संशयाचे मळभ .. भाग 6 (अंतिम)
✍©️जया पाटील
मागील भागात आपण पाहिले की श्वेताच्या संशयी स्वभावाला कंटाळून अनिकेत तिच्या सोबत घटस्फोट घेतो. ज्या श्वेतावर आपण मनापासून प्रेम केले तिला कधीच आपला विश्वास नव्हता हे जाणल्यामुळे अनिकेत मनाने खूपच खचतो. पुनीत , दिशा आणि अनिकेतचे कुटुंबीय त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात. आता पुढे
अनिकेतचे काम भारतातील ऑफिस मध्ये सुरु असते. तिकडे देखील त्याच्या गोड स्वभावाने तो सगळ्यांचे मन जिंकून घेतो. तो वरवर खुश राहण्याचा प्रयत्न करतो परंतु मनातून मात्र तो खूपच दुखावलेला असतो. फोन करून दिशा आणि पुनीत त्याची समजूत घालत असतात.
अनिकेत ऑफिसच्या कामात स्वतःला गुंतवून घेतो. तिथे सगळे लोक त्याचे खूपच कौतुक करतात त्यातच त्याची एक सहकारी असते जुई.
जुई देखील खूपच सुंदर , स्मार्ट आणि चुणचुणीत मुलगी असते आणि ती अनिकेतच्या ऑफिस मधेच एका चांगल्या पदावर काम करत असते. जुईच्या स्मार्टनेस वर ऑफिसमधले खूपच लोक फिदा असतात पण जुईला मात्र अनिकेतचा स्वभाव , त्याचा साधेपणा मनापासून भावतो.
जुई अनिकेतसोबत बोलण्याचा खूपच प्रयत्न करते परंतु अनिकेत प्रत्येक वेळेस तिला टाळतो... या गोष्टीचा तिला खूपच राग येतो आणि ती अनिकेतला जाब विचारण्याचे ठरवून त्याच्या सोबत बोलायला जाते.
अनिकेत , मला तुझ्यासोबत थोडेसे बोलायचे आहे ..प्लीज ..आपण सोबत कॉफी प्यायला जाऊया का ..? जुई
सॉरी जुई , पण मला नाही जमणार ..अनिकेत
आता मात्र जुईचा राग अनावर होतो ..
काय रे अनिकेत , किती दिवसापासून मी तुझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करते आहे ...
एक मुलगी तुला स्वतःहून इतका भाव देते आहे आणि तुझी काय रे अशी टाळाटाळ ....
माझ्यासोबत यायला ऑफिस मधले किती तरी लोक तयार आहेत ..पण मला मात्र तुझ्यासोबत जायचे आहे ....का नाही म्हणतोस तु ...? का टाळतोस असा मला ..?
Please , tell me ....नाहीतर विचार करून वेड लागेल मला अनिकेत ...please.... ! जुई
जुई , sorry to say but , माझ्या मैत्रीमुळे दिशाला खूपच त्रास झाला आहे ..नाही समजु शकले लोक दिशा आणि माझ्या मैत्रीला ...मला तुला दुसरी दिशा बनवायचे नाही ....म्हणूनच मी टाळतोय तुला ...यापेक्षा जास्त काही नाही सांगू शकणार मी तुला ... i am really sorry..
जुईला नेमकी दिशा कोण याचे कोडे पडते आणि ती ऑफिसमधल्या अनिकेतच्या मित्राकडून दिशाचा तपास करते आणि फेसबुक अकाउंट वरून दिशाला कॉन्टॅक्ट करते. अनिकेत विषयी स्वतःच्या भावना जुई दिशाला सांगते.
अनिकेत सोबत श्वेताची वागणूक , त्याचा भूतकाळ सगळे काहीच दिशा जुईला सांगते. जुईला मात्र त्याच्या भूतकाळाविषयी काहीच प्रॉब्लेम नसतो त्यामुळे जुई दिशा कडे मदत मागते.
आपल्या मित्राच्या सुखासाठी दिशा आणि पुनीत दोघेही जुईला मदत करायला तयार होतात.
दिशा आणि पुनीत दोघेही भारतात परततात. पुनीत अनिकेतला घेऊन बाहेर जातो आणि जुईसोबत त्याची भेट घालून देतो. जुईला समोर पाहून अनिकेत थोडा चिडतो ...पण जुई अनिकेतला थांबवून बोलते ...
अनिकेत , प्लीज आज तरी माझे बोलणे ऐकून घे ...तु ऑफिस जॉईन केलेस त्या दिवसापासून तु मला आवडू लागला होता आणि श्वेताबद्दलचे सगळे काही मला माहिती आहे पण एक अनुभव वाईट मिळाला म्हणून तु सगळ्यांबाबतीत असा गैरसमज करू नकोस ...प्लीज ...
I love u aniket , will u marry me ?
सगळ्यांनी घातलेल्या समजुतीने अनिकेत जुईसोबत लग्नाला तयार होतो. जुईसोबतच्या संसारात तो खूपच खुश असतो. दिशा , पुनीत आणि त्याची मैत्री अजूनही तितकीच घट्ट असते.
अनिकेत - जुई , दिशा - रोहन , पुनीत - पुजा सगळे मिळून बाहेर फिरायला जातात आणि एका कॅफे मध्ये अनिकेतला पुन्हा श्वेता दिसते ...
अनिकेत आणि जुईला सोबत इतके खुश पाहून श्वेताला खूपच पश्चाताप होतो कारण ज्या दिपालीच्या सांगण्यावरून ती अनिकेतवर संशय घेते तिच दिपाली अनिकेत सोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिची साथ सोडते. दिपालीच श्वेताला म्हणते ,
अग अनिकेत सारखा चांगला नवरा तुला सांभाळता आला नाही ..अशी कशी ग तु श्वेता ..?
आता मात्र पश्चताप करण्याशिवाय श्वेताजवळ कुठलाच मार्ग नसतो.
आता तूम्हीच ठरवा यात नेमका दोष कुणाचा ..? चुकीचा सल्ला देणाऱ्या दिपालीचा .. की चुकीच्या व्यक्तीचा सल्ला ऐकून एका छोट्याश्या गैरसमजातुन आपले आयुष्य उध्वस्त करणाऱ्या श्वेताचा ...?
तुमचा अभिप्राय मला कंमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.
वाचकहो , आपल्या प्रत्येकाला आयुष्यात कोणाच्या तरी सल्ल्याची गरज असते परंतु समोरच्या व्यक्तीने दिलेल्या सल्ल्याचे परीक्षण न करता तो सल्ला योग्य मानणे कितपत योग्य आहे ..?
मंथरेने कैकयीला दिलेल्या सल्ल्यामुळे संपूर्ण रामायण घडले , शकुनी मामाच्या सल्ल्यामुळे दुर्योधना सारख्या वीरयोद्धयाची दुर्गती झाली आणि कृष्णाच्या मार्गदर्शनामुळे पांडव यशस्वी झाले. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे.
त्यामुळे एखादा व्यक्ती ज्यावेळेस तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी आला तर त्याला योग्य सल्ला देण्याची जबाबदारी तुमचीच .....!
आणि हो...
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे सल्ला घेण्यासाठी जातात त्यावेळेस ती व्यक्ती खरोखरच योग्य आहे की नाही याची पडताळणी जरूर करा.
So be selective 😊😊 ...!
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

1 Comments
दोष सल्ला देणाऱ्याचा नक्कीच नाही..
ReplyDeleteदोष आहे शंका घेणाऱ्या श्वेताच्या स्वभावाचा,तिचा विश्वास असता नवऱ्यावर तर असं झालं नसतं..
👌👌👌👌छान कथा..
Please do not enter any spam link in the comment box