संशयाचे मळभ .. भाग 5
✍©️जया पाटील
मागील भागात आपण पाहिले की अनिकेत श्वेताला समजावून थकला होता की दिशा आणि त्याच्यात मैत्रीशिवाय कुठलेही नाते नाही पण श्वेता मात्र ऐकायला तयार नव्हती. दिशा आणि पुनीतला अनिकेतची काळजी वाटू लागते. आता पुढे ...
अनिकेत आणि श्वेताचे नाते कसे टिकवावे याचा प्रश्न दिशा आणि पुनीत समोर असतो. काही दिवसांची सुट्टी घेऊन पुनीत दिशा कडे जातो. श्वेता अजूनही काही तरी गोंधळ करेल म्हणुन तो अनिकेतला घरी जाऊन भेटायचे टाळतो. परदेशातील कायदे कडक असल्यामुळे श्वेताला आपण प्रेमाने समजावू असे सगळे ठरवतात.
दिशा, पुनीत , रोहन आणि पुजा सगळे मिळून अनिकेतच्या घरी जातात. बोलण्या बोलण्यात ते तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु श्वेताचे डोके ठिकाणावर नसते त्यामुळे ती ऐकूनच घेत नाही. शेवटी त्यांचा हा प्रयत्न व्यर्थ ठरतो.
घरी आल्यावर दिशा पुनीतला सांगू लागते ,
सगळी माझीच चुकी आहे पुनीत , मी तुमच्या सोबत मैत्री नसती केली तर हे सगळे घडलेच नसते... मला अनि साठी खूप वाईट वाटते आहे , माझ्यामुळे त्याचा संसार नको रे तुटायला ...मी आयुष्यभर नाही माफ करू शकणार स्वतःला....
दिशा स्वतःला दोषी म्हणून रडू लागते.
पुजा , रोहन, पुनीत मिळून सगळे दिशाला समजावतात ...
पुनीत बोलु लागतो ..
अग दिशू, पुजा आणि रोहन दोघांनाही आपल्या मैत्रीबद्दल माहिती आहे ... त्यांनी तर आपल्यावर कधी शंका घेतली नाही ..? कारण आपल्यावर , आपल्या प्रेमावर त्या दोघांचाही विश्वास आहे , पण श्वेता ..तिला मात्र अनि वर विश्वास नाहीये ..
अग आपण तरी लव्हमॅरेज केले..पण आपल्या अनिने मात्र कुठल्याही मुलीकडे अश्या नजरेने पाहिले नाही , इतकेच काय दिशा सोडून त्याने दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत मैत्री सुद्धा केली नाही.
त्याने पहिल्या नजरेत श्वेताला पसंद केले.
फक्त आणि फक्त तिच्यावर प्रेम केले. आपल्या अनिने तर श्वेतावरच नाही तर तिच्या हट्टावर सुद्धा प्रेम केले , तिला समजून घेतले , त्याची चुकी नसतानाही तिचे वागणे सहन केले , तिला कितीदा तरी समजावले कारण त्याच्या आयुष्यात तिच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते.
ती अनिचा आयुष्याचा जोडीदार होऊच शकत नाही ...कारण अश्या साथीदारासोबत राहून अनिचे संपूर्ण आयुष्य खराब होईल ....
आपण काही तरी केले पाहिजे.
त्यांनतर रोहन त्यांना सांगतो की आपण अनिकेत आणि श्वेता दोघांनाही काहीतरी बहाणा करून भारतात नेऊया ..तिकडे मोठी माणसे समजावतील तर श्वेता थोडे काही समजून घेईल ..
दिशा अनिल पुनीत अनिकेतच्या बॉसला भेटून सगळी हकीकत सांगतात. काहीच दिवसांसाठी भारतातील एखाद्या प्रोजेक्ट वर नेमणूक करून त्याला भारतात पाठवा म्हणुन समजावतात ..
अनिकेतचा बॉस दिशा आणि पुनीतची मैत्री पाहून त्यांना सपोर्ट करायला तयार होतो.
ते सगळे मिळून भारतात जातात. अनिकेतचे आईबाबा , श्वेताचे आईबाबा तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु श्वेता मात्र काहीच समजून घेत नाही , ती कोणाचेच मत ऐकून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. झोपणाऱ्या माणसाला जागे करता येते पण झोपेच सोंग घेणाऱ्या माणसाला जागे कसे करणार..? तसेच काहीसे श्वेता सोबत घडत असते.
शेवटी अनिकेतची सहनशक्ती संपते आणि तो श्वेताकडे घटस्फोटाची मागणी करतो. कायदेशीर प्रक्रियेने दोघेही वेगळे होतात. कदाचित श्वेताच्या जाचातून सुटण्याचा अनिकेतकडे हा एकमेव मार्ग असतो.
क्रमश:
श्वेता अनिकेतच्या आयुष्यातून निघुन गेल्यावर अनिकेतच्या आयुष्यात काय बदल होईल .? त्याला समजून घेणारा जोडीदार त्याला मिळेल का ..? जाणून घेण्यासाठी पुढचा अंतिम भाग नक्की वाचा.
पुढील भागांच्या लिंक खालीलप्रमाणे 👇
तुमच्या या लेखाबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box