आयुष्याचा दुसरा डाव - श्रीलक्ष्मी सावंत

 आयुष्याचा दुसरा डाव

        केतकी तिच्या नाती बरोबर बागेत खेळत होती.खेळता खेळता तिची नात थकली म्हणून ती घरात गेली. केतकी बागेतील झोपाळ्यावर बसली आणि झोके घेऊ लागली.
            केतकी झोके घेता घेता ती  भूतकाळात गेली. तिचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाले होते.या नंतर काय करायचे ते तिने ठरवून ठेवले होते. कुठे फिरायचे किती मजा करायची हे ठरवलेले होतं.परंतु तिच्या नशिबात दुसरेच काही होते.तिचे आई - बाबा बाहेर फिरायला गेले होते. ते घरी येता येता त्यांचं अपघात झाला होता. त्यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.
         केतकीच्या घरात शोककळा पसरली होती.केतकीच्या आयुष्यात अंधार पसरला. केतकीला मागे दोन भावंडे होती. केतकी मोठी असल्याने घराची जबबदारी तिच्या वर आली होती. भावंडांचे शिक्षण पूर्ण करणे हे ही आलेच. ती नोकरी शोधू लागली. तिकडे बाजूला डॉक्टर रमेश होते त्यांना एक मदनिस हवी होती त्यानें हिला कामा साठी ठेवून घेतले.ती दिवस - रात्र मेहनत करत होती आणि घर चालवत होती. दिवसभर मेहनत करून बिचारी फार थकून जात असे.
          केतकी खुप मेहनती आणि प्रामाणिक असल्यामुळे डॉक्टर तिला खूप मानायचे.तिची प्रशंसा ही करत असत. घराची जबाबदारी आल्यामुळे तिला लग्नाचा विचार करण्यासही वेळ मिळाला नाही. तिच्या मागच्या भावंडांनी लग्न केले पण हीच लग्नाचं वय निघून गेलं होत. 
        केतकी ज्या डॉक्टर रमेश जवळ काम करत होती ते डॉक्टर खूप दयाळू होते.त्यांनी केतकीचे हाल पाहिले होते .त्यामुळे तिला मदत करत असत.केतकी पण मन लावून काम करत असे.दोघांचा वेळ जास्त  दवाखण्यात
  जावू लागला. डॉक्टर आणि केतकी यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.हळूहळू दोघांची मन एकमेकांत गुंतत जावू लागले. डॉक्टरचं लग्न झालं होत त्यांना दोन मुलं होती. 
       एक दिवस केतकीची तब्बेत बिघडली.तिने डॉक्टरला फोन करून सांगितले आज दावाखण्यात येत नाही . डॉक्टरला समजले ही येत नाही म्हणजे हीची तब्बेत जास्त बिगडली असणार .म्हणून ते तिला गोळ्या द्यायला गेले. जावून पाहतात तर काय केतकी तापाने फणफणत पडली होती . त्यांनी तिला लगेच गोळ्या दिल्या आराम करायला सांगितले. तिच्या घरी आल्यामुळे ती कोणत्या हालात मध्ये राहते त्यांनी पाहिले आणि त्यांना फार वाईट वाटले त्यांनी मनाशी निश्चय केला केतकीलां घर घेण्यास मदत करायची .ते  दवाखण्यात जाण्यास निघाले.
          डॉक्टरला केतकी बद्दल खूप आदर होता .त्या आदराचं रूपांतर प्रेमात झालं हे त्या दोघांना कळाले सुद्धा नाही. दोघेही प्रेमात आखंड बुडाली होती. कधी वेळ मिळाला तर ते दोघे बाहेर फिरायला जात असत.
            केतकीची परिस्थिती आत्ता सुधारली होती. एवढ्या वर्षे तिने नोकरी करून तिच्या जवळ चार पैसे जमा केले होते. ती आत्ता स्वत: साठी जगत होती.डॉक्टर बरोबर बाहेर फिरायला जाताना खूप छान तयार होत असे . ती दिसायला सुंदर होती पण तयार झाली की चारचौघात उठून दिसत असे. डॉक्टर ही तिला असे पाहून घायाळ होत असे. 
           एक दिवस ती दोघे लाँग ड्राईव्ह साठी बाहेर निघाली. दोघांचं खूप रोमँटिक मूड होता. छान अशी कार मध्ये रोमँटिक गाणी चालू केली .दोघेजण गाणी ऐकत ऐकत पुढे चालली होती . डॉक्टर ने केतकीचा हाथ आपल्या एका हातात घेवुन एक हाताने ड्राईव्ह करत होते. ती दोघे एकमेकांना पाहून स्मित हास्य करत होती. मध्ये मध्ये त्यांच्या गप्पा ही चालू होत्या. जाता जाता रस्त्यात त्यांना समुद्र किनारा  लागला.दोघे पण त्या समुद्र किनारी जायला निघाले. कार पार्किंग करून हातात हाथ घालून समुद्र किनारी जावू लागले. समुद्र किनारी माणसांची वर्दळ कमी होती. एका बँच वर जावून दोघे बसली.दोघे एकमेकांना खेटून बसले होते. केटकीचा स्पर्श डॉक्टर ला होत होता, तिचे केस वाऱ्याने उडत होते. तिचे मादक रूप पाहून डॉक्टर बेभान झाले होते. केतकीची ही अवस्था तीच झाली होती.ती दोघं त्या फेसळणाऱ्या लाटांचा लपंडाव पाहत बसली होती.त्यांच्या मनातही लांटा सारखे विचार येत होते.पण त्या दोघांनी स्वता: ला आवरले होते.
            ते दोघे प्रेम करत होते पण कधी शारीरिक सबंध कधीच ठेवले नाही. दोघे पण एकमेकांना प्रामाणिक होते. डॉक्टर ही आपल्या कुटुंबासाठी सर्व करत असे. त्याने आपली सर्व कर्तव्य, जबाबदारी पार पडत असे. वेळ मिळेल तसा आपल्या बायको, मूलांना देत असे . त्यांना बाहेर फिरायला घेऊन जात असत. 
            नियतीने डॉक्टर च्या कुटुंबा वर घाला घातला होता. डॉक्टर च्या बायकोला कर्करोगाचे निदान झाले होते. डॉक्टर ची दोन मुलं लहान होती. केतकी डॉक्टर च्या घरी जाऊन मदत करू लागली. डॉक्टर च्या बायकोचा विलाज हॉस्पिटलमध्ये चालू होता. केतकी रोज डॉक्टर च्या घरी जाऊ लागली होती. त्यामुळे डॉक्टर च्या घरातील सर्वजण तिला ओळखू लागले होते. डॉक्टरची मुलं ही तिच्या बरोबर राहत असत. काही महिन्यात डॉक्टर च्या बायको ची तब्बेत सुधारली होती . आत्ता घर सर्व पूर्ववत  चालू होतं . डॉक्टर ही खुश होते , मुलं ही खुश होते. घरात आनंदी वातावरण पसरले होते. 
               केतकी ला तिचं हक्काचं घर मिळावं म्हणून डॉक्टर ने तिला थोडी मदत करून तिला एक प्लॅट घेऊन दिला . केतकी खूप आनंदात होती. तिच्या कष्टाच फळ मिळाले होते. तिने आपले घर खूप हौसेने सजवले . छोटीशी पूजा करून ती आत्ता आपल्या हक्काच्या घरात राहू लागली. 
           दवाखण्यात केतकी आणि डॉक्टर  आत्ता एकत्र जाऊ लागले. डॉक्टरच घर आणि केतकीच घर एकच मार्गावर होतं.त्यामुळे रोज ते तिला पिकअप करून नंतर दवाखान्यात जात असत.डॉक्टर तिला कधी वेळ मिळाला तर ही दोघं बाहेर दुपारचं जेवण घ्यायला जात असत. त्यांच खूप प्रेम होतं.  एकमेकांना खूप जीव लावला . पति-पत्नी सारखे जीवन जगू लागले होते.  दोघे एकमेकांस मदत करत होते , साथ देत होते . निर्व्याज प्रेम करत होते.असेच दिवस चालले होते.
            काही वर्षा नंतर नियतीने खेळ खेळला होता. डॉक्टर च्या पत्नीचं कर्क रोगाने मृत्यू झाला होता.घरावर शोककळ पसरली मुलं आईविना पोरखी झाली होती. घरात स्त्री नसेल तर त्या घराला घरपण राहत नाही. डॉक्टर ची वयस्कर आई पण होती , तिचे ही खाण्या- पिण्याचं , औषध यांची गैरसोय होऊ लागली. मुलांचे जेवणाचे हाल होऊ लागले . घरात कामाला नोकर ठेवले होते. आई ही शेवटी आईच असते . 
तिची कमतरता कोणीच भरून काढणार नाही. डॉक्टर च्या घरी डॉक्टर ने  दुसरे लग्न करावे असे बोलणे सर्वांचे चालू झाले. सर्वजण मागे लागले होते . केतकी चांगली मुलगी आहे हे सर्वांना माहीत होते . ती या घरात आली तर लक्ष्मी बनून येईल ये सर्व जाणत होते. डॉक्टर ने केतकीशी लग्न करावे असे सर्वांनी आग्रह धरला होता . 
         डॉक्टर च्या बायको ला एक वर्षं पूर्ण झालं तसे घरातील लोकांनी त्यांचं लग्न लावून दिले . त्यांचं नशीब मोठं होतं त्या दोघाचं प्रेम एकत्र आलं होतं . त्यांचं प्रेम निस्वार्थ असल्यामुळे नियतीने त्यांना एकत्र आणलं होतं.त्यांचं प्रेम परिपूर्ण झाले होते. ती दोघेही आनंदी होते . घरातही आनंदी वातावरण निमार्ण झाले होते. मुलांना आई मिळाली होती, डॉक्टर ला पत्नी मिळाली होती , आजीबाईंना सून मिळाली होती .
      लग्न झाले त्या पहिल्याच रात्री केतकीने डॉक्टर ला सांगितले दोन मुलं आहेत ती आपली आहेत . त्यामुळे मला माझं मुलं असावं असे वाटत नाही. मी या दोन मुलांची आई आहे. यांचं मी सर्व प्रेमाने करेन . हे ऐकल्यावर डॉक्टर तर हेलावून गेला . कितकीचे विचार ऐकून त्याने तर घट्ट मिठी मारली. एवढं मोठं मन केतकीच होतं. त्या मुलांच्या प्रति किती प्रेम तिच्या मनात होतं. तिने जे सांगितले ते करून दाखविले . 
          लग्नानंतर केतकी दवाखान्यात जाणे बंद केले. घराची जबाबदारी तिने घेतली होती.पूर्ण वेळ ती घराला देऊ लागली. आपलं आयुष्य घरासाठी दिलं होतं.मुलांना काय हवे- नको ते ती प्रेमाने पाहत होती.त्यांचे लाड करत होती . डॉक्टर च्या वयस्कर आईचं सर्व करत होती . त्यांच्या पाहुण्यात काही कार्यक्रम असेल तर त्याला ही जात होती . सर्वांची लाडकी झाली होती. तिचा स्वभाव मनमिळाऊ होता . त्यामुळे सर्वांना तिने आपलंसं केलं होतं. सर्वजण केतकी वर खुश होते . 
          स्वतः आई न होता ती  दोन मुलांची आई झाली होती . दिवस जात होते . शाळा मधून मुलं कॉलेजमध्ये जायला लागली होती.कॉलेजचे दिवस ही संपून त्यांनी मुलांनी चांगले मार्क घेऊन मुलं नोकरी व्यवसायाला लागली होती . मुलं केतकीला मान देत असत . त्यांनी लहानपणापासून त्यांच्या साठी झटताना पाहिले होते . मुलं मोठी झाली होती . त्यांच्या साठी स्थळ पाहायला सुरुवात केली होती . दोघांची पण लग्न केली . केतकीच्या सुना आल्या होत्या . एक मुलगा डॉक्टर झाला होता तो जर्मनी मध्ये गेला . आणि दुसरा तिच्या जवळ मुंबईत राहात होता. सुना सुद्धा केतकीशी खूप आदराने वागत असत. ती सर्वाना सामावून घेत असे . ती थोडे महिने मुंबईत राहत असे थोडे महिने दुसऱ्या मुला जवळ जर्मिनीत राहात असे . नातवंडांचे प्रेमाने सर्व करत असे . 
         केतकीला नातीने येऊन धक्का दिला झोपाळ्याला त्यावेळी ती भूतकाळातून बाहेर आली. आज केतकी जर्मनीत आपल्या नाती बरोबर बागेत खेळत होती. स्वतः आई न होता आई झाली, आजी झाली होती. तिने त्याग आणि प्रेमाने सर्व कुटुंब एकत्र बांधून ठेवले होते. तिचं प्रेम जिंकले होते .डॉक्टर आणि केतकी खूप समाधानाने प्रेमाने राहू लागले.

सौ.श्रीलक्ष्मी सावंत


disclaimer 
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments