संशयाचे मळभ .. भाग 2
✍©️जया पाटील
मागील भागात आपण पहिले की अनिकेत , दिशा आणि पुनीत यांची मैत्री खूप घट्ट होती. त्यांनी परदेशी जाऊन उच्च शिक्षण देखील पूर्ण केले. त्यांच्या एकीच्या बळावर त्यांनी एका प्रतिथयश स्पर्धेत यशस्वी मिळवले आणि त्या देशातील त्यांची युनिव्हर्सिटी असलेल्या शहरातच त्यांना चांगली नोकरी मिळाली. तिघांच्याही घरचे त्यांच्या विवाहासाठी सुयोग्य जोडीदाराचा शोध करू लागले. आता पुढे .....
घरच्यांचा लग्नाचा आग्रह मात्र अनिकेत , दिशा आणि पुनीत तिघांनाही मान्य नव्हता. अजून एक-दोन वर्षात आमचे करियर सेट झाले की मग लग्नाचा विचार करूया असे त्यांनी घरच्यांना समजावले. घरच्यांनी देखील त्यांच्या निर्णयाला तात्पुरता होकार दिला.
दरम्यानच्या काळात पुनीतला त्याच देशातील दुसऱ्या राज्यात अजून एका चांगल्या नोकरीची संधी चालून आली परंतु अनिकेत आणि दिशाला सोडून जायचे त्याचे मात्र मन होत नव्हते.
इतकी चांगली संधी चालून आलेली असताना फक्त आपण सोबत नसणार म्हणुन तु ही संधी सोडून नको ..... पुनीत , आपली मैत्री आपण कुठेही असलो तरी देखील इतकीच घट्ट असणार आहे आणि आपण मनाने कायमच सोबत असणार आहोत.
आपण महिन्यातून एकदा सुट्टी घेऊन नक्की भेटूया ...पण फक्त आपण सोबत नसणार म्हणुन तु इतकी चांगली ओपोर्च्युनिटी सोडून नकोस.. आमच्या मित्राची प्रगती तिच आमची प्रगती आहे. प्लीज पुनीत , तु नवीन ठिकाणी जॉब ला हो म्हण ...असे अनिकेत आणि दिशाने पुनीतला समजावले.
पुनीत नोकरीच्या निम्मिताने दुसऱ्या राज्यात गेला आणि त्याच्या आयुष्यात पुजा आली. भारतीय असलेली पुजा नोकरीची निम्मिताने तिथे सेटल झाली होती. पूजाच्या सहवासामुळे पुनीतचा एकटेपणा थोडा कमी झाला. पुजा आणि पुनीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
इकडे अनिकेत आणि दिशा सोबत होतेच. अधूनमधून पुजा आणि पुनीत देखील देखील त्यांना भेटायला येत असत. दिशाला देखील तिच्या ऑफिस मधला रोहन आवडू लागला होता. दिशाने अनिकेत आणि पुनीत दोघांनाही रोहन बद्दल सांगितले.
ते दोघेही दिशासाठी खुश झाले. रोहन पुनीतच्या एका मित्राचा भाऊ होता. त्यामुळे पुनीतला रोहनबद्दल जवळपास सगळी माहिती होती. रोहन खूप चांगला मुलगा होता. त्यामुळे अनिकेत आणि पुनीतची दिशाबद्दलची काळजी मिटली होती.
अनिकेत आणि पुनीत दोघांनाही त्यांच्या प्रिय मैत्रीण दिशू ची खूप काळजी होती.
रोहनने दिशाला प्रोपोज केले आणि दिशाने देखील हो म्हटले. पुनीत आणि दिशा दोघांनीही आपल्या जोडीदाराबद्दल त्यांच्या कुटुंबियांना सांगितले. सगळी पडताळणी , रोहन आणि पूजाच्या घरच्यांना भेटून दिशा आणि पुनीत दोघांच्याही आईबाबांनी लग्नाला होकार कळवला.
घरचे सगळे खुश झाले ....पण अनिकेत चे काय ...? अनिकेत आधीच खूप लाजरा बुजरा मुलगा ...त्याला प्रेमात वगैरे पडणे काही शक्य नाही.
दिशा आणि पुनीत दोघेही अनिकेतला चिडवत असत ...
अनि , तु जर असाच इतका लाजरा राहिलास ना ...तर मग म्हातारा होईपर्यंत लग्न होणार नाही हा तुझे...
दिशा आणि पुनीत दोघांचेही लग्न ठरल्यामुळे आता अनिकेतचे घरचे त्याच्याही लग्नासाठी हात धुऊन मागे लागले. लव्हमॅरेज वगैरे मला नाही जमणार त्यामुळे कसाबसा आईबाबांना मुलगी शोधण्यासाठी अनिकेतने होकार दिला. अनिकेत साठी सुयोग्य वधू संशोधन सुरु झाले.
क्रमश:
अनिकेतच्या आयुष्याचा जोडीदार कसा असेल ? दिशा , पुनीत आणि अनिकेतची मैत्री पुढे काय वळण घेईल जाणून घेण्यासाठी पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.
उर्वरित भागांच्या लिंक खालीलप्रमाणे 👇
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

1 Comments
खूपच छान
ReplyDeletehttps://www.deepakkudave.com
Please do not enter any spam link in the comment box