नियती A story of true love - -Rupshree

 नियती - A story of true love 

 -Rupshree


 “ मॅडम..कुठे जायचं मॅडम..?? सामान दिसत आहे तुमच्याकडे..कॅब बुक करून देऊ का..??” श्रीनगर स्टेशनवर एकट्याच बसलेल्या रिद्धीला बघत एक कुली म्हणाला..त्याने तिच सुटकेस उचलण्यासाठी हात पुढे केला तस रिद्धीने सुटकेसच हॅन्डल पडकून मागे खेचलं..तीने त्याच्याकडे न बघताच मान नकारार्थी हलवत त्याच्या प्रश्नाचं उत्तर न बोलताच दिल..तस तो कुली दुसऱ्या प्रवाश्याच सामान उचलायला धावला..

 रिद्धी काहीवेळापूर्वी दिल्लीवरून श्रीनगरला ट्रेनने आली होती..ट्रेन तर कधीच येऊन प्लॅटफॉर्मला थांबली होती;पण ती ज्याची वाट पाहत होती तो मात्र अजून तिथे पोहचला नव्हता..कधी आपल्या फोनकडे तर कधी आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांकडे बघत रिद्धी तब्बल पाऊण तास स्टेशनवरच बसून होती..

 कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या, एका साध्या शाळेत शिक्षिका असणाऱ्या रिद्धी पाटीलने मोठ्या धाडसाने कोल्हापूर ते श्रीनगर अंतर कापलं होत..श्रीनगरला येण्यासाठी तिला काय-काय करावं लागलं होत..किती त्रास सहन करावा लागला होता हे फक्त तिलाच माहिती होत..जवळपास एका वर्षाने ते दोघे प्रत्यक्षात भेटणार होते..

 म्हणतात ना प्रेमात खूप ताकद असते..प्रेमात पडलेला व्यक्ती कोणतंही अग्निदिव्य सहज पार करू शकतो..त्याच वाक्याला सत्यात आज रिद्धीने उतरवलं होत..ती श्रीनगरला तिच्या प्रेमाला म्हणजे आदित्यला भेटायला आली होती..तिचा आदित्य हा एक आर्मी ऑफिसर होता..शाळेत अंकुर फुटलेल्या त्यांच्या प्रेमाला कॉलेजमध्ये बहर आला होता..नेमकं त्याचवेळी आदित्यला आर्मी जॉईन करावी लागली..त्याने लहानपणापासून जे स्वप्न पाहिलं होत ते पूर्ण होताना पाहून रिद्धीनेही त्याला अडवलं नाही..अधूनमधून त्याच फोनवर,व्हिडिओ कॉलवर बोलणं होत असायचं..पण दोन दिवसापूर्वी रिद्धीने आदित्यला कॉल करून ती श्रीनगर येतेय असं सांगितलं..आणि आदित्यला थोडासा शॉकच बसला..

 त्याने तिला कारण विचारलं;पण तिने नीट काही उत्तर दिल नाही..कारण ती त्या अवस्थेतच नव्हती..कॉलवर तिचा आवाज लो साऊंड करत होता..म्हणून आदित्यनेही तिला पुढे काही विचारलं नाही..त्याला तिची काळजी वाटत असली तरी ती प्रत्यक्ष त्याच्या समोर आल्याशिवाय त्याला कारण कळणार नव्हत..म्हणून त्याने सध्या शांत राहण्याचं ठरवलं..

 “ रिद्धी sss..” रिद्धीला एका बेंचवर बसलेल बघून आदित्यने तिला हाक मारली..तस पटकन वळून त्याच्याकडे बघत ती उभी राहिली..तो धावत तिच्याकडे येऊ लागला..जस-जस तो तिच्याजवळ येऊ लागला तस-तस त्याच्या धावण्याची गती मंदावली..कारण होत रिद्धीच्या शरीरावरचे घाव..!!

 रिद्धीच्या डाव्या हाताला आणि पायाला पट्ट्या बांधल्या होत्या..चेहरा आणि डोळे सुजले होते..तिचे डोळे बघून ती रडली होती हे समजायला आदित्यला वेळ लागला नाही..तिचा कोमेजलेल्या चेहरा बघून आदित्यला कसतरीच झालं..त्याचे डोळे आपोआप ओलावले..

 “ रिद्धी..हे सगळं..काय झालं तुला..ह्या जखमा..” आदित्यने तिचा जखमी झालेला हात आपल्या हातात घेत म्हंटल..तिला आपल्या समोर बघून त्याला गहिवरून आल होत..

 “ आदित्य पटवर्धन..!! कॅप्टन आदित्य पटवर्धन..!!” रिद्धीच त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं..त्याला बघताच तिचे डोळे पाणावले होते..तिने मोठ्या प्रेमाने त्याच्या छातीवर लावलेल्या नेमप्लेटवर आपला हात फिरवला..

 “ ह्या आर्मीच्या युनिफॉममध्ये खूपच हँडसम दिसतोस रे तू आदी..तुला बघतच राहावंसं वाटतंय..आदी,खूप मिस केलं रे मी तुला..खूप मिस केलं..” असं म्हणत रिद्धीने डोळ्यातल्या पाण्याला गालावर ओघळून देत स्टेशनवर वावरणाऱ्या माणसांची पर्वा न करता सरळ त्याला मिठी मारली.. त्यानेही तिच्याभोवती आपले हात गुंफत तिला मिठीत घेतलं..

 “ मीही तुला खूप मिस केलं रिद्धी..” आदित्यने तिला आणखी घट्ट मिठीत आवळल..तशी ती कळवळली..

 “ आह्ह..आदी..!!” तिचा वेदनेने भरलेला आवाज त्याच्या कानी पडताच त्याने तिला आपल्या पासून दूर करत तिच्या चेहऱ्याकडे काळजीने पाहिलं..तिचा वेदनेने भरलेला चेहरा त्याच्या मनाला त्रास देऊन गेला..

 “ रिद्धी नक्की काय झालंय तुला.इतका मार कसा लागला तुला..?? आणि तू इथे अशी अचानक कशी आलीस..??” आदित्यने उभ्या-उभ्याच तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करायला सुरुवात केली..

