. आम्हाला त्याचा विचार पटला. एक दिवस आम्ही ठरवुन रुम वर भेटायचं ठरवल. मनात भीती आणि आनंद अश्या संमिश्र भावना होत्या.कारण आज आम्ही फक्त दोघेच असणार होतो.  

माझ्या आधीच रवी  खोलीत दाखल झाला होता.मी खोलीत दाखल झाल्या बरोबर त्याने दाराची कडी लावली, आणि मला आपल्या बाहुपाशात घट्ट आवळले, त्याचा तो रांगडेपणा बघुन मनात गुदगुल्या होत होत्या. आणि शरिरात एक वेगळेच तरंग उठत होते. त्याचा तो गरम श्वास माझ्या शरीरात वेगळीच जादू करत होता. त्यानं माझ्या नाजूक गुलाबी ओठांवर आपले काळपट रंगाचे ओठ ठेवले, आणि पुढचं काही  घडाच्या आत मी त्याला दुर ढकल.  आता नको हे सगळं, लग्ना नंतर. त्याला प्रथम माझा खुप राग आला, पण त्याचा राग शांत झाल्यावर त्याला ही त्याची चुक लक्षात आली. 

प्रेमा सोबत आमच शिक्षणा कडे लक्ष होतच. 

माझ शिक्षण पूर्ण झाल आणि मला चांगली नोकरी मिळाली. रेवा चही शिक्षण पूर्ण होत आले होते. आत्ता आम्ही लग्न करायचे ठरवले. घरच्यांना प्रेमाची कल्पना देणे आवश्यक होते. घरच्यांना लग्नाचं सांगितल्या वर नकारघंटा वाजवली.  कारण आमच्या जाती भिन्न होत्या. त्यामुळे घरचे लग्नाला तयार नव्हते.  सगळ्यांचा कडाडून विरोध होता.

माझ्या घरा तर ती मुलगी पर जातीची आहे , ती काय आपल्या चालीरीती स्वीकारणार आहे. 

सगळ्यांचा विरोध बघुन मन खुप उदास झाल.  मी माझ्या परीने सगळ्यांना  खुप समजवण्याचा प्रयत्न केला.पण व्यर्थ. परजाती च्या भुताने पछाडलेल्या दोघांच्या घरच्या नी विरोध केला.

रेवा च्या घरच्यांनी मला भेटायला बंदी घातली.ते तिच्या साठी स्थळ शोधु लागले. 

आमचं प्रेम सफल करण्यासाठी मित्र मैत्रिणींनी खुप मदत केली. मी मित्रा द्वारा तिला मेसेज पाठवून भेटायला बोलावले. ती आली आणि आम्ही पळून जाऊन लग्न करायचे ठरवले.  घरच्यांचा विरोध असल्याने आपल लग्न होण शक्य नाही. मी तुझ्या शिवाय जगूच शकत नाही. पळून जाऊन लग्न करणं हाच मार्ग आहे. तिही ह्या लग्नाला तयार झाली. मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं प्यार किया तो डरना क्या. ती खुप गोड हसली.

आमच्या मित्र मैत्रिणींच्या साह्याने मंदिरात आमचा विवाह सोहळा संपन्न झाला.  पळून जाऊन लग्न करताना मला  एकदम फिल्मी फिल आला होता.

आम्ही  पळून जाऊन लग्न केल्यामुळे  दोन्ही घरांचे दरवाजे आमच्या साठी बंद झाले होते. 

आपलीच माणसं तुटली पण प्रेम मिळालं.  एकीकडे प्रेम मिळण्याचा आनंद होता, तर दुसरीकडे नातीगोती तुटण्याच दुःख होत.

मनात नेहमी विचार असायचा प्रेम केलं तर ते शेवटपर्यंत नेणं जरुरी आहे.

आपण आपल्या प्रेमानं घरच्या ची मन नक्कीच जिंकू आणि आपल्या साठी  दोन्ही घरांचे दरवाजे पुन्हा उघडू हा विश्वास मनात कायम होता. 

माझा  आणि रेवा चा सुखी संसार सुरू झाला.

आजही मनात विचार येतो पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय आपण किती हिंमतीने घेतला.  कदाचित तेव्हा हिंमत  दाखवली नसती तर आज कदाचित मना विरुद्ध आयुष्य जगत असतो. 

तेव्हा डोक्यात एकच होत प्यार किया तो डरना क्या.

शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असत.

 

अरुंधती धर्माधिकारी कुंडले

 

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

 

 

Post a Comment

0 Comments