अनुबंध- एका प्रेमाची गोष्ट - नीलम कर्पे

अनुबंध- एका प्रेमाची गोष्ट

नीलम महेश कर्पे

कथेचे नायक आहेत चिन्मय आणि नायिका आहे निलाक्षी

चिन्मय आणि निलाक्षी एकाच ऑफिसला काम करत होते फक्त त्यांचे विभाग वेगवेगळे होते.ते दोघे एकमेकांना ओळखत पण नव्हते. एकमेकांशी काहीच संबंध नव्हता त्यांचा. असेच दिवस चालले होते. दिवाळीच वेळी ऑफिस मध्ये बोनस देऊन मालकाने सगळ्या स्टाफ साठी पार्टी ठेवलेली रिलॅक्स होण्यासाठी. त्या पार्टीला सगळेच येणार होते. निलाक्षी पण निघाली होती. वाऱ्यावर भुरभूरनारे केस, हाई हिल्स, नाजूक सुंदर हातात तेवढीच नाजूक छानशी पर्स. चेहऱ्यावर केलेला हलकासा मेकअप, गुलाबी ओठ आणि कोरलेल्या भुवया त्यात ते काजळ लावलेले काळेभोर डोळे अहाहा....जणू निसर्गाची सारी सुंदरतेची उधळण तिच्यावरच केलेली. फारच सुंदर दिसत होती ती. 

एवढयात तिचा फोन वाजला तिनं मोबाईल हातात घेतला आणि एक गोड स्माईल करतच तिनं फोन कानाला लावला आणि हळूच मानेला झटका देत बोलली..." अगं हो आलेच आहे ,पार्किंग मध्ये आहे गाडी लावलीय येतच आहे हो थांब. आलीच पाच मिनटात" म्हणत तिनं फोन पर्स मध्ये टाकला आणि ती लिफ्ट जवळ पोचली. थोडा वेळातच ती पार्टीच्या ठिकाणी पोचली. तिथं गेल्यावर हॉलच्या दरवाजातून तीची नजर तिच्या मैत्रिणींना शोधत होती.पण खूप साऱ्या नजरा तिच्यावरच खिळून आहेत यापासून ती अनभिज्ञ होती. तिच्या मैत्रिणींनी तिला आवाज दिला " नीला अग ईकडे", त्यांना बघताच नीलाक्षीच्या चेहऱ्यावर छानस हसू उमटलं न ती त्यांच्याकडे गेली. की

तिची मैत्रीण जेव्हा तिला आवाज देत होती तेव्हा चिन्मयच लक्ष पहिल्यांदा नीलाक्षीकडे गेल आणि तो पाहतच राहिला. तिचं हसणं , केस हळूच हातानं मागे सारण, उगाच कानातल्या झुमक्याना नीट करणं. बराच वेळ तिला तो निरखत होता . त्याला ती आवडली होती. असा काहीतरी पहिल्यांदा होत होत त्याचा सोबत. तो सतत त्यांचा घोळक्याच्या आजूबाजूने ये जा करत होता तिला पाहण्याचा आणि तीचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होता. हॉल मध्ये काय कार्यक्रम सुरू आहे याकडे त्याच काहीच लक्ष नव्हता. एवढ्यात त्यानं त्याचं नाव स्पीकर वर ऐकलं . त्याला त्या वर्षी चा 'बेस्ट परफॉर्मर ' हा अवॉर्ड मिळाला होता. त्यासोबत च इनक्रीमेंट होऊन त्यांनी बदली नीलाक्षी च्या डिपार्टमेंट ला झाली होती. सगळे येऊन त्याच अभिनंदन करत होतें त्यात नीलाक्षी आणि तिचा ग्रुप सुद्धा होता. तो आज भलताच खूष होता.पूर्ण त्याचा स्वभावाच्या विरुद्ध वागत होता.

