नवऱ्यासाठी गोडाची इंस्टंट रेसिपी




नवऱ्यासाठी गोडाची इंस्टंट रेसिपी

© Velvet Kavisha

पाचपन्नास जणींच्या व्हॉट्स ॲप गृपमध्ये बऱ्याच गमतीजमती सुरू असतात. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, इंटेरियर डेकोरेटर्स, शाळेतल्या बाई ते आमच्यासारख्या प्युअर गृहिणी अशा सगळ्यांची मस्त मिलीजुली म्हणजे आमचा गृप.  सगळ्या तिशी ते चाळीशीच्या स्लॉटमधल्या. या वयात लग्नानंतर थोडं स्थैर्य आलेलं असतं. मुलं ही आपल्या हाताने खाऊजेवू आणि न्हाऊ लागलेली असतात. साधारणपणे या वयात बऱ्यापैकी समज आलेली असते मुलांना आणि मुलांच्या आयांना ही. स्वतःसाठी काही तरी करण्याचा हा उत्तम काळ. यात शाब्दिक सपोर्ट खुप महत्वाचा असतो. मैत्रिणींनी तोंड भरून केलेलं कौतुक यशात भरच घालतो. इथे शेअर केलेले अनुभव पुढच्यास ठेच मागचा शहाणा होण्यास हातभार लावतात.   

कधी जुना स्ट्रगल आठवून कोणाचा तरी बांध फुटतो. तर कधी बालपणात घडलेल्या गोष्टी ऐकून मन बालपणात रमतं. किती आगाऊपणा करायचो ना आपण म्हणत हास्याचे फवारे उडतात.  एकेकीची लग्न जमण्याची स्टोरी ऐकली की वऱ्हाडी झाल्याचा फील येतो.  पुन्हा मन भुतकाळात जातं आणि मग थोडीशी टांग खिचाई होते. एखादी मग हरखुन जाते गदगदून म्हणते," एवढं माझ्या लग्नाच्या वेळीही कोणी चिडवलं नव्हतं. पुन्हा ते दिवस अनुभवतेय गं पोरींन्नो तुमच्यामुळे. अंगावर शहारे आलेत लाजून."

हा गृप म्हणजे आमचा अड्डा आहे. आम्ही मोकळ्या होतो. मनातल्या बऱ्याच गोष्टींचा निचरा होतो इथे.


तर त्या दिवशी काय झालं. गृपवर बरेच मेसेज दिसले. वीस मिनिटांच्या चर्चेत मी आपली विसाव्या मिनिटाला गृपवर अवतीर्ण. मेसेज वाचले. साधारणपणे विषय लक्षात आला. 

एक gynaecologist डॉक्टर मैत्रीण दिवसभर हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून धावतपळत गृपवर आलेली. म्हणाली, " पोरींनो, अर्ध्या तासांत झटपट बनेल अशी स्वीट डिश सांगा." 

पण काहींना प्रश्न पडला माझ्यासारखा... "बयो, तुझ्या धांदलीचं कारण काय..??"

ती म्हणाली," अगं तीन दिवसांनी डॉक्टर (नवरा) आज घरी येताहेत.. उद्या येणार होते तर आजच येताहेत... काही वर्षांनी असा योग आलाय. तीन दिवस मी एकटीच घरी होते. आज काही सरप्राइज द्यावं असं वाटतंय. पटकन रेसिपी सांगा.."


ज्यांनी ज्यांनी मेसेज वाचला होता आणि ज्या ऑनलाईन होत्या त्यांनी पटापट रेसिपीज सांगितल्या. कोणी म्हटलं शिरा, कोणी इंस्टंट बासुंदी, कोणी शाही तुकडा, शेवया, रसगुल्ले, गाजर हलवा, दुधी हलवा, तांदळाची नाहीतर रव्याची खीर, किंवा आईस्क्रीमध्ये फ्रुट टाकून फ्रुट सलाड.. आणि अजून बऱ्याच रेसिपी.


सुगरण मैत्रिणींचे मेसेज वाचले आणि माझ्यातल्या शापित सुगरणीला मैत्रिणींचा अभिमान वगैरे वाटून गेला.... उर पाहिला तर लैच भरलेला होता. 


एकंदरीत इतक्या रेसिपीज वाचून पण डॉक्टर बाई काही ह्यातलं काही बनवतील असं वाटलं नाही....

अशावेळी माझ्यातली लेडी देवानंद जागी होऊन म्हणते... "अय् मनचली कहॉं चली..?? रुक जरा अपनी रेसिपी भी पढ के जा..."  


"हो.हो. सांग पटकन..!!" आमची सिंन्सीअर डॉक्टर.

"घरातलं कॅडबरी सिल्क घे. गालात ठेव आणि एक गोड पप्पी घेत नवऱ्याच्या ओठांत सरकवं.. गोडाची परिसीमा आहे ही आणि खुपचं इंस्टंट..." रेसिपी सांगून संपली. ही मधुराज रेसिपी. आपण "वो मेरा प्यार मुझे लौटा दे" कथेत वाचलेली....


झालंऽऽ मग बाकीच्या मैत्रिणी पण ज्या सुटल्या त्या सुटल्याच... बाब्बो...!!! काय एक एक सल्ले दिले.. वाह् व्वा... खतरनाक सुपर्बच.!!! 😂😂😂

डॉक्टर बाई लाजून चूरच... गायबच झाली. आम्ही टेन्शनमध्ये. "हिला रेसिपी जमली असेल की नाही.." 😜😜

--------------------------------

कालच्या गदारोळात एक दोन मैत्रिणी सुटल्या होत्या त्या सकाळीच उगवल्या... काहीजणी "कसल्या भारी मैत्रिणी" आपल्याला भेटल्या म्हणून देवाचे आभार मानत होत्या....

"काय मग डॉक्टर कालचा hangover गेला की नै?? नैतर घ्या दिवसा पडदे लावायला... " एक मैत्रीण.

म्हणजे साधारणपणे टूरवरून खुप दिवसांनी नवरा घरी आला की, बेडरुमचे पडदे लावून दिवसा काळोख केला जातो. मग होते दिवसाची रात्र..🤭🤭 हा काहीजणींचा अनुभव. 


"मेनू काय होता सांग गं कालचा..??" दुसरा प्रश्न.


आणि आमची साधी भोळी स्कॉलर डॉक्टर आम्हांला मेनू सांगून बसली... म्हणाली,"सांगितलं ना, शेव भाजी, मसाला पापड आणि पेढे केले पटकन.."


बास्स... आता आम्ही सगळ्याजणी हे नऊ महिने कसे संपतात आणि तिने कष्टाने बनवलेले पटकन पेढे खायला डॉक्टर कधी बोलावते याची वाट पाहतोय..... !!!🤗🤗🤗

-----------

एवढ्या सगळ्या गमतीजमती झाल्यावर मी पोस्ट नाही लिहिली तर पाप लागेल ना मला. म्हणून मी वर सगळं लिहिलेलं पोस्ट करून टाकलं आणि एक नवीनच समस्या निर्माण झाली. माझ्या अर्ध्या अधिक मैत्रिणींना रेसिपी कळलीच नाही... मग त्या साठी पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरी पोस्ट....😀😀😀

तर्रर्र माझ्या काही सख्ख्ख्या मैत्रिणींना प्रश्न पडला.. की बाबा, रेसिपी वगैरे ठीक आहे पण "ती गालात कॅडबरी कशी ठेवतात??""😂😂 कोणी कमेंटमध्ये विचारला तर कोणी बाजुला घेऊन... 

आता सांगावं तर लागणार ना रावं... 🙆‍♀️🙆‍♀️ नैतर माझ्या सगळ्या  मैत्रिणी म्हणजे मागच्या जन्मीची पुण्याई आणि या जन्मीचा नरक फिक्स... 🤗🤗

अशावेळी "मैत्रिणींसाठी काय पण" म्हणत पुन्हा रेसिपी इस्कटून सांगितली.  आता adult content म्हणून लोकांनी नाकं नाही मुरडली म्हणजे मिळवलं. 

__________________________

मधुराज रेसिपी from वो मेरा प्यार मुझे लौटा दे कथेतून थेट - - 

*साहित्य :- एक सिल्क कॅडबरी, स्वतःचा नवरा आणि थोडासा विरह. 

*टीप:- मुलांसाठी कॅडबरी खरेदी करताना एक Cadbury Silk स्पेशिअली नवऱ्यासाठी आणायला विसरू नका. 

मुलांच्या नजरेस पडणार नाही अशाप्रकारे फ्रीजमध्ये ठेवा. नाहीतर आयत्या वेळी फजिती. 

*आणि आता कृती..:- 

तुम्ही माहेरी जाऊन आलात किंवा नवरा दोन चार दिवसांच्या टूरवर जाऊन आल्यावर  तुम्ही जेव्हा एकांतात नवऱ्याला भेटण्याआधी थंडगार सिल्क कॅडबरीचे चार तुकडे एका गालात ठेवून द्या. म्हणजे लग्नात विडा गालात ठेवतात तसे. कॅडबरी विरघळण्याआधी पटकन डेस्टिनेशन स्वतःचा नवरा गाठा. एक प्यारवाली झप्पी द्या... झप्पीच्या पुढच्या प्रवासात जेव्हा ओठांचा संबंध येईल तेव्हा, गाल में छुपाई, आपके गर्मी सें पिघली हुई कॅडबरी उनको खिला देना..." कृती संपली...😜😜 (इथे नवरा ही तितकाच रसिक असणं अपेक्षित आहे.. कारण ही रेसिपी काल्पनिक कथेतली आहे आणि कथा ही कथाच असते.. 🤪🤪)


रेसिपी तर सांगून झाली. आता मैत्रिणींची बौद्धिक कुवत पाहता "गालातली कॅडबरी बोटावर घेऊन "खिलावाईची" का..??" असं विचारू शकतात. 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

जर तुम्ही असं विचारणार असाल तर नका विचारू. त्यापेक्षा एक काम करा. कोणालाही न सांगता गुपचूप एक पाण्याचा गडू घेऊन हिमालयात जाऊन संन्यास घ्या... 😂😂😂😂 किंवा एखादा सुमुहुर्त पाहून खाली डोकं वर पाय ही करू शकता.. 😂😂😂

आता काहीजणी रेसिपीचा विडिओ पण दे म्हणतील. तर त्यांना मी शाप देईन की, तुमची रेसिपी कधीच यशस्वी होणार नाही.. 🥳🥳🥳

बाब्बो...‌ आज खुप हसले रे... काय तरी मैत्रिणी आहेत.. सगळं इस्कटून सांगावं लागतंय... अशा अजून दोन चार मैत्रिणी भेटल्या की माझी जिंदगी "झिंगलेला लाला" झालीच समजा....😂😂😀😀😀

रुद्रा रुद्रा.. 🙆‍♀️🙆‍♀️🙆‍♀️

सुचना:- सदर कृती प्रत्येक सुगरणीने स्वतःच्या जबाबदारीवर करावी. तुमची रेसिपी बिघडल्यास त्यासाठी आम्हांला जबाबदार धरू नये... 

ही रेसिपी "वो मेरा प्यार मुझे लौटा दे" च्या मधुराची असून आमचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही... 😂😂😂😂😂 

👉 बंधुंनी आपापल्या परीने प्रयत्न करून आमच्या वहिनी मंडळींना खुश करायला हरकत नाही...

कळावे.... 

........

© Velvet Kavisha...


शेअर केलात तर लिंकसहितच करा.. उगाच नाव काढून कॉपी पेस्ट करायचे उपकार करू नका.... पुन्हा मग आम्ही चारचौघात तुमची चोरी पकडून तुमचा बॅंड वाजवणार.. कसं दिसतं ते.. लै वाईट्ट. तेव्हा स्वतःचं नाव घुसविण्याचा मोह नक्की आवरा.. धन्यवाद..🙏🙏

साहित्य चोरी हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे... लक्षात असू द्या बाबाजी/बिबीजी...!!! 🙆‍♀️🙆‍♀️

© Velvet Kavisha....

Post a Comment

1 Comments

  1. lay bhannat recipe pudachya weli try karato. mi pushkal wel ghara baher( Delhi,Chandigarh,Chennai kinva itar thikani firat asato)yetana tithali special type sadi
    hamkhas anato shiva he surprise. thanks for khas recipe.

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box