संकेत मिलनाचा
अविनाश अवती, नासिक.
“अरे संकेत, ये ना आत!! आज तुला असा
अचानक आलेला बघून मला खूप आनंद
झालाय.तुला कितीदा आग्रह केला होता?
आणि आज शेवटी तू खरंच.. पण मानलं
पाहिजे, अजूनही एकदम वक्तशीर आहेस हं! डॉट
साडे अकरा वाजले आणि तू बेल
वाजवली.”
“नाही..म्हणजे मी इकडेच ऑफिसच्या कामासाठीच
आलो होतो, म्हटले भेटून जावे
जमल्यास.”
“ओह, आणि मला वाटले तू खास वेळ काढून
भेटायला आला आहेस. किती दिवस झाले
इथे बदली होऊन? आणि तू मात्र...चला,
निदान आज तर भेटावेसे वाटले!”
“अगं तृप्ती, म्हणजे मी खरं तर...म्हणजे
तू तसाच अर्थ घे... म्हणजे मी मुद्दामच नाही
आलो पण.... नाही म्हणजे....”“अरे, किती
गोंधळ करतोस. मला कळले आहे, तू मला
भेटायला आलेला नाहीस, इकडेच आलास तर
भेटून जावे म्हणून आला आहेस, हो ना?
बैस, मी पाणी आणते.”
(संकेत स्वतःशीच बोलत) “ काय हे देवा?
आज पर्यंत कुणाशी बोलताना, अगदी चेष्टा
मस्करी करताना नाही घाबरलो, ना टेन्शन
आले,मग या तृप्तीला बघूनच असे काय
होते? का दरवेळी अगदी फोनवर देखील शब्द
गोठतात? का शब्द मनातल्या मनात
घुटमळतात? शब्द कधी चुकून जिभेवर येतात
आणि परत फिरतात? का वाटते ही
समोरच येऊ नये? तरीही तिच्या नकळतच
आपण तिला मन भरून पाहत राहावे.
पण...पण...मग का मनात तिला भेटायची
घालमेल राहते? आपण तिच्यासोबत बोलावं
म्हणून प्रयत्न करतो आणि संधी असून
बोलत नाही? या तृप्तीला बघून काय होतं नेमकं
आपल्याला? कदाचित मी....छे! छे!
हा विचार पण टाळायला हवा. चुकतोय
आपण....तिला कळाले तर? काय विचार करेल
ती आपल्या बद्दल? पण मग.....”
“संकेत, अरे कुठे हरवलास? असा खिडकीबाहेर
बघत स्वतःशीच काय बोलतोय ?
कसला विचार करतोय?” “ अगं काही नाही..
आपलं उगाच! कंपनीची कामे काही
डोक्यातून जातच नाही ना, म्हणून आपलं...
“नक्की ना?”
“अगं, तुझी शपथ!”
“ अरेरे! चील बाबा, शपथ काय घेतोय थेट?
ते ही माझी” डोळे मोठ्ठे करत तृप्ती
म्हणाली.
“तुझा विश्वास बसावा म्हणून!”
“म्हणजे इथे मी समोर बसली असताना सुद्धा
तुझ्या डोक्यात कंपनी, ऑफीस आहे तर?
आणि सांगतोय, मला भेटायला आलास?”
“तृप्ती, प्लीज माझा खूप गोंधळ उडतोय.
मला नक्की काहीच सांगता यायचं नाही. तेव्हा
प्लीज मला शब्दात पकडू नकोस.”
“शब्दात पकडू नाही तर काय करु? म्हणजे...
अरे तू बोलतोस असा की आपोआप शब्दात
पकडला जातोस. असो, पाणी घे!” तिने पाण्याचा
ग्लास हातात धरून पुढे केला. त्याने तो
घेण्यासाठी हात पुढे केला. शब्द मुके,
दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. अचानक
तिच्या ग्लास धरल्या बोटांवर त्याची
बोटं टेकली. तिच्या अंगात जणू विद्यूत प्रवाह
संचारला, तो ही शहारला. खळ्ळकन आवाज
झाला. ग्लास खाली पडला. सारे पाणी
सांडले. “ओह! माय मिस्टेक” म्हणत तो
खाली वाकला.”
“नाही, माझंच लक्ष नव्हतं. असू दे!”
म्हणत ती ही खाली वाकली. सांडलेले पाणी ग्लासात
पुन्हा भरण्याचा प्रयत्न करणारा त्याचा
हात तिने धरला. “असू दे रे! मी आवरते.” असं
म्हणत ती उठली, तो ही उठला. नजरबंदी
मात्र तशीच होती. हात हाती तसाच होता.
शेवटी न राहवून तो बोलला,”माझा हात!”
तसे तिचे लक्ष गेले. झटकन तिने हात सोडला.
ओशाळून जात,” सॉरी!” इतकेच बोलून ती आत पळाली. परत येताना ती एका ट्रेमध्ये
त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. कपाळावरचा
घाम पुसत त्याने ही गटगटा पाणी पिले.
“बैस ना तू मी हे पाणी पुसून घेते.”
असे म्हणत तिने कपडा घेऊन पाणी पुसायला सुरवात
केली.कितीही नजर चोरली तरीही त्याची
नजर तिच्या गोऱ्यापान पाठीवरून, मोकळ्या
केसांवरून, कानात हलणाऱ्या झुमक्यावरुन
हटत नव्हती. तिच्या अंगाचा प्रसन्न गंध
त्याला धुंद करत होता.”तृप्ती, सौंदर्य
आणि बुद्धीमत्ता याचा तू अजोड, दुर्मिळ संगम
आहेस. माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
तुझ्याकडे असतेच आणि तरीही माझ्या मनात
किती प्रश्न असतात? ज्याची उत्तरे तुझ्याकडेच
आहे हे कळूनही विचारायची हिंमत होत
नाही. नेहमीच टाळतो.” संकेतचा स्वतःशीच
संवाद सूरु होता.
सारे आवरुन ती समोर सोफ्यावर येऊन बसली.
“हं बोल आता? काम कसं सूरु आहे?”
“अगदी व्यवस्थित. तुझं?”
“माझं पण तसं व्यवस्थित सुरू आहे. काय
लिहीतोय इतक्यात?”
“विशेष काही नाही, असेच स्फुट लिखाण,
कविता वगैरे सुरू राहतं मध्ये मध्ये.”
“मला आवडतात तुझ्या कविता...कधी रडवतात,
कधी प्रेमात पाडतात, कधी स्वप्न
आणि वास्तव याची जाणीव करुन देतात तर
कधी स्वप्नांच्या जगाची सफर घडवतात.
कधी कधी तर मी.. बालिश वाटेल पण सांगते..एकटीच
रडून घेते किंवा हसत सुटते.”
“इतक्या आवडतात माझ्या कविता?” त्याचा
आवाज घोगरा झाला होता.
“होय. कधी कधी मी स्वतःला बघते त्यात.”
“तू सुद्धा खूप खूप सुंदर कविता लिहीते.
तुझं लेखन आवडतं मला!”
“आणि.......मी?”
तो स्तब्ध झाला. नुसताच तिच्याकडे बघत
राहिला. त्याची अदृश्य प्रेरणा, त्याची
आभासी प्रतिमा,त्याच्या स्वप्नातील
परी आज त्याला प्रत्यक्षात प्रश्न विचारत होती,
आलेले शब्द बाहेर पडायला धजत नव्हते.
त्याला म्हणायचे होते,
“आपल्याला चंद्र आवडतो म्हणून तो हाती
धरता येतो होय? त्याला दूरुनच बघून त्यावर
कविता करावी बस्स्” पण शब्द त्याच्या
ओठातच राहीले.त्याने मान खाली घालून तिचा
हात हातात घेतला दुसऱ्या हाताने त्यावर
फक्त आश्वासक थोपटत राहिला. अचानक
त्याच्या हातावर एक अश्रूचा थेंब पडला.
त्याने मान वर करून पाहिले. तिचे डोळे डबडबले
होते.
तिच्या डबडबलेल्या डोळ्यांनी जणू ती
म्हणत होती, “तू चंद्र आहेस माझा, रोज बोलते
तुझ्याशी आणि हरवून जाते तुझ्याच आठवणीत.
तू अप्राप्य,प्राप्य माझं मन काहीच
जुमानत नाही. किती थोपवू मनाची बंडखोरी
मलाच कळत नाही. भले ही माझा कसलाच
दोष नसेल पण शेवटी एका विधवेशी तू तरी
का....? मला दिसायचे तुझ्या डोळ्यात
दाटलेले माझ्यावरचे प्रेम, पण तू कधी
व्यक्त केले नाहीस, आपल्या गरिबी मागे मनाची
श्रीमंती लपवत गेला आणि मला आपल्या
श्रीमंतीचे साखळदंड झुगारता आले नाही.
आजही पैसा आहे, नाही आहेस तो तू! खूप
खूप एकटं वाटतंय रे! पण..”
त्याने दोन्ही हातांच्या बोटांनी तिचे
डोळे अलगद पुसले. तिचा हात आपल्या हाती घेत वर
केला,हलकेच आपले ओठ त्यावर ठेवले. ती
क्षणात शहारली,मोहरली. पण लगेच भानावर
आली. आपला हात सोडवून घेत त्याला म्हणाली,”तू
बैस ना. मी चहा ठेवते” आणि तो
नको नको म्हणताना ती आत किचनमध्ये पळाली.
ती आली तेव्हा बरीच सावरलेली दिसत होती.तो
टी टेबलवर कुठलेसे मॅगझिन चाळत
होता.” तू जेवायला थांबला असता तर जास्त
आनंद झाला असता. आता फक्त चहावरच
निरोप द्यावा लागतो आहे.” तिच्या शब्दात
खंत होती.
“पुढल्या वेळी जेवायला कशाला अगदी मुक्कामाने
येईल.” आणि पुढच्याच क्षणी त्याने
जीभ चावली. दोघांनीही एकाचवेळी चमकून
एकमेकांकडे पाहिले.
ती खळाळून हसली, मग त्याच्या पाठीवर
धपाटा मारत म्हणाली, “अरे मग ये की
मुक्कामी. तू केव्हाही येऊ शकतो.”
“केव्हाही म्हणजे......?” ती भांबावली.
तिला उत्तर सुचेना.
“तू चहा घे ना?” ती कसेबसे म्हणाली.
“तू नाही घेतला चहा?” तो ही विषय बदलत
म्हणाला.
“मी सकाळी एकदाच घेते.” चहा संपवून
तो जायला उठला. ती दारापर्यंत आली.
दार उघडायच्या आधी तो दाराकडे पाहत
म्हणाला, “तृप्ती, आपण सारेच वेगवेगळ्या
साखळदंडाने बांधलेले असतो. नैतिक, सामाजिक,
मानसिक, आणि मनाने कितीही
विद्रोह केला तरी ते सुटत नाही, तुटत
नाही, जखडून ठेवतात हा नश्वर देह त्याच्या
त्याच्या बंद कोषात आणि कितीही वाटले
तरीही आपण तो.....झूगारु शकत नाही. मग
मनाचे जुळणे, एका निकोप नात्याची सुरुवात
होतच नाही. प्रत्येक नाते
शरीरसुखासाठीच नसते, प्रत्येक नात्यात
वासना नसते, तरीही आम्ही ते जोडू शकत
नाही आणि लाथाडूही शकत नाही. प्रयत्न
करुनही.....”
“तू केला आहेस कधी असा प्रयत्न...?”
तृप्तीचा कापरा आवाज त्याच्या कानी आला.
त्याने चमकून वळून पाहिले. तृप्तीचे
सारे अंग थरथरत होते. पापण्या अश्रू थांबवायचा
निष्फळ प्रयत्न करत होत्या. तो माघारी
वळला आणि क्षणात तिला गच्च मिठीत धरले.
बराचवेळ दोघेही एकमेकांचे खांदे भिजवत
राहिले.थोडा भर ओसरताच, तो म्हणाला,
“ वेडाबाई मी तर तुला खूप स्ट्रॉन्ग
समजायचो!”
“आणि...तू...?” ती हसत म्हणाली.
धरला. तिने आपले डोळे बंद केले, त्याचे
उष्ण ओठ तिच्या ओठांवर टेकले. तिनेही
प्रतिसाद दिला. त्याच्या ह्दयाचे ठोके
वाढले होते, तिची छाती, तितक्याच वेगाने
वरखाली होत होती. त्याचे ओठ तिच्या
कपाळावर, गालांवर, गळ्यावरुन खांद्यावर
घासायला लागले. तिचा पदर खाली पडला.
तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरायला
लागले. त्याचाही एक हात तिच्या पाठीवरुन
फिरायला लागला.
तिचे हात त्याच्या
शर्टाच्या बटणांशी खेळत एक एक बटण उघडू
लागले. त्याचा एक हात तिच्या
धपापणाऱ्या छातीवर स्थिरावला, त्याच्या
हाताचा दाब वाढला तशी ती गोड वेदनेने
चित्कारली, शहारली, त्याच्या मिठीतून
सुटत भिंतीकडे तोंड करून उभे राहिली, तो पुरता
बेभान झाला , समोर होऊन त्याने तिला
मागून मिठी मारली. त्याचे हात बेभान होऊन
तिच्या पोटावरुन फिरायला लागले, ओठ
उघड्या पाठीवरुन फिरायला लागले. नकळतच
दोघांची पाऊले बेडरूम कडे वळाली. किती
तरी वेळ खोलीतून दोघांचे उष्ण श्वास बाहेर
पडत होते. दोघांच्या श्वासांची लय स्थिरावली
तसा तो तृप्तीच्या आरक्त चेहऱ्याकडे
पाहत म्हणाला, “काय झालं? मी आलो तेव्हा
तुझ्या चेहऱ्यावर चिंता, काळजी, तणाव
दिसत होता, तू नाही बोलली तरीही....
आणि आता तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच
आनंद आहे.”
“संकेत मला कायमच वाटत आले आहे,
प्रत्येक नात्याला नाव असावं, तसं एक
नात बेनामीही असावं
ते फक्त आपल्यापुरतेच राहावं. देण्या
घेण्यापासून अलिप्त ठेवावं
मनाच्या कोपऱ्यात सजवत राहावं आनंद
दुःख तिथेच वाटत जावं “
“क्या बात तृप्ती याला म्हणतात इन्सटंट
कवी. तू संकेत या ओळींचा समजून घेशील?”
ती नजर चोरत म्हणाली.
“तृप्ती- या नात्याची सतत वाटू दे”
तो तिच्याकडे पाहत आश्वासक हसला.
तो म्हणाला.
तो निघाला. आपल्या कारमध्ये बसून निघे
पर्यंत ती त्याला पाहत होती, न्याहाळत
होती.
ती आत आली, तिने तिच्यासाठी चहा केला.
संकेतच्या कपावरून हात फिरवला आणि
मग आपला चहा त्यातच ओतून ती एका वेगळ्याच
विश्वात चहा पित हरवत गेली.
सकाळी ती उशिराने उठली. सवयीप्रमाणे
रेडिओ लावला. तिची आवडती गाणी सूरु होती.
तिने दाराला लावलेले वर्तमानपत्र आत
घेतले आणि एका बातमीने तिचे लक्ष वेधले,”कार
अपघातात तरुण उद्योजक आणि कवी संकेत
पारंबे यांचे निधन.” थरथरत्या नजरेने
तिने बातमी वाचली “काल सकाळी दहाच्या
सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर एका
बंद पडलेल्या कंटेनरला कारने दिलेल्या
धडकेत तरुण उद्योजक आणि कवी संकेत पारंबे
यांचे जागेवरच निधन.” क्षणभर तिला वाटले
सारे जगच आपल्या भोवती गरगर फिरते
आहे. आपल्याला भोवळ येऊ शकते.
“संकेत तू तर सकाळी माझ्या सोबत होता......तुझा
अपघात झाला होता तर मग मला
कसा येऊन भेटला? कसा? त्याचवेळी
रेडिओवर मात्र गाणे सूरु होते,
‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत
हे
हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी, तुला बघून वाटले
तृणांत फुलापाखरू तसे बसेल गीत हे
स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते
कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू
निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे.’
........... अविनाश अवती, नासिक.
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box