#आनंदी_वास्तू 🏠 .. भाग 3 (अंतिम)
✍©️जया पाटील
भाग 1 व 2 वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇
विलासरावांनी सांगितल्याप्रमाणे शेखर , रमाताई आणि शुभांगी सकाळी लवकर तयार झाले. विलासराव त्यांना घेऊन ठरलेल्या ठिकाणी जायला निघाले. थोड्याच वेळात गाडी शुभांगीच्या बाबांच्या घरापाशी येऊन थांबली.
शुभांगीने विलासरावांना लगेच प्रश्न विचारला ...
हे काय बाबा ...तुम्ही तर आम्हाला माझ्याच घरी घेऊन आले ट्रिपला ... ? यात काय नवीन ..?
इथे तर मी नेहमीच येते. सुट्टी फुकट घालवली तुम्ही आमची ....
विलासराव बोलु लागले ...शुभांगी ह्या सुट्टीच्या काळात फक्त माझे ऐकायचे ...मी सांगेल तेच करायचे.
सगळेजण घरात गेले. शुभांगीचे आईबाबा दोघेही तयारच होते. त्यांनी अगदीच हसून स्वागत केले सर्वांचे...
मग काय गेल्यावर गरम गरम पोह्यासोबत सगळ्यांनी चहा घेतला आणि मग जुन्या आठवणींच्या गप्पा रंगात आल्या. सगळे गप्पामध्ये इतके रंगले होते की जेवायची वेळ झाली आहे हे देखील कोणाच्या लक्षात आले नाही.
पोटभर जेवण झाल्यावर मग सगळ्यांनी पत्त्याचा डाव मांडला. शुभांगी म्हणाली मला तर खेळताच येत नाही ...मी काय करू ?
विलासरव म्हणाले, ...अगं मी शिकवतो शुभांगी ...
घरातील सगळ्यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला या खेळाला ...मग जेवण , चेसचा खेळ , गाण्यांच्या भेंड्या आणि खूप दंगा मस्ती ... ! सगळे खूपच एन्जॉय करत होते. दोन दिवस कुठे गेले कोणालाच समजले नाही ..अगदी शुभांगीला सुद्धा नाही हं .....!
शुक्रवारी रात्री विलासराव सगळ्या परिवारा सोबत घरी आले. दोन दिवस तर संपले उद्या काय होणार ..? उद्या काय सरप्राईज असणार ? हाच मोठा प्रश्न आहे ..? सगळ्यांच्या डोक्यात हेच चालू होते.
शनिवारची सकाळ झाली. रमाताई उठून नाश्त्याची तयारी करू लागल्या. कधी नव्हे तर शुभांगी आज त्यांना मदत करू लागली. विलासराव किचन मध्ये येऊन बोलले ..
शुभांगी आणि रमा ..आज दोघांनाही सुट्टी ..आजचा नाश्ता मी आणि शेखर बनविणार आहोत ..तुम्ही आरामात बाहेर जाऊन गप्पा मारा ..
आता हे काय नवीनच ...? रमाताई
अग जा ग ...नेहमी करतातच तुम्ही ही कामे आज तुम्हाला जरा आराम ...! विलासराव
शेखर आणि विलासरावांनी मस्त पैकी सँडविच आणि चहाचा बेत केला. सगळ्यांनी मजेत खाल्ले .. पुन्हा गप्पा रंगल्या. विलासरव आणि रमाताई त्यांच्या लग्नाच्या गमतीजमती सांगू लागले. शुभांगीपण इंटरेस्ट घेऊन ऐकत होती हे विशेष ...
दुपारचे जेवण बनवायचे नाही आज आपली लेक श्रेया सगळ्यांसाठी नूडल्स , सुप अजून काय ते पिझ्झा वगरे असते ना ते बनवून आणणार आहे .. सो.. आज आपल्या किचनला आज सुट्टी...
श्रेया दुपारचे जेवण बनवून घेऊन आली. त्यात सगळे काही शुभांगीच्या आवडीचे पदार्थ होते. सगळ्यांनी नवीन पदार्थ आवडीने खाल्ले. त्यानंतर सगळ्यांनी मूवी पाहिला. पॉपकॉर्न ,गप्पा आणि मूवी ... सगळ्यांनीच हा मूवी टाइम एन्जॉय केला. या सगळ्यात पुढचे दोन दिवस कसे गेले .. अगदीच कोणालाच समजले नाही ..शुभांगी तर आपण ट्रिपला जाणार होतो हा प्रश्नच विसरली होती बहुदा .... कारण गुरुवार नंतर तिने पुन्हा हा प्रश्न विचारलाच नाही ..
रविवारची सायंकाळ झाली. त्यावेळेस विलासराव बोलु लागले.
काय मग शुभांगी ..कशी वाटली आपली ट्रिप तुला ? तु एन्जॉय तर केलेस ना ?
शुभांगी बोलु लागली ...काय बाबा ..ही कुठे ट्रिप होती ..घरातच तर होतो आपण ..हा ..पण खूप मज्जा आली मला ....सुट्टी कुठे संपली मला समजले पण नाही.
अरे बाळा ...हीच तर आपली ट्रिप होती आपल्या आनंदी वास्तूची ...आपल्या या सुंदर घराची ...
आपल्या जिव्हाळ्याची माणसं सोबत असली की आपले घरसुद्दा खूप मजेचे ठिकाण वाटू लागते. शुभांगी ..तुला नेहमीच बाहेर फिरायला ..हॉटेलिंग करायला आवडते ना .... या चार दिवसात तुला एकदा तरी त्याला सगळ्या गोष्टींची आठवण आली का ?
त्या सगळ्या गोष्टी वाईट आहे...असे नाहीच मुळी.. बाहेर फिरणे ,हॉटेलिंग करणे या सगळ्या गोष्टीही एन्जॉय करायलाच हव्या ..फक्त आपल्या घरातील व्यक्तींशी वाद करून आपण ह्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला खरा आनंद नाही मिळू शकत बाळा ....
घरातील सगळेमिळून जगलेले क्षण आयुष्यातील सोनेरी क्षण - सोनेरी आठवणी बनून जातात ..कोणत्याही किंमतीत ना मोजता येणाऱ्या अनमोल आठवणी ...क्योकी असली मजा तो सब के साथ होता है ..! विलासराव
काय शुभांगी ...आहे की नाही आपले घर सुद्धा एखाद्या ट्रिप डेस्टिनेशन सारखे.... ?
अहो बाबा ... आपले घर ट्रिप डेस्टिनेशन सारखे नाही तर त्याहून सुद्धा खूप जास्तच ...अर्थातच स्वर्गाहूनही सुंदर आहे ...कारण ही आपली आनंदी वास्तू आहे ...शुभांगी ..
शुभांगीला आपली चूक लक्षात आली होती. दिखाव्याच्या नादात आपण किती सुंदर गोष्टीना , आनंदाला मुकत होतो हे तिच्या लक्षात आले होते.
घरातील प्रत्येक सदस्यांची साथ आणि प्रेम विलासरावांच्या सोबत असल्यामुळे विलासराव घाटगेंचे घर आज पुन्हा पूर्वीप्रमाणे " 🏠 आनंदी वास्तू 🏠 " झाले होते.
विलासराव कृतकृत्य होऊन ह्या आनंदासाठी परमेश्वराचे आभार मानत होते.
कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

1 Comments
खूपच छान
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box