    चिन्मय तसा शांत मुलगा होता.आपला काम आणि आपण यातच तो गुंग असायचा. ही त्याची पाहीलीच कंपनी होती आणि इनक्रीमेन्ट सुद्धा. त्याचा घरी सुद्धा तो शांत च असायचा. त्याची आई आणि त्याची लहान बहीण एवढंच त्याच जग होता. वडील लहानपणीच गेल्यामूळ तो त्याच्या वयाच्या आधीच जबाबदार झाला.त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वावर फरक पडला. तो नेहमीच शांत ,विचारी असाच राहिला . मित्रांशी पण तो थोडं अंतर ठेवूनच होता .त्याचा मनातलं तो कुणा जवळच बोलत नव्हता.

   त्या उलट नीलाक्षि होती. तिला एक मोठा भाऊ होता आणि आई वडीलांच लाडकं शेंडेफळ होती ती. सगळेच तिची फार काळजी घ्यायचे आणि प्रेम करायचे तिच्यावर. तरी ती फार हट्टी मुलगी नव्हती समजूतदार होती.खूप मैत्रिणी होत्या तिच्या. मित्र मैत्रिणीनं सोबत फिरायला जायचं, खरेदीला जायचं ,बाहेर जेवायला जायचं छोट्या मोठ्या पार्टी ला जायला तिला आवडायचा. सगळं करायची पण एका मर्यादेत राहून करायची. " एक ही तो जिंदगी हैं अपनी", म्हणत आनंदी राहायची. तिचा ही हा पहिलाच जॉब होता. कामात ती हुशार होती . कंपनीन तिला परमनंट करून घेतला होता .घरी तिचा लग्नाच बघायला सुरू करूया असे म्हणत होते पण ती आताच तयार नव्हती. ' थोडं थांबू या '

असा ती म्हणत होती.

 चिन्मय त्याचा नवीन डिपार्टमेंटला जॉईन झाला. हळूहळू सगळ्यांशी त्याची ओळख झाली . तो निलाक्षि चा हेड होता. आता त्यांचा कामामूळ एकमेकांशी संपर्क वाढला होता. ते आता थोडाफार काम सोडून पण बोलू लागले होते. मैत्री सुद्धा झाली होती . हळू हळू गाडी पुढे सरकत होती कारण नीलाक्षीला चिन्मय आवडू लागला होता फक्त तिला अजून ते जाणवलं नव्हतं.

 रोजचं दिनक्रम सुरू असताना नीलाक्षीचे काका तिच्या साठी स्थळ घेऊन आले . तो मुलगा बाहेर देशात जॉब करत होता.भारतात थोड्याच दिवसासाठी आला होता. त्यानं नीलाक्षीला एका मंदिरात पाहिलं होतं आणि आता त्याला तिच्याशीच लग्न करायचं होतं. त्यांचा बघण्याचा कार्यक्रम झाला घरचा घरी साखरपुडा पण केला आणि दोन महिन्यातच लग्नाची तारीख काढली. नीलाक्षी खूप खूष नसली तरी दुःखी सुद्धा नव्हती. आज न उद्या लग्न तर करायच आहे मग करूया अशा विचार करून ती हो बोलली.

'मदन' हा नीलाक्षीचा होणारा नवरा असतो.ते दोघे एकमेकांना ओळखायचा दृष्टीने भेटत होते.मदनचा स्वभाव जरा वेगळा होता .तो नीलाक्षी कडे एकटक पाहत राही. मधेच तिचा फोन घेऊन चेक करत असे. तिचा फोन मधले तिचे फोटोज् बगून म्हणत असे ", हे असे कपडे का घातलेस? कुणाला दाखवतेस." अस काहीबाही बोलून तिला त्रास देत असे. ती रडत बसायची. घरी तर सगळे फार खूष होते. काका काकू तर मुलाकडचे गोडवे गाताना थकत नव्हते त्यामुळं आई बाबा दादा फार खूष होते.तिला समजतच नव्हता काय करूया.

एक दिवस ऑफिस मध्ये मदनचा कॉल आला. तिनं तो घेतला . आदल्याच दिवशी ते सगळे मदन च्या घरी जेवण करायला गेले होते . तर ",तिथं तू माझ्या आई वडीलांच्या आल्या आल्या पाया नाही पडलीस , माझ्या आई ला गेल्या गेल्या मदत नाही केलीस स्वयंपाक करायला." स्वयंपाक तर त्यांचा मावशी चारू ताई करत होत्या. मदनची आई नुसत्या बसलेल्या होत्या. तो म्हणत होता माझी आई म्हणते " जर ती असाच राहणार असेल तर इथ चालणार नाही, इथल्या पद्धतीनं मी म्हणेल तसाच राहावं लागेल तिला सांग ." " बस म्हणेल तर बसायचं आणि उठ म्हणेल तर उठायचं" अशी राहायची तयारी असेल तर लग्नाला हो म्हण नाहीतर अशा खूप मुली आपण तुझा साठी बघू " .आणि मदन हे सगळं फोन करून नीलाक्षीला सांगत होता. ती घाबरली .तिला तिचं भविष्य दिसत होता पण लग्नाची अर्धाच्यावर तयारी झाली असताना नाही कस म्हणायचं. आई बाबा नाही तयार झाले लग्न मोडायला तर काय करायचं ह्या विचारानं तीच डोकं सुन्न झाला. 

ती तशीच विचार करत तिचा टेबल वर बसली होती. आज सगळा स्टाफ कसला तरी नाटकं बघायला लवकर सुट्टी घेऊन गेला होता. चिन्मयला असल्या गोष्टी आवडत नव्हत्या म्हणून त्यानं नकार दिला. तो त्याज काम आवरून निघाला होता तर जाताना त्यानं नीलाक्षीला रडताना पहिला. तो लगेच तिच्याकडे गेला. त्यांची मैत्री झालीच होती. नीलाक्षी फार रडत होती तिला टेन्शन आलेलं. चिन्मयन तिला पाणी दिलं आणि तिला शांत होऊ दिलं. तिच्यासाठी तो कॉफी घेऊन आला ती शांत झाल्यावर तिला विचारलं, " नीलाक्षी काय झालंय? का रडत होतीस एवढं? कसला प्रॉब्लेम आहे? बोल." नीलाक्षी पहिल्यांदा तयार नव्हती पण काही मार्ग दिसेना म्हणून तिनं चिन्मयला सगळं सांगून टाकलं आणि मदन उद्या संध्याकाळी भेटायला बोलवतो आहे हे पण सांगितलं . चिन्मयन नीलाक्षी ला शांत करून तिचा घरी सोडलं आणि "उद्या मदन ला भेटायला जा", असा तो जाताना म्हणाला . काहीतरी ठाम विचार करून चिन्मय रात्री झोपला. 

     नीलाक्षी रात्री सुद्धा रडत च होती. तिचा आई ला वाटलं पोरगी लांब जाणार मग तिला वाईट वाटतय म्हणून रडतेय. आईन तिला रात्री खूप वेळ थोपटून झोपवल तेव्हा ती झोपली.

दुसऱ्या दिवशी नीलाक्षी चिन्मय ची वाट पाहत होती. त्याला सांगणार होती," तू ह्यात पडू नकोस माझा नशीब आहे जे होईल ते होईल. घरी पण सगळे खुश आहेत माझ्या मूळ त्यांना अजून त्रास नको.मी करेन हे लग्न".चिन्मय आज जरा उशीरा च ऑफिस ला आला . आल्यावर त्यानं स्वतःला कामात बुडवून घेतला .नीलाक्षी पण तिच्या कामात गुंतून गेली. संध्याकाळी ऑफिस सुटायचा टायमिंग ला तिला मदन चा कॉल आला ," ऑफिस च्या खाली ये मी आलोय". नीलाक्षी च्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. तिनं पटकन तिज आवरला आणि ऑफिसच्या खाली गेली. मदन आज बाईक वर आला होता. तिला दरडावून म्हणाला,"बस आणि जरा चिकटून बस." नीलाक्षीला त्याचा बोलण्या ची किळस वाटली . तिथून पळून जावं असा वाटला पण ऑफिस समोर तमाशा नको म्हणून ती त्याचा बाईक वर अंतर ठेवून बसली तर त्यानं तिला खसकन ओढून जवळ खेटून घेतला आणि खूप वेगात बाईक उडवत तो निघून गेला. नीलाक्षी घाबरून डोळे गच्च बंद करून बसलेली. 

