संशयाचे मळभ .. भाग 3

 #संशयाचे मळभ .. भाग 3

✍©️ जया पाटील 


👉 संशयाचे मळभ .. भाग 1

👉 संशयाचे मळभ .. भाग 2

मागील भागात आपण पाहिले की दिशा आणि पुनीतचे लग्न ठरले त्यामुळे अनिकेतचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले. अनिकेत साठी वधूसंशोधन जोरात सुरु झाले. आता पुढे..


दिशा आणि पुनीतच्या साखरपुड्यानिमित्त अनिकेत , दिशा आणि पुनीत तिघेही भारतात आले. पुनीत आणि दिशाचा रिंग सेरेमनी मोठ्या थाटामाटात पार पडला. अनिकेतच्या आईबाबांनी पण दोन तीन मुलींची चौकशी केली होती. तोवर अनिकेतसाठी  मुली पाहण्याचा कार्यक्रम देखील पार पडला.


दोन-तीन कांदेपोह्यांचे कार्यक्रम झाल्यावर अनिकेतला त्यातली श्वेता खूप आवडली. स्मार्ट , बोलकी , हुशार आणि आय.टी क्षेत्रात काम करणारी चुणचुणीत मुलगी होती. पहिल्या नजरेतच श्वेता अनिकेतला खूप आवडली. दोघांच्याही भेटी वाढल्या आणि फायनली अनिकेतचे लग्न देखील श्वेता सोबत ठरले.


अनिकेत आणि श्वेता दोघांचाही साखरपुडा थाटामाटात झाला. अनिकेतच्या सुट्या थोड्याच शिल्लक होत्या. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ श्वेता आणि अनिकेत सोबत घालवत होते कारण अनिकेत आता परदेशात गेल्यावर लग्नाच्या वेळेसच परतणार होता , त्यामुळे आताच दोघांनीही थोडा वेळ सोबत घालवावा असे दोघांनाही वाटत होते. श्वेता आणि अनिकेत त्यांचे मित्रमैत्रिणी , नातेवाईक सगळ्यांनाच भेटायला जात होते. श्वेता प्रत्येक ठिकाणी गेल्यावर दिशा , पुनीत आणि अनिकेतच्या मैत्रीचा विषय नक्कीच निघत होता. त्या तिघांच्याही मैत्रीचे गोडवे तिला सगळ्यांकडून ऐकायला मिळत होते. तिला मनोमनी हे खटकत होते. 


एक दिवस न राहवून तिने अनिकेतला विचारले , 


काय रे ... अनिकेत , सगळीकडे दिशा आणि तुझ्या मैत्रीचे पुराण ऐकायला मिळते .. इतके काय विशेष आहे तुमच्या मैत्रीत ...?


अनिकेत तिचे बोलणे मधेच थांबवत म्हणाला ,


तुझा काहीही तरी गैरसमज होतोय ....श्वेता , माझी आणि दिशाची मैत्री नाही ग फक्त , सगळ्याच लोकांना माझ्या , दिशा आणि पुनीत तिघांच्याही मैत्रीचे कौतुक आहे.


तु नवीन आहेस , तुला कदाचित थोडेसे ऑड वाटत असेल की दोन मुले आणि एक मुलगी याची मैत्री खरेच इतकी घट्ट असू शकते... ?सगळ्यांनाच आधी हेच वाटायचे अग ....पण जसे जसे हे लोक आम्हाला जवळून ओळखायला लागले तेव्हा यांना आमची मैत्री खऱ्या अर्थाने समजली. आमच्यातील एकी हीच आमच्या मैत्रीची शक्ती आहे. 


Please , trust me shweta ...तु देखील कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जॉब करतेस ...त्यामुळे मुलगा आणि मुलगी पाहून आजकाल तरी कोणी मैत्री करत नाही ना ...माझ्या सारखा मुलगा तरी नाही.


अनिकेतचे बोलणे ऐकल्यावर श्वेताला थोडेसे अवघडल्या सारखे वाटले ....पण आता काहीतरी तर बोलावे लागणारच ना ...म्हणुन मग ती म्हणाली ...


I am sorry aniket , पण आपल्या दोघांबद्दल बोलायच्या ऐवजी सगळे लोक फक्त तुमच्या मैत्री बद्दलच बोलत बसले म्हणुन मला थोडेसे ऑड वाटले बाकी काही.... don't worry , I trust you ...


श्वेता हे सगळे बोलून मोकळी तर झाली पण  तिच्या मनातील खळबळ मात्र शांत झालीच नव्हती. कोणाला तरी आपल्या मनातील घालमेल सांगावी म्हणुन ती तिच्या एका चांगल्या मैत्रिणीकडे म्हणजे दिपाली कडे गेली. श्वेता दिपालीला तिची चांगली मैत्रीण मानत होती पण दिपालीसाठी मात्र श्वेता ही फक्त एक कॉम्पिटिटर होती. श्वेताच्या यशावर ती सतत जळत असे. 


श्वेताने अनिकेत आणि तिचे बोलणे , दिशा आणि अनिकेतची मैत्री सगळा घटनाक्रम दिपालीला पूर्णपणे सांगितला. 


आता अर्थातच सल्ला देणारा सल्लागारच श्वेताने चुकीचा निवडला असल्यामुळे सल्ला देखील असाच काहीसा मिळणार होता.


दिपालीने मनोमनी विचार केला , श्वेताच्या डोक्यात आता अनिकेत आणि दिशाबद्दलचा विचार जर आपण बसवला तर साहजिकच तिचे कामावरचे लक्ष कमी होईल आणि मग आपल्या प्रोमोशनचा मार्ग मोकळा होईल.



दिपाली श्वेताला म्हणाली , 


अग आजकालच्या मुलांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात. त्यामुळे अनिकेत आणि दिशाच्या मैत्रीला तु हलक्यात घेऊ नकोस हा... रानी , नाही तर फार महागात पडेल तुला ...


एकदम भांडु पण नकोस अनिकेत सोबत ...पण हळूहळू त्याला तुझ्या बाजूने वळवायला सुरुवात कर . मग दिशा आणि त्याच्या मैत्रीत फूट पाडून त्यांची मैत्री कायमची तोडून टाक. हे सगळे मात्र   हळूहळू कर ....म्हणजे अनिकेत तुझ्या बाजुने होईल ...


श्वेताच्या मनातील छोट्याश्या शंकेचा आता  शंकासुर झाला होता.  तिने दिशा आणि अनिकेतची मैत्री तोडायचे ठरवले. श्वेताने तिचे आणि अनिकेतचे पूर्ण बोलणे दिपालीला सांगितले तरी तिने श्वेताला असला विचित्र सल्ला दिला. 

क्रमशः 


श्वेताच्या वागण्यामुळे अनिकेत आणि दिशाच्या आयुष्यात काय खळबळ माजेल ...जाणून घ्यायची उत्सुकता आहे ना ..तुम्हाला पण ? मग नक्की वाचा पुढच्या भागात ....


तुम्हाला दिपालीचा हा सल्ला योग्य वाटतो की नाही मला कंमेंट बॉक्स मधे नक्की कळवा ....

उर्वरित भागांच्या लिंक खालीलप्रमाणे 👇

संशयाचे मळभ .. भाग 4

संशयाचे मळभ .. भाग 5

संशयाचे मळभ भाग 6 अंतिम


तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील 


Post a Comment

0 Comments