 “ सगळं इथेच विचारणार आहेस का..?? तू माझ्या राहण्याची व्यवस्था जिथे केली आहेस तिथे घेऊन चल आधी..खूप थकले आहे मी..तिथेच जाऊन बोलूया..” रिद्धीने त्याच्या प्रश्नाची उत्तर देणं टाळत आपली हॅन्डबँग खांद्याला अडकावली..एक बॅग हातात घेत दुसऱ्या हाताने सुटकेसच हॅन्डल धरणार तोच आदित्यने तिच्या खांद्यावरची हॅन्डबँग काढून आपल्या खांद्याला लावली..तिच्या हातातली बँग सुटकेसवर ठेवून त्याने एका हाताने तिचा हात पकडत दुसऱ्या हाताने सुटकेसच हॅन्डल खेचायला सुरुवात केली..रिद्धीलाच्या पायाला लागल्यामुळे ती लंगडत होती..आदित्यने तिला कुणाचा धक्का लागू न देता काळजीपूर्वक स्टेशनच्या बाहेर आणलं..कारमध्ये बसत त्याने कार घराच्या दिशेने वळवली..

 कारमध्ये बसल्यावरही रिद्धी शांतच होती..आदित्यच्या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागू नयेत म्हणून तिने उगाच आपले डोळे झाकून घेतले..काहीवेळात आदित्यने कार एका घरासमोर उभी केली.. घर तस छोटस होत;पण आजुबाजुचा सुंदर निसर्ग त्याची शोभा वाढवत होता..ते घर मेनसिटी पासून जरा लांबच होत.. फार शांतता होती तिथे..ते घर आणि तो शांततेची चादर पांघरून बसलेला निसर्ग पाहून रिद्धीचा प्रवास थकवा आणि मनावरची मरगळ काही अंशी दूर झाली..

 “ कुणाच घर आहे आदी हे..?? आपण हॉटेलमध्ये थांबणार होतो ना..??” रिद्धीने त्याच्याकडे गोंधळून पाहिलं..

 “ मित्राच घर आहे माझ्या..ही कारही त्याचीच आहे..त्याची आई मागच्या वर्षीच वारली..तेव्हापासून हे घर खालीच आहे..जिगरी मित्र आहे माझा..तू येणार आहेस असं कळताच चावी काढून माझ्या हातात ठेवली..म्हणाला भाभीला आपल्या घरी घेऊन जा..मी एकदा-दोनदा आलो होतो इथे..तुला जस आवडत तसंच शांत वातावरण आहे इथे..जास्त वस्तीही नाही जवळपास..म्हणून मी त्याला नकार देऊ शकलो नाही..जेव्हापासून आर्मी जॉईन केली आहे तेव्हापासून तुझ्यासोबत जास्त टाइम स्पेंड करायला मिळालाच नाही..तुही कधी तक्रार केली नाहीस..पण आता तुझ्यासोबत भरपूर वेळ घालवायचा आहे मला.. खूप काही बोलायचं आहे..तेही अगदी निवांत बसून..!! इथे तुझा तो कंस मामा नाही आपल्याला त्रास द्यायला..

 तू येणार आहेस म्हणून कालच घर साफ करून घेतलं मी..आली आहेस तर आठवडाभर राहशील ना माझ्यासोबत..!! तुझ्यासाठी एका आठवड्याची सुट्टी काढली आहे मी..” आदित्यने तीच सामान कारच्या डिकीमधून काढत म्हंटल..त्यावर तीने हलकंस स्मित केलं..

 आदित्यने रिद्धीला घरात घेऊन जात दार लावून घेतलं..रिद्धी घरभर नजर फिरवत सोफ्यावर जाऊन बसली..

 “ पाणी..आवडलं घर..!!” आदित्यने पाण्याचा ग्लास पुढे करताच रिद्धीने तो एका दमात संपवला..

 “ तुला भूक लागली असेल ना.. तू फ्रेश हो..मी काहीतरी बनवतो तुझ्यासाठी..” तिच्या गालावर हात ठेवत आदित्य किचनकडे वळणार तोच रिद्धीने रडत त्याला पाठीमागून मिठी मारली..

 “ आदी, मी सगळं काही सोडून तुझ्याकडे आले आहे रे..मला परत घरी जायचं नाही..मला तुझ्याजवळ ठेवून घे..आपण लग्न करूया..माझ्या काही जास्त अपेक्षा नाहीत तुझ्याकडून..तू ठेवशील तिथे राहीन मी..अर्ध्या भाकरीतही समाधान मानीन मी..पण मला आता स्वतःपासून वेगळं करू नकोस..” रिद्धीच्या डोळ्यातल पाणी कमी होण्याचं नावच घेत नव्हतं..

तिच्या आवाजात जाणवणाऱ्या दुःखावरून तिने असं अचानक घर सोडण्याचं काहीतरी नक्कीच मोठं कारण असेल हे कळून चुकताच आदित्यने तिच्या हाताला धरून तिला आपल्यासमोर उभं केलं..तिला पुन्हा सोफ्यावर बसवत तो तिच्या पायाशी मांडी घालून बसला..

“ लग्न करायचं आहे तुला..करूया आपण..तुला तुझ्या घरी परत जायचं नाही..तर तेही ठीक आहे..पण आधी मला कारण सांग..तुला इतका मार कसा लागला तेही सांग..” आदित्यने रिद्धीचे डोळे प्रेमाने पुसले..

“ आदी,तुला तर माझ्या मामाबद्दल सगळं माहिती आहे..एक नंबरच्या दारुडा आणि जुगारी आहे..आई-बाबा गेल्याच्यानंतर मला मामीनेच आईची माया दिली..मामा दुष्ट होता पण मामीने खूप जीव लावला मला..आपल्या गावातल्या दारूचा ठेकेदार हितेश साळूंकेने मला लग्नाची मागणी घातली..माझ्यासोबत लग्न लावून देण्याच्या बदल्यात तो मामाने आतापर्यत दारू आणि जुगारासाठी ज्या लोकांचं कर्ज घेतलं होत ते तो चुकवणार होता..म्हणून मामाने त्या नालायक माणसासोबत माझं लग्न ठरवलं..पण मी स्पष्ट नकार दिला..तुझ्यावर माझं प्रेम आहे आणि तुझ्याशी मी लग्न करीन असं सांगून टाकलं मी त्यांना..आपली जात वेगळी आहे म्हणून मामाने नकार देत मला बेल्टने खूप मारलं..मामी वाचवायला मध्ये आली तर तिलाही मार बसला..

पुढचे दोन-तीन दिवस घरात हाच तमाशा सुरु होता..एका रात्री मामाने मामीला तिच्या भावाच्या ऍक्सीडेन्टबद्दल सांगितलं..मामी तुरंत आपल्या माहेरी गेली..पण तो सगळा ट्रॅप होता..मामाने मुदामून मामीला माझ्यापासून दूर केलं होत..त्या रात्री त्याने त्या हितेशला माझ्या रूममध्ये पाठवलं..आणि तो स्वतः बाहेर दारू पीत पहारा देत बसला..त्या हितेशने मी लग्नाला नकार दिला म्हणून माझ्या अब्रूवर हात टाकला..मी स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या डोक्यात फुलदाणी घातली..त्याच डोकं फोडलं मी..नेमकं त्याचवेळीस मामी घरी आली..मामाचा खोटेपणा तिच्या समोर आला तसच ती घरी परतली होती..हितेशला बेशुद्ध पडलेलं बघून मी आणि मामी दोघेही खूप घाबरलो होतो..मामाची तर कधीच दारूने शुद्ध हरवली होती..

मामी मला आधीच घरातून पळवण्याच्या तयारीत होती..तिने आधीच सगळी तयारी करून ठेवली..माझं सगळं सामान पॅक करून ठेवलं होत तिने..माझ्या हातात गोव्याला राहणाऱ्या तिच्या एका जुन्या मैत्रिणीचा नंबर आणि काही पैसे देत तिने मला त्याच रात्री तिथून जायला सांगितलं..मी गोव्यालाच जाणार होते..पण मन तुझ्याकडेच धाव घेत होत..मामीने दिलेले पैसे आणि माझी काही सेविंग मिळून इतके पैसे तर होते कि मी तुझ्यापर्यत येऊ शकत होते..खूप लांबचा पल्ला गाठत मी इथं पर्यत पोहचले आहे आदी.. आता मला तुझ्यापासून दूर करू नकोस..” रिद्धी ओजळीत चेहरा लपवत ढसा-ढसा रडू लागली..

तीची कहाणी ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावरचे हाव-भाव झरझर बदलत होते..त्याला तिच्या दारुड्या मामाचा आणि त्या हितेशचा खूप राग आला होता..नकळतच त्याच्या हाताच्या मुठ्या आवळल्या गेल्या..पण रिद्धीची अवस्था बघून त्याने आपला राग आवरत तिला आपल्या मिठीत घेतलं..

“ इतकं सगळं झालं तुझ्यासोबत..एक कॉल करता आला नाही का तुला..??” आदित्यने तिच्या केसातून हात फिरवत किंचित चिडून म्हंटल..

“ दोघीनेचे फोन तोडले होते मामानी..नशीब सिमला काही झालं नव्हतं..गावातून बाहेर पडताच मी दुसरा फोन घेतला..तुला सगळं सांगायचं होत पण भेटून..” रिद्धी त्याच्या मिठीत मुसमुसत म्हणाली..

“ आदी,लग्न करशील ना माझ्याशी..??” रिद्धीने त्याच्या मिठीतुन बाहेर पडत त्याच्या डोळ्यात बघत विचारलं..

“ तुला विश्वास नाही का माझ्यावर..??” त्यानेही तिच्या नजरेत आपली नजर रुतवत उलट प्रश्न विचारला..

“ आहे रे..म्हणून तर सगळं काही सोडून तुझ्याकडे आले ना..” रिद्धीने खाली मान घालत म्हंटल..

“ तुझ्याशी नाही तर कुणाशी लग्न करणार..वेडाबाई प्रेम आहे तुझ्यावर माझं...लग्नही तुझ्याशीच करणार मी..पण आधी एकदा आईच्या कानावर घालावं लागेल मला..सध्या तिची तबेत खराब असते..माझ्या काकाकडे असते ती..असं अचानक नाही सांगता येणार तिला..आपल्या जाती वेगवेगळ्या असल्यामुळे ती आधी नकारच देईल..पण मी मनवून आपल्या लग्नासाठी तयार करीन तिला..तू नको काळजी करुस..” आदित्यने रिद्धीचा चेहरा आपल्या ओजळीत घेत म्हंटल..

“ आणि आई नाही तयार झाल्या तर..??” हा प्रश्न विचारताना रिद्धीच्या डोळ्यात भीती दाटून आली होती..कारण तिला माहिती होत कि आदित्य आपल्या आईचा शब्द कधीच मोडत नाही..

“ कशी तयार नाही होणार..तिला इतकी गुणांची सून शोधून ही सापडायची नाही..टस्ट मी..!!सगळं ठीक होईल..” आदित्यने तिच्या माथ्यावर आपले ओठ प्रेस केले..तिच्या डोळ्यातला ठामपणा बघून रिद्धीने पुढे त्याला काहीच विचारलं नाही..

तिला थोडस भरवून आदित्य तिला डॉक्टरकडे घेऊन गेला..तिच्या अंगावर उठलेले बेल्टचे वळ बघून त्याच्या काळजाचा पाणी-पाणी होत होत..पुढचे दोन दिवस आदित्य तीची खूप काळजी घेत होता..तिला थोडस बर वाटू लागला तस तो तिला जवळच्या एका ठिकाणी फिरायला घेऊन गेला..ती वरून-वरून ठीक दिसत होती;पण आतून हितेशने तिच्यावर केलेली जबरदस्ती तिच्या डोक्यातून जात नव्हती..ती घटना तिच्या मेंदूवर गहिरी छाप सोडून गेली होती..तिच्या चेहऱ्यावरून आदित्यला तिच्या मनात काय चाललंय ह्याचा पुरेपूर अंदाजा आला होता.. तो तिला अनादी ठेवण्याचा प्रयत्न देखील करत होता.. पण त्याच्या प्रयत्नाला हवं तस यश येत नव्हतं..

आज त्यांनी बाहेरच जेवण केलं..आदित्यला तिथली बहुतेक लोक ओळखत होती..तो सगळ्यांना रिद्धीला आपली बायको म्हणून ओळख करून देत होता..लोक त्या दोघांच्या जोडीच कौतूक करायचे अन् रिद्धी मनोमन आनंदून जायची..आदित्य सारखा जोडीदार दिल्याबद्दल तिने कितीतरी वेळा आपल्या देवाचे आभार मानले असतील..

ते दोघे घरी येत असतानाच नेमकं तिथे स्नोफॉल सुरु झाला..रिद्धी आयुष्यात पहिल्यादा स्नोफॉल बघत होती..ती दोन्ही हात पसरून हातावर स्नो झेलत गिरक्या घेत होती..तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याजोगा होता..आदित्य मात्र दुरूनच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद नजरेने टिपत मनात साठवून ठेवत होता..स्नोल फॉल वाढला तस आदित्य रिद्धीला जबरदस्ती ओढत घरात घेऊन गेला..

बाहेर प्रचंड थंडी वाढली होती..आदित्यला इथल्या गार वातावरणाची सवय झाली होती..पण रिद्धीला त्या वातावरणाशी जुळवून घेताना नाकी नऊ आले होते..ती झोपली तस आदित्य हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर येऊन झोपला..त्या दोघांच्या प्रेमाला सात वर्ष झाली असली तरी त्यांनी आपल्या मर्यादा कधी ओलांडल्या नव्हत्या..

आदित्यला झोपून एक-दीड तासच झाला असेल..तो आपली कूस बदलत होता तेवढ्यात त्याच्या कानावर रिद्धीच्या ओरडण्याचा आवाज आला..तो ताड्कन उभं राहत तिच्या रूमकडे धावला..ती झोपतेच ओरडत होती..” सोड मला..सोड..जवळ नको येऊ माझ्या.. दूर हो माझ्यापासून…” 

तिचे बंद डोळे बघून ती वाईट स्वप्न बघतेय हे त्याला समजलं..त्याने पटकन तिला उठवत आपल्या मिठीत घेतलं..ती आताही ओरडत होती..आदित्यला हितेश समजून स्वतःपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करत होती.. 

“ रिद्धी sss..डोळे उघड..मी आहे..आदित्य..” आदित्यने तिच्या खांद्याला पकडून गदागदा हलवले तस तिने आपले डोळे उघडत त्याच्याकडे पाहिलं..तिचे डोळे टच भरून आले होते..तिचा रडवलेला चेहरा बघून आदित्यलाही गहिवरून आलं..

“ जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न कर रिद्धी..तू इतकी तर कमजोर नाहीस..” आदित्यने रिद्धीचा चेहरा ओजळीत घेत म्हंटल..तस तिने ओठ काढून रडायला सुरुवात केली..

“ मी काय करू आदी..मी प्रयत्न करतेय विसरायचा..पण नाही होत आहे रे माझ्याने..त्याच्या स्पर्श आठवून किळस येते मला..डोळे बंद केले तरी तोच प्रसंग आठवतोय मला..गेले कितीतरी दिवस मला धड झोप लागली नाही..भले माझ्यासोबत काही वाईट झालं नाही..पण त्या माणसाने अगदी जनावरासारखं ट्रीट केलं मला..तो अक्षरशः ओरबडत होता मला..ते सगळं आठवलं कि खूप त्रास होतोय आदी मला..खूप त्रास होतोय..” रिद्धी आदित्यच्या मिठीत शिरत आपली व्यथा त्याला सांगू लागली..

“ शु sss..शांत हो..मी आहे ना तुझ्यासोबत..” आदित्यला तिला कस शांत कराव तेच कळत नव्हतं..तिच्या दुःखाची जाणीव त्यालाही होत होती…तिच्या दुःखात त्याच मनही आक्रोश करत होत..काहीवेळ तो तिला तसाच मिठीत घेऊन बसला होता..रात्र वाढत चालली तस त्याने तिला झोपायला सांगितलं..तो सोफ्याकडे वळणार तोच रिद्धीने त्याचा हात पकडला..तिच्या डोळ्यातले भाव आदित्यच्या हृदयाच ठोके चुकवून गेले..

“ आदी ह्याआधी मी तुला कधी काही मागितलं नाही..आज काही मागितलं तर देशील का..??” रिद्धीने त्याचा हात घट्ट धरून ठेवत त्याच्या डोळ्यात बघत विचारलं..त्यावर त्याने आवढा गिळत फक्त मान हो मध्ये हलवली..

“ मला तुझा स्पर्श हवा आहे आदी..मला आज तुझी व्हायचं आहे..प्लिज नको म्हणू नकोस..लग्न तर होणारच आहे आपलं..तसही आपण आधीच मनाने एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारलं आहे..लग्न फक्त समाजासाठी करायचं आहे आपल्याला..मनाने तर आपण कधीच एक झालो आहोत..” रिद्धीने तिने केलेली मागणी चुकीची नाही हे मोजक्याच शब्दात आदित्यला समजावून देण्याचा प्रयत्न केला..

“ आदी,त्या दिवशी जर हितेशने माझ्यासोबत काही वाईट केलं असत तर तुझी शपथ मी जीव दिला असता..माझ्यावर,माझ्या मनावर,माझ्या शरीरावर आणि माझ्या प्रत्येक श्वासावर फक्त तुझा आणि तुझा अधिकार आहे..तुझ्याशिवाय कुण्या दुसऱ्या पुरुषाचा मी विचार देखील करू शकत नाही..तू नकार दिलास तरी मी रागवणार नाही..माझ्या मनाला जे वाटलं ते मागितलं मी तुझ्याकडे..मला चुकीच समजू नकोस..जा तू झोप जाऊन..” आदित्यला शांत उभं राहिलेलं बघून रिद्धीने खजील होऊन मान खाली घातली..तिला वाटलं त्याला तिच्या बोलण्याचा राग आला..

ती त्याला सॉरी बोलणार त्याआधीच त्याने तिच्या बाजूला बसत तिच्या ओठात आपले ओठ गुंतवले..तो पॅशीनेटली तिला किस करू लागला..आणि तीही त्याच्या स्पर्शात हरवून जाऊ लागली..त्याने तिला झोपवून आपला शर्ट काढून फेकून दिला..तिच्यावर ओणवा होत,तिची मान अन् तिच्या खोल गळ्याला आपल्या ओठानी ओलसर करत त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरू लागले..त्याच्या स्पर्शागणिक तिच्या अंगावर सरसरून शहारा येत होता..त्या मखमली स्पर्शाने तिच्या शरीरात उत्तेजना निर्माण होऊ लागली..बेडशीट मुठीत आवळत ती एखाद्या मासोळीसारखी तडपू लागली होती..

तिची परवानगी घेत आदित्यने तिचे कपडे उतरवायला सुरुवात केली..रिद्धीची आणि आदित्यची पहिलीच वेळ असल्याने दोघांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती जाणवत होती..रिद्धीच्या चेहऱ्यावर लज्जा आणि भीती असे समिश्रित भाव उमटले होते..

तिचा वाढलेला श्वास,वर खाली होणारे उभार,तीच ते निरागस मोहक रूप त्याला वेड लावत होत..तो हिपोनोटाइज झाल्यासारखा तिच्याकडे बघत होता..तीही त्याच ते बलदंड,पिळदार शरीर निखरण्यात हरवली होती..रात्र पुढे सरकू लागली तस त्या दोघांचीही मिलनाची ओढ वाढू लागली..आदित्य तिला जपत,फुलवत तिच्यावर स्पर्शरुपी प्रेमाचा वर्षाव करत होता..तिच्या ओठातून निघणारे मादक सुस्कारे त्याचा चेव वाढवून जात होते..तीही त्याच्या स्पर्शाने मोहरून जात त्याच्या पाठीवर आपल्या नखांचे ओरखडे उठवत होती..ती वेदनाही त्याला हवी-हवीशी वाटत होती..बाहेर थंडीने वातावरण गोठल होत तर रूममध्ये दोघांची उष्ण झालेली शरीरे एकमेकांना भिडून तापमान वाढवत होते..

अखेर एका क्षणाला आदित्यने स्वतःला तिच्यात झोकून दिल..तिच्या तोंडातून अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली..अन् त्याच क्षणी त्याने पुन्हा एकदा आपले ओठ तिच्या ओठात गुंतवले..त्याचा आवेग हळूहळू वाढू लागला तस तिची मिठी आणखी घट्ट होऊ लागली..तृप्ती आणि समाधानाचा परमोच्च बिंदू गाठत आदित्यने स्वतःला तिच्यात रीत करत आपला भार तिच्या अंगावर सोडून दिला..तिच्या माथ्यावर ओठ टेकवत तो तिच्यापासून दूर झाला..तिच्या शरीरावरचा भर कमी झाला तस तिने एक मोकळा श्वास घेतला..आपल्या जड झालेल्या श्वासांना नियंत्रणात आणत ती त्याच्याकडे बघून गोड हसली..तिच्या त्या स्माईलमुळे आदित्यच्या मनाला आणखी समाधान लाभलं..

दोघांच्याही अंगावर ब्लॅंकेट ओढवत त्याने रिद्धीला आपल्या मिठीत ओढून घेतले..त्याच्या मिठीत येताच रिद्धीने डोळे बंद करून घेतले..आज कित्येक दिवसाने तिला शांत झोप लागली होती..आदित्य कितीतरी वेळ तिलाच न्याहाळत होता..तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत असला तरी एक समाधान होत..आज त्याच्यामुळे तिच्यातल्या स्त्रीला परिपूर्णता मिळाली होती..आज पहिल्यादा तिने त्याच्याकडे काहीतरी मागितलं होत..कस नाही म्हणणार होता तिला तो..तिच्या शरीराला झालेल्या वाईट स्पर्शाला आपल्या प्रेमळ स्पर्शाने आदित्यने पुसून काढलं होत..तिला त्या सदम्यातुन बाहेर काढण्याचा त्याला एकच रस्ता दिसला आणि त्याने त्याच रस्त्यावर चालायचं ठरवलं..तिला बघत पहाटे-पहाटेच त्याला झोप लागली.. 

सकाळी जेव्हा रिद्धीचे डोळे उघडले..तेव्हा आदित्य तिला दिसला नाही..तिने खाली पडलेले कपडे अंगावर चढवले..अन् ती तशीच बाहेर आली..बाहेर अंगणात आदित्य कुणाशी तर फोनवर बोलत होता..त्याच्या अंगावर आर्मीची युनिफॉम होती..तिला बघताच त्याने फोन कट केला..

“ रिद्धी..बर झालं तू उठलीस..कश्मीर खोऱ्यात घुसपैठ्यानी घुसपेठ केली आहे..कदाचित मोठं युद्ध होण्याची संभावना आहे..आम्हाला सगळ्यांना सीमेवर तैनात होण्याचे आदेश मिळाले आहेत..मला आताच निघावं लागले..पण तू घाबरू नकोस..तुझी व्यवस्था मी केली..युद्ध सुरु होण्याआधीच तुला इथून मुंबईला जावं लागेल..तिथून माझ्या मामाचा मुलगा तुला माझ्या आईकडे घेऊन जाईल..आईशी मी बोललो आताच..थोडी नाराज आहे आपल्यावर..पण मी येईपर्यत तू घे तिला सांभाळून..तू आवरून घे एका तासात माझा माणूस तुला एअरपोर्टला सोडेल..इथे कधीही कर्फ्यू लागू शकतो.. मी नसताना तुझं इथे राहन सेफ नाही..” आदित्य एका दमात सगळं बोलून गेला..अन् रिद्धी स्तब्ध होऊन फक्त त्याच्याकडे बघत होती..

“ सॉरी,रिद्धी..तुला अश्या परिस्थिती सोडून जातोय..पण माझा नाईलाज आहे..मी माझं पूर्ण आयुष्य ह्या भूमीला समर्पित केलं आहे..जेव्हाही तिला माझी गरज लागेल,मला जावं लागेल..प्लिज मला समजून घे..” आदित्यने तिच्या गालावर हात ठेवत म्हंटल..

“ तू जा..तुझ्या कर्तव्याच्या मी आडवं येणार नाही..फक्त माझ्यासाठी सुखरूप घरी परत ये..मी वाट बघतेय तुझी इतकं लक्षात ठेव फक्त..” रिद्धीने त्याचा चेहरा आपल्या ओजळीत घेत त्याच्या माथ्यावर आपले ओठ टेकवले..अन् त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले..

रिद्धीशी मोजकंच बोलून आदित्यने जड मनाने तिचा निरोप घेतला..तिला अश्या अवस्थेत सोडून जातोय म्हणून त्याला वाईट वाटत होत..आणि आपल्यापेक्षा त्याने देशाला जास्त महत्व दिल म्हणून रिद्धीची छाती अभिमानाने फुलून आली होती..तो गेल्यावर रिद्धीनेही आपलं आवरून घेतलं..त्याच्या मित्राच्या मदतीने रिद्धी श्रीनगरवरून मुंबईला आली..तिथे आदित्यचा मामेभाऊ तिची वाट बघत आधीच उभा होता..

आदित्य तिथे सीमेवर लढत होता आणि इकडे रिद्धी त्याच्या नातेवाईकाच्या तुसडेपणाला बळी पडत  होती..आदित्य तिथे नसल्यामुळे घरातले सगळेच तिला घालूनपाडून बोलायचे..त्यात आदित्यच्या आई नेहमी अग्रेसर असायच्या..कहर तेव्हा झाला जेव्हा आदित्यची युद्धात शहीद होण्याची बातमी कळाली..एका बॉम्ब स्फोटमध्ये त्याच्या शरीर छिन्न-विचन्न झालं होत..तिरंगात लपेटून आलेले त्याच्या शरीराचे तुकडे बघून आदित्यच्या आईने धसका घेतला..त्यांनी अंथरुन पकडलं..सगळ्याजणांनी त्याच्या जाण्यासाठी रिद्धीला अपशकुनी ठरवत दोष लावले..तरीही त्याच्या आईची सेवा करण्यासाठी रिद्धी त्याच बोलणं सहन करत होती..एक दिवस त्याच्या आईचेही प्राण यमदेवाने हरले अन् रिद्धीचे हाल आणखी वाईट झाले..आदित्यच्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढलं..बिचारी कुणाला काहीच न सांगता कुठेतरी निघून गेली ते कायमची..!!

**************************************************

 पाच वर्षांनंतर,गोवा.. 

 “ मम्मा..ते बघ पप्पा..!!” चार वर्षाच्या आराध्यने एका दिशेला बघत बोट दाखवलं..तो आणि रिद्धी नुकतीच एका पार्कच्या समोर कॅबमधून उतरले होते…

 “ आरु..तू आजकाल जाम आगाऊ झाला आहेस हा..कुणालाही पप्पा म्हणतोस..शांत उभा राहा इथे..” रिद्धीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत कॅबवाल्याला पैसे दिले..तिने वळून पाहिलं तर तिथे आराध्य नव्हता..ती इकडे-तिकडे बघू लागली..आणि आराध्यला रस्त्याच्या मधोमध पळताना बघून तिच्या काळजात धस्स झालं..तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला धावत जात होता..समोरून एक टेम्पो येताना पहिला अन् आता मात्र तिची भीतीने पाचावर धारण बसली..

 “ आरु sss…” ती हातातली पर्स सावरत त्याच्या मागे धावली..ती त्याच्यापर्यत पोहचनार तोपर्यत तो टेंपोही त्याच्याजवळ येऊन पोहचला..तो टेम्पो त्याला टक्कर मारणार त्याआधीच कुणीतरी त्याच्या हाताला खेचुन त्याला आपल्याजवळ ओढलं..तो व्यक्ती त्याला घेऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला..ते दोघे पडले तस काही लोक त्यांना घेरा करून बघायला उभे राहिले.. 

 “ आरु..आरु..माझं बाळ..तू ठीक तर आहेस ना..कुठे लागलं का तुला..??” रिद्धीने धावत येऊन आराध्यला त्या माणसाच्या मिठीतुन खेचून घेत आपल्या छातीशी कवटाळलं..ती वेड्यासारखी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याचे मुके घेत होती..

 “ मम्मा..मी एकदम ठीक आहे..पप्पाने मला वाचवलं..” आराध्य रिद्धीचे डोळे पुसत म्हणाला..तस तिने न समजून त्याच्याकडे पाहिलं.. तिच्या डोळ्यातला प्रश्न बघून आराध्यने बोटाने एका व्यक्तीकडे इशारा केला अन् तिने अचंबित होऊन आपल्या तोंडावर हात ठेवून घेतला..ती व्यक्तीही तिच्याकडे पाणवणलेल्या डोळ्यांनी बघत होती..

  आ..आ..आदी..तू..तू..जीवंत आहेस.. तू जिवंत आहेस..” रिद्धी त्याचा चेहरा आपल्या ओजळीत घेण्यासाठी हात पुढे केला तो एक स्त्री हातात तीन वर्षाच्या मुलीला घेऊन धावत त्याच्याकडे आली..

आदित्य..कसे पडलात तुम्ही..?? लागल तर नाही ना तुम्हाला..” ती स्त्री त्याच्या बाजूला बसत त्याच्या हातापायाला कुठे लागलं आहे का ते चेक करू लागली..शिवाय त्या छोटी मुलीने त्याला ‘बाबा’म्हणून हाक मारली..अन् रिद्धीच्या काळजावर सपासप वार झाल्यासारखे वाटू लागले..ती तशीच आराध्यचा हात पकडत उठली..

आदित्यला जिवंत बघून तिला जो आनंद काही क्षणापुर्वी झाला होता तो आता एकाएकी रागात बदलला..ती गर्दीतुन वाट काढत आदित्यपासून दूर जाऊ लागली..

“ मम्मा..पप्पा आहेत ना ते..त्यांना भेटू का देत नाहीस तू मला..??” आराध्य तिच्या हातातून आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत ओरडत होता..पण रिद्धी काही ऐकली नाही..तिने कॅबमध्ये अक्षरशः त्याला कोंबलं..आणि ती तशीच घरी निघून आली..

आराध्य घरी आल्यापासून नुसता रडत होता..त्याला सांभाळण तिला मुश्किल होऊ लागलं..रागात तिने त्याच्यावर हात देखील उचलला..लहान बाळ ते तिच्यावर राग धरून ठेवत तसंच उपाशी झोपलं..

रिद्धी आराध्यवर नजर टाकत बाहेर सोफ्यावर येऊन बसली..तिचा भूतकाळ अगदी चलचित्रपटासारखा तिच्या डोळ्यासमोर नाचत होता..ती आपल्याच तंद्रीत होती तेवढ्यात बेल वाजवली.. इतक्या दुपारी कोण आलं म्हणून थोडं वैतागूनच रिद्धीने दार खोललं..अन् समोर आदित्यला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली..त्याला आपल्यासमोर बघून तिचा राग आणखी उफाळून आला..ती दार बंद करणार त्याअधिच आदित्यने तिला तस करण्यापासून रोखलं..त्याच्या ताकदीपुढे तिचा निभाव न लागल्यामुळे तिने दार सोडून दिल..तस आदित्यने घरात येत दार लावून घेतलं..

“ रिद्धी,आराध्य आपला मुलगा आहे का..??” घरात येताच आदित्यने आराध्यबद्दल विचारलं म्हणून रिद्धीने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला..

“ तो माझा मुलगा आहे..तू त्याचा बाप नाहीस..आणि तू होतोस तरी कोण मला हा प्रश्न विचारणारा…जा ना तुझ्या बायको आणि मुलीकडे..का इथे आला आहेस तू..??” रिद्धी चिडून म्हणाली..

“ हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे रिद्धी..आराध्य माझा मुलगा आहे का..??” आदित्यही थोडासा रागावला होता..

“ नाही म्हंटल ना..” रिद्धी ओरडली..तस लंगडत येऊन आदित्यने तिच्या दंडाला पकडत तिची पाठ भिंतीला नेऊन टेकवली..

“ जर आराध्य माझा मुलगा नाही मग ह्या आयडी कार्डवर त्याच्या वडिलांच्या जागी माझं नाव का आहे..?? तुझ्या घरात माझा हा फोटो का आहे..?? उत्तर दे मला..” आदित्यने त्याच्या खिश्यातून आराध्यच्या स्कुलच आयडी कार्ड दाखवत अन् समोरच्या भितींवर टांगलेल्या आदित्यच्या एका भल्या मोठ्या फोटोला बघत तिला प्रश्न विचारला..आराध्यच्या आयडी कार्डवरचा ऍड्रेस बघून आदित्य रिद्धीच्या राहत्या घरी येऊन पोहचला होता.. त्याच्या प्रश्नाने तिचे डोळे पाणावले..तिने खाली मान घातली..अन् त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल..सोबत त्या दोघांनी श्रीनगरमध्ये सोबत जगलेले सुंदर क्षणदेखील आठवले..

“ ओह्ह गॉड..शिट्ट..शिट्ट..!!का मी आधी तुला शोधलं नाही..का लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुला शोधन बंद केलं मी..का..का..??” आदित्य डोक्याला हात लावून पच्छाताप करत खाली बसला..आता कुठे रिद्धीने त्याच्या पायाकडे पाहिलं..त्याचा एक पाय फोल्ड होत नव्हता..त्याचा उजवा पाय नकली होता.. त्याच्या पायाला बघून रिद्धीला हुंदका आवरला नाही..

“ आदी..तुझा पाय.. हा तुझा पाय..” रिद्धी त्याच्या नकली पायाला हात लावणार तेवढ्यात आदित्यने तिला आपल्याकडे खेचून घेत तिला गळ्याला लावून घेतल.. तो आता वेड्यासारखं रडू लागला..त्याच्या अश्रूत रिद्धीला पच्छाताप आणि विरह ह्या दोन्हीही भावना जाणवत होत्या..

“ आय एम सॉरी रिद्धी..आय एम सॉरी..मी तुला एकटं सोडून दिल..देशासाठी कर्तव्य निभावता-निभावता मी तुझ्यासोबत अन्याय करून बसलो..” आदित्य अजूनही रडत होता..

“ आदी..तू उठ बर आधी..सोफ्यावर बस..” त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून रिद्धीलाच आता वाईट वाटू लागलं..तिने त्याचे डोळे पुसत त्याला उठण्यास मदत करत सोफ्यावर बसवले..

“ तुझ्या पायाला काय झालं..??” रिद्धीच्या नजरा अजूनही त्याच्या पायावर खिळल्या होत्या..

“ काय होणार आहे..युद्धाचे परिणाम..!!युद्धात दुष्मनांशी लढताना त्यांनी बॉमने आमच्यावर हल्ला केला..माझे साथीदाराचे त्यात चिथडे उडाले..पण मी जखमी होऊन पहाडीवरून खाली नदीत पडलो..माझं नशीब चांगलं होत म्हणून मी वाहत नदीच्या काठी राहणाऱ्या कुण्या गावकऱ्याला सापडलो..तो माणूस वैद्य होता..युद्ध सुरु होत म्हणून त्याने माझे उपचार घरीच केले..नंतर मात्र त्याने माझ्या अंगावरील वर्दी बघून जवळच्या पोलिसात खबर दिली..पुढचे तीन महिने मी कोमात होतो.. चालण्या-फिरण्याच्या स्थितीत होताच मी तुझ्या आणि आईच्या ओढीने घरी पोहचलो..मी जिवंत आहे असं कळून देखील तू आणि आईपैकी कोणीही मला कॉल केला नव्हता..मी समोरून कॉल करायचो तेव्हा काका किंवा काकीच बोलायचे..तुमच्याबद्दल विचारलं तर उडवाउडवीची उत्तरे मिळायची त्यांच्याकडून..!!

घरी परतलो तेव्हाच चित्रच काही वेगळं होत..काका-काकी घर विकून फरार झाले होते..आई मला सोडून गेली होती.. तु बेपत्ता होतीस..माझ तर सगळं जगच उध्वस्थ झालं होत..तुला शोधत मी तुझ्या गावी सुद्धा गेलो तेव्हा तुझ्या मामा-मामीच्या ऍक्सीडेन्टबद्दल समजलं..तू त्यांच्या अंतिम विधीसाठी गावात आली होतीस असं गावातल्या एका बाईकडून कळालं..तिने हेही सांगितलं कि तू त्यावेळीस प्रेग्नेंट होतीस..तुझ्या गळ्यात मंगळसूत्र असून तुझा नवराही तुझ्यासोबत आला होता.. तुझं लग्न झालं असं कळालं तेव्हा मला किती त्रास झाला हे तुला मी शब्दात देखील नाही सांगू शकत..पण नंतर विचार केला कि जे झालं ते बरच झालं..तसही मला एक पाय नव्हता..अपंग झालो होतो मी..तुझ्यावर आयुष्य भरासाठी ओझंच झालो असतो..त्यात युद्धात झालेल्या दुखापतीत मी माझा बाप बनण्याचा अधिकारही गमावून बसलो होतो..तू तुझ्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत खुश रहावं हीच प्रार्थना करत मी तुला शोधणं बंद केलं..” आदित्यने थोडक्यात युद्धानंतरची आपली कहाणी रिद्धीच्या समोर मांडली..

आदित्य आपल्याला कधीच विसरला नव्हता,त्याने तिला शोधण्यासाठी प्रयत्न देखील केले होते हे कळताच रिद्धी मनोमन आनंदली..सोबत तिला आदित्यच्या शरीरच झालेलं नुकसान पाहून वाईट देखील वाटत होत..

“ मग ती मुलगी आणि ती स्त्री..”

“ ती माझ्या मित्राची बायको आहे..माझी मानलेली बहीण..त्याची मुलगी मला मामा सोडून बाबा म्हणते बस इतकंच..!! त्यांनाच भेटायला मी इथे आलो होतो..” आदित्य पुढे काही बोलत होता तोच रिद्धीने त्याच्या ओठात आपले ओठ गुंतवले ..तोही तिच्या ओठात काहीवेळासाठी अडकून पडला..दोघेही वेड्यासारखे एकमेकांचे ओठ कुरवाळत होते..श्वास लागला तस रिद्धीने त्याचे ओठ सोडून देत त्याला गच्च मिठी मारली..

“ आदी..माझ्याशी लग्न करशील..तेही उद्याच..!!” रिद्धी म्हणाली तस आदित्यने तिला आपल्यापासुन वेगळं करत हो मध्ये मान हलवली.. 

“ पण तुझा नवरा..”

“ अरे माझा नवरा कधी नव्हताच..तो तर माझा मानलेला भाऊ होता..लग्न न होता एखादी स्त्री जेव्हा प्रेग्नेंट राहते तेव्हा लोक तिला आणि तिच्या बाळाला कोणत्या नजरेने बघतात हे तुला वेगळं सांगायला नको..गावात माझ्या बाळाला कोणी नाव ठेवू नये म्हणून नाटक केलं होत मी..तुझ्या शहीद होण्याच्या बातमीने तुझ्या घरच्यांच खरं रूप सगळ्यांसमोर आलं..माझ्यासोबत तर ते आधीच चुकीच वागायचे..पण नंतर मात्र तुझ्या आईसोबतही ते वाईट वागू लागले..आई गेल्या आणि मी वाऱ्यावर पडले..कुठे जावं ते कळत नव्हतं..त्या वेळी मामीची गोव्यात राहणारी मैत्रीण सुधाताई आठवली..मग आले गोव्याला..इथे आल्यावर मी प्रेग्नेंट आहे असं कळालं..किती आनंद झाला होता मला  त्यावेळीस..तुझी कमी सारखी खळत होती..मामी आणि सुधाताईने अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला..पण मी साफ नकार दिला..

आपलं बाळ होत ते..तुझा अंश,आपल्या प्रेमाच्या निशाणीला कस बर संपवलं असत मी..त्याला वाढवताना फार त्रास झाला..पण जेव्हा आराध्य माझ्या हातात आला तेव्हा मात्र त्या त्रासाचं जीज झाल्यासारखं वाटलं..सुधाताईच्या मदतीने मी इथल्याच एका शाळेत शिक्षिका म्हणून जॉबवर लागले..आराध्यला सांभाळण्यात सुधाताईने फार मदत केली माझी..आराध्यला मोठं करताना तुझी कमी त्याला भासू नये म्हणून पूर्ण काळजी घेतली मी..पण तुझी जागा कधीच घेऊ शकले नाही मी..कधी काळी तू मला तुझ्या सेनेतल्या गोष्टी सांगितल्या होत्यास,त्याच ऐकून तो मोठा झाला आहे..त्याचे वडील एक आर्मी ऑफिसर होते हे सगळ्यांना कौतुकाने सांगतो तो..तू माझ्या इतक्या जवळ असून मी तुला ओळखू शकले नाही;पण त्याच्या चिमुकल्या डोळ्यांनी तुला ओळखलं..” असं म्हणत रिद्धी हसतही आणि रडतही होती..

“ बस रिद्धी..!! आता अजून एक अश्रू नाही..ह्यापुढे तुझ्या आणि आराध्यच्या डोळ्यात एकही अश्रू येऊ देणार नाही मी.. पण तुला असा अपंग नवरा चालेल ना रिद्धी..” आदित्यने तिचे हात हातात घेत विचारलं..अन् तिने सरळ त्याचा कान पकडला..

“ पुन्हा असं काही बोललास तर जीव घेईन तुझा मी..तू जसा आहेस तसा माझा आहेस..माझ्यासाठी परिपूर्ण आहेस..” रिद्धी आपलं बोलणं पूर्ण करणार तोच पाठीमागून आराध्य आदित्यला बघत जोरात ओरडला.. “ पप्पा sss..!!” 

आदित्यने वळून बघत त्याच्याकडे बघत आपले हात पसरले..तसा तो धावत येऊन त्याच्या मिठीत विसावला..आदित्य त्याला मिठीत घेऊन वेड्यासारखं त्याच्या चेहऱ्याचे पापे घेत होता..त्याचे लाड करत होता..आदित्यचा आनंद त्याच्या अश्रूमधून जाणवत होता..तर आराध्यची इतभर पसरलेली स्माईल त्याची ख़ुशी सांगून जात होती..

पुढच्या चार दिवसातच आदित्य आणि रिद्धीने रजिस्टर पद्धतीने लग्न उरकलं..आता ते ऑफिशियल नवरा-बायको झाले होते..आदित्यने गोव्यातच सुमुद्र किनाऱ्यावर एक छोटस घर घेतलं..ते तिघेही आता तिथेच शिफ्ट झाले होते..कधी कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल अश्याप्रकारे त्यांची लव्हस्टोरी पूर्ण झाली होती..त्यांची फॅमिली पूर्ण झाली होती..आदित्य रिद्धी आणि आराध्यला फुलासारखा जपत होता..आणि तीही त्याला तितकंच भरभरून प्रेम करत होती..नियतीने त्याला दूर केलं होत;पण त्यांच एकमेकानांवरच अतूट प्रेम बघून नियतीही त्यांच्या प्रेमापुढे झुकली होती..शेवटी त्याच नियतीने त्यांना पुन्हा एक केलं होत..!! 

                                           -Rupshree

 

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

 

Post a Comment

0 Comments