तो तिला घेऊन एका पब मध्ये गेला . तिथं बरेच मुलं मुली दारू पिऊन डान्स करत होते, सिगारेट ओढत होते. असा कोंदट वातावरण होत आतमध्ये आणि संगीत पण कोणता तरी इंग्लिश गाणं वाजत होता.

नीलाक्षीला तिथं अजिबातच आवडल नाही. मदन आणि ती आत जाताच मदन चा ग्रुप तिथं आला. सगळ्यांना हाय हॅलो करून झाल्यावर नीलाक्षी एका कोपऱ्यात बसली .मदन त्यांचा मैत्रिणीन बरोबर हिडीस डान्स करत होता , इथ तिथं त्यांना हात लावत होता. एवढ्यात एक मदनचा मित्र 

नीलाक्षी जवळ आला आणि तिला डान्स करायला ओढून घेऊन जाऊ लागला.नीलाक्षी त्याला नाही म्हणत होती तरी तो तिला हाताला धरून ओढत होता ती त्याला जोरात ढकलत होती तसा तो तिला अजूनच जवळ ओढत होता. ती त्याला नाही म्हणतेय म्हणून त्यानं रागा न तिच्या कड पाहिलं आणि तिचे केस हातात धरून तिचा चेहरा स्वतःचा. समोर घेतला आणि तिला किस करायचा प्रयत्न करू लागला तस नीलाक्षीन त्याला जोरात ढकलून त्याचा प्रायव्हेट पार्ट वर जोरात लाथ दिली. तो खाली पडला आणि मदन तिथं आला तर तो त्याला सांगू लागला,"मदन यार देख न इस लडकी ने इशारे करके मुझे बुलाया औंर मेरा किस भी ले रही थी मैने मना किया तो मुझे धक्का मारा . कैसी औरत हैं ये ". तो अस म्हणताच मदन नीलाक्षी जवळ आला न तिला म्हणलं ," माझी इज्जत घालवून टाकली तू. कसली घाणेरडी आहेस तू .माझ्या मित्रावर लाईन मारतेस ".अस म्हणून तिचा वर हात उचलणार इतक्या त्याजा हात वरचा वर कुणीतरी पकडला. 

  त्यानं नीलाक्षीला 'काय झालं ' असं एकदा सुद्धा विचारलं नाही. त्याचा हात पकडणारा चिन्मय होता. 

लगेच तिचे बाबा आणि दादा सुद्धा तिथं पोहोचले. चिन्मय सकाळी ऑफिस ला उशीरा आला कारण तो नीलाक्षीचा बाबाना सकाळी भेटायला गेला होता आणि सगळं त्यांना सांगितलं आणि प्लॅन करूनच दादा आणि बाबान तो इथे घेऊन आला. 

  नीलाक्षीच्या बाबांनी पुढे होऊन मदन च्या कानाखाली सणसणीत ओढली आणि लगेच त्याचा घरी फोन करून लग्न मोडला असा सांगितला.

नीलाक्षी बाबांना बिलगली आणि चिन्मयला "Thank you ", म्हणाली.

नीलाक्षीच्या बाबांनी घरी येऊन काका काकूची चांगली खरडपट्टी काढली आणि लग्नाचा विषय थांबवला. 

थोड्याच दिवसा नंतर चिन्मय स्वतः च नीलाक्षीच्या घरी आला लग्नाची बोलणी करायला. ह्यावेळी नीलाक्षीने स्वतःहून प्रेमानी होकार दिला. धूमधडाक्यात त्यांचं लग्न पार पडलं. आणि चिन्मय ला त्याची नीलाक्षी मिळाली.


नीलम महेश कर्पे

 

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments