फिरुनी नवीन जन्मेन मी - अनुया चव्हाण 

 फिरुनी नवीन जन्मेन मी 

अनुया अशोक चव्हाण 

सकाळी उठल्या पासून अनन्या अनंत ला फोन  करत  होती.. पण समोरून कोणी फोन उचलत नव्हते तिच्या जीवाची घालमेल झाली होती.. काही कळेनासे झाले होते.. तसा अनंत रोज लवकर उठून तिला न चुकता गुड मॉर्निंग चा मेसेज पाठवायचा..जवळ जवळ 15 ते 16 वर्ष न चुकता त्याच्याकडून सकाळी मेसेज यायचा आणि मग अनन्या ची सकाळ सुरु व्हायची.. आज अनंत चा मेसेज नाही की फोन नाही.. काही कळायला मार्ग नाही.. तिचा जीवा त जीव राहिला नव्हता.. कोणाला फोन करावा कळत नव्हता..

अनंत च्या आई वडिलांना अनन्या आणि अनंत चे नातं मान्य नव्हते  आणि अनन्या च्या घरी पण..दोघ घट्ट मित्र मैत्रिण म्हणून एकमेकांच्या नात्यात अगदी नवरा बायको पेक्षा जास्त गुंतले होते..पण स्वतःच्या घरच्यांना दोघांना ही दुखवायचे नव्हते त्यामुळे त्या दोघांनी  स्वतःचे सगळे ध्येय कामावर, प्रमोशन्स, जबाबदाऱ्यावर ठेवले होते.. परंतु हे करत असताना दोघ एकमेकांशिवाय राहू शकत नव्हती.. दोघांच्यात चर्चा, भांडण, लाड, मस्ती, मजा चालू असायची.. अनन्या ला सगळ्या गोष्टी सगळे प्रसंग अचानक आठवायला लागले होते..
अगदी दोघांची पहिली भेट कशी झाली.. दोघांनी लग्ना साठी प्रयत्न कसे घरी सांगून केले पण दोन्ही घरातून नकार आल्यावर त्यांनी " मैत्री " या धाग्यात " प्रेमाची " साथ धरून राहायचं ठरविले..
अनन्या एकदम हुशार, मनमोकळी, बिनधास्त, बडबडी  आणि बोल्ड व्यक्तिमत्व तितकीच हळवी.. स्वतःच्या क्षेत्रात तिने इतके वर्षात चांगले नाव कामावले होते.. स्वतःच्या 5 ते 6 फर्म्स तिने उभ्या केल्या होत्या तर अनंत वेळ, काम यात एकदम फोकस, काम, काम आणि काम सतत मेंदूला काही तरी खुराक पाहिजे असायचा.. त्याला जुन्या गाड्यांची आवड होती.. त्या तो विकत घ्यायचा आणि मॉडिफाय करायचा.. एका नामांकित कंपनीत GM च्या पोस्ट वर होता..
दोघांचं आयुष्य स्वतःच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करता ना एकमेकां मध्ये पण छान चालू होते.. दोघांना भेटता नाही आले तरी मोबाईल माध्यम होतेच..
अगदी उठला का, नाष्टा झाला का, जेवला का, आज काय काय झाले दिवसभरात.. या गोष्टी दोघांच्या आयुष्यात एक वेगळेच energy चे टॉनिक होते..
अनंत अगदी कंपनी कडून परदेशात गेला तरी फोन चालूच असायचाच.. अनंत अनन्या ला अगदी हाताच्या फोडा प्रमाणे जपायचा.. आणि अनन्या पण सगळे लाड त्याच्याकडून करून घ्यायची.. अनंत च्या सगळ्या गाड्यांचे नंबर अनन्या च्या वाढदिवसाची तारीख..
इतके वर्ष दोघांचा सहवास, कित्येक प्रसंग दोघांनी एकत्र पार पाडले होते.. फकत लग्न राहिले होते.. पण ते दोघ आता या गोष्टीच्या विचारांच्या पुढे गेले होते..
कोणी विचारलं तर म्हणायचे आता म्हातारपणी करू.. पण आयुष्यभर एक मेकांना साथ देऊ.. मैत्री चे नातं या प्रेमाच्या वेगळ्याच वळणावर येऊन ठाकले होते.. 
अनन्य च्या एका मित्राला ती खूप आवडायची ती अनंत ला म्हणायची पण.. बघ मी आता लग्न करणार त्याच्याशी पण अनंत गोड हास्याने तिला म्हणायचा मला माहित आहे.. मी कुठेही असलो नसलो तरी तू मला कधीच एकटं सोडून जाणार नाही.. 💕
अनंत चा प्रचंड विश्वास तिच्यावर होता कारण त्याच्या घरात प्रसंग च असे घडले होते सगळ्यांनी त्याची साथ सोडली होती पण अनन्या ने त्याचा हात घट्ट पकडला होता आणि त्याच्या बरोबर खंबीर पणे उभी होती..
अनन्या ला सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या.. आणि डोळ्यातून घळा घळा पाणी येत होते.. अनंत अजून फोन उचलत नव्हता..
तेवढ्यात अनंत च्या फोन वरून मेसेज आला मला उठता येत नाहीये की चालता येत नाहीये.. पायात ताकदच नाहीये.. नेहमी प्रमाणे फोन सायलेंट ला होता त्यामुळे कळले नाही..
अनन्या खूप घाबरली होती आणि चिडली पण होती.. तिने अनंत ला फोन केला आणि घराच्या दरवाजा पर्यंत येता येतंय का बघ मी पोहचेतच..
अनंत ने घर सोडल्या नंतर अनंत अनन्या च्या नवीन घरा च्या जवळच रहायला आला होता.. अनन्या ने स्वतःचे प्रशस्त घर घेतले होते गाडी घोडे स्व कष्टा वर उभे केले होते अनंत ने पण स्वतःची बरीच प्रॉपर्टी केली होती.. एका फ्लॅट मध्ये निवांत आयुष्य जगत होता..
मित्र मैत्रिणींचे हे दोन्ही फ्लॅट्स मजा मस्तीचे अड्डेच म्हणता येतील.. अनन्या  आणि अनंत कडे एकमेकांच्या घरांच्या चाव्या होत्या पण अनन्या ला अनंत च्या घरची चावी कित्येक दिवस सापडत नव्हती.. स्वतःचाच अनन्या ला राग आला होता आपण असे कसे निष्काळजी राहू शकलो म्हणून..
अनन्या त्याच विचारात, रागात अनंत च्या दरवाजा पाशी पोहचली.. पण दरवाजा उघडला गेला नव्हता.. अनन्या दरवाजा वरून अनंत ला हाक देत होती.. अनंत घसरत घसरत आतून दरवाजा पर्यंत येत होता..
खूप विदारक प्रसंग दोघांच्या समोर होता.. अनन्या ची आर्त पणाची अनंत अनंत म्हणून हाक अनंत ला दरवाजा उघडण्यासाठी ताकद देत होती.. आणि अचानक दरवाजा उघडला.. अनन्याला इतक्या वेळात हे पण सुचलं नाही की चावी बनवणाऱ्याला पटकन बोलवाव...
अनंत ला घाम सुटला होता आणि अनंत भिंतीला टेकला.. अनन्या ने घट्ट मिठी मारली तिला त्या क्षणा ला सगळे उध्वस्त झाले ले जाणवले..
अनंत ला तिने हात धरून खुर्ची वर बसवले.. त्याच्या पायाला तेल लावून, व्यायाम घेऊन पाय मोकळे केले.. पण अनंत खूप थकल्या सारखा जाणवत होता..त्याला स्वच्छ गरम पाण्याने चेहरा हात पाय पुसले.. अनंत जरा नीट झालेला वाटत होता.. पण बोलताना आपण लग्न करू शकलो नाही, आई बाबा तयार झाले नाहीत, तू आज गळ्यात का चेन घातली नाही.. पहिली घाल हे बोलत होता.. त्या दोघांनी मिळून त्यांच्या "A" या अक्षराचे पेंडंट आणि चेन केली होती.. हसता हसता म्हणायचे दोघांच्या गळ्यात हे मंगळसूत्र आहे ना.. जगाला, संस्कृतीला, लोकांच्या  आचार विचारांना न पटणार नातं होत पण त्या दोघां साठी हे प्रेम वेगळंच होत..
अनंत नुसता बोलत होता आणि अनन्या त्याचे सगळे आवरत होती.. अनंत ला बरं वाटून अनंत हळू हळू उठून चालू लागला होता.. अनन्या चा जीव भांड्यात पडला.. तिने पटकन खिचडी आणि बटाट्याचे काप केले अनंत ला खूप आवडायचे तिने केलेले.. तिने केलेले त्याला सगळेच आवडायचे पण अनंत च्या हातचा स्वयंपाक अनन्या ला आवडायचा कधीही चहा न पिणारी अनन्या त्याच्या हातचा मग भरून चहा प्यायची.. त्यांची मैत्री, प्रेम हे विश्व त्यांच्या आयुष्याची दुसरी बाजू होती..
अनन्या ने त्याला आज अगदी भरवले होते.. आता जरा अनंत बरा वाटत होता..
अनन्या ला कामाच्या ठिकाणाहून फोन चालू झाले होते.. तिच्या सगळ्या मिटींग्स होत्या दिवसभर.. ती अनंत कडची चावी घेऊन परत येते आणि आले की पहिले डॉक्टर कडे जाऊ म्हणून घरातून निघाली..
अनंत पण आता व्यवस्थित वाटत होता चालत होता पण अचानक खूप अशक्त जाणवत होता.. ती त्याला आराम कर म्हणून सांगून निघाली..
कामाच्या ठिकाणी लक्ष्य तिचे लागत नव्हते अनंतचा फोन येताना रिंगिंग ला करून आली होती.. आणि येताना आठवणीने चावी बरोबर घेतली होती अनंत ने चे खरं तिला त्याच्याकडची एक चावी दिली होती ..
तो पर्यँत तिने दोघांच्या मित्रांना फोन केला होता अनंत ची तब्ब्येत तिला ठिक वाटत नव्हती मित्रांनी अनंतला  सांगितले की डॉक्टर कडे जाऊ तर त्याला  घेऊन जाता येईल म्हणून दुपारी तिच्या मिटिंग संपल्या वर तिने अनंत ला फोन केले पण तो परत फोन उचलेनासा झाला.. तिने विचार केला झोपला असेल.. जाऊ दे त्रास नको द्यायला.. परत ती कामात.. मग निघण्याच्या वेळी तिने फोन केले अनंत फोन उचलत नव्हता.. अनन्या आता खूप बेचैन झाली होती.. तिने त्यांच्या मित्रांच्या ग्रुप मध्ये फोन केला होता..
मग सगळे जण अनंत च्या घरी पोहचले दरवाजा उघडला.. अनन्या आणि मित्र दरवाजातून अनंत अनंत करत आत आले  पाण्याचा नुसता आवाज येत होता आणि अनंत पूर्ण पाण्यात भिजला होता..
अनंत काही बोलत नव्हता का काही हालचाल करत नव्हता.. पूर्ण गार पडला होता.. शरीर कडक झाले.. डॉक्टरांनी चेक केले त्याला आणि तो आता आपल्यात नाही हे सांगताच अनंत अनंतात विलीन झाला.. अनन्याच्या पाया खालची जमीन सरकल्यासारखं झालं..
अनन्या आणि अनंत त्यांच्या नात्यात जगले होते, स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या मध्ये कुठंही कमी पडत नव्हते.. स्वतःच्या संसाराची स्वप्न म्हातारपणात पूर्ण करण्याचे स्वप्न दोघांनी बघितले होते कारण त्यांचे दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होतेच पण स्वतःच्या कुटुंबावर पण तितकेच होते.. दोघांनी खरं मध्य काढला होता.. मैत्रीचे नातं प्रेमात फुलवत बहरवत होते.. पण नियतीला काळाला आणि वेळेला हे नातं इतकेचं मान्य होते.. पण हे इंटरनेट वरून सुरु झालेलं नातं आता एकमेकांशी ब्रह्मांडा मधून चालू झाले.. कधी न तुटणारे, जन्मानू जन्मीचे, हक्काचे, प्रेमाचे, विश्वासाचे नातं अनंत ने लावलेल्या कित्येक झाडा मधून फळाच्या, फुलांच्या माध्यमातून अनन्या पर्यंत पोहचत होते.. अनंत ने लावलेला मोगरा, चाफा बहरून आला होता..
अनन्या ला आता एकच गाणं सतत गुणगुणत रहावेसे वाटायच .. या झाडांकडे बघताना जे अनंत ने  त्यांनी घेतलेल्या जागेत लावली होती म्हातारपणाची तयारीच.. "एकाच या जन्मी जणू फिरुनी नवीन जन्मेन मी".. अनन्या अनंतला अनंत काळ स्वतःबरोबर या झाडांच्या माध्यमातून जगवतीये, वाढवतीये, बहरवतीये.. आपले प्रेम तिने चिरकाळ टिकवलंय.. निःस्वार्थ पद्धतीने जसे ते दोघ इतके वर्ष एकेमकांशी जगले, बहरले त्यांचे प्रेम त्यांनी वृद्धिंगत खरं केले..💕💕💕💕💕


अनुया अशोक चव्हाण 

disclaimer 
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments