संशयाचे मळभ .. भाग 4

 संशयाचे मळभ .. भाग 4

✍©️जया पाटील 


👉 संशयाचे मळभ .. भाग 1

👉 संशयाचे मळभ .. भाग 2

👉 संशयाचे मळभ .. भाग 3


मागील भागात आपण पहिले की सगळ्यांनी अनिकेत आणि दिशांच्या मैत्रीचे गोडवे गायलेले श्वेताला फारसे आवडले नाही , तसे तिने अनिकेतला विचारले पण ...आणि अनिकेतने देखील त्याची बाजू क्लिअर केली. श्वेताच्या मनातील घालमेल तिने तिच्या ऑफिस मैत्रिणीला म्हणजेच दिपालीला सांगितली. दिपालीने मात्र श्वेताला योग्य सल्ला न देता तिच्या मनाची शंका आणखीनच वाढवली. आता पुढे ...


अनिकेतने बाजू क्लिअर केल्यामुळे श्वेता आता थोडीशी रिलॅक्स झाली पण ती त्यांच्या दोघातील प्रत्येक गोष्ट दिपालीला सांगत असे  , आणि दिपाली आपल्या मनाचे काहीबाही सल्ले देऊन तिचा गोंधळ आणखीनच वाढवून टाकत असे.


दिशा आणि पुनीतच्या सुट्ट्या संपत आल्या आणि लग्नासाठी त्यांना आणखीन सुट्ट्या हव्या होत्या त्यामुळे ते दोघेही ऑफिस जॉईन करण्यासाठी ते परदेशी रवाना झाले.


श्वेताने मोकळा श्वास घेतला. अनिकेत आणि श्वेता दोघेही खूप वेळ सोबत घालवत होते. श्वेताला अनिकेत खूप मनापासून आवडत होता पण तिच्या मनातले दिशा बाबतीतले शंकाचक्र मात्र थांबत नव्हते. अनिकेतच्या सुट्ट्या देखील संपत आल्या आणि तो परदेशी रवाना झाला. मोठ्या जड अंतःकरणाने श्वेताने अनिकेतला निरोप दिला. 


अनिकेत तिला सांगून गेला ,


अरे वेडाबाई ... , थोडाच काळ जायचा आहे .. मग आपण कायमच सोबत असणार आहोत , इतके upset नको होऊस ग ..


थोडे दिवसांनी अनिकेत , दिशा आणि पुनीत तिघेही भारतात आले. अनिकेत - श्वेता , दिशा - रोहन , पुनीत - पुजा , तिघीही जोडप्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. 


श्वेताच्या गुड लक मुळे तिची ट्रान्सफर अनिकेत असलेल्या शहरातील तिच्या कंपनीच्या दुसऱ्या ब्रांच मध्ये झाली. त्यामुळे नवीन जॉब मिळायचे तिचे टेन्शन देखील कमी झाले. श्वेताला प्रोमोशन देखील मिळाले. इकडे दिपालीच्या मनातील असूया आणखीनच वाढीस लागली. श्वेताला इतके भरकटवले तरी तिचे यश मात्र तिळमात्र कमी झाले नाही , याचा दिपालीला खूप राग आला.


अनिकेत आणि श्वेता , आणि बाकी सगळे सुट्ट्या संपून नोकरीसाठी परदेशी परतले. सगळे काही खूप छान सेटल झाले. सगळे खूप आनंदात होते. इतर दिवस तर प्रत्येकाला वेळ नसायचा परंतु शनिवार आणि रविवार अनिकेत , दिशा , रोहन , पुनीत आणि पुजा सगळे भेटत असत. बाकी सगळ्यांचा श्वेताला काहीच प्रॉब्लेम नव्हता परंतु अनिकेत आणि दिशा दोघेही सोबत असलेले  किंवा ते दोघेही बोलत असले तरी श्वेताला आवडायचे नाही. ती लगेच त्यां दोघांच्याही मध्ये जाऊन बोलत असे किंवा अनिकेतला दिशा पासून दूर नेत असे. 


दिपाली सोबत श्वेताचे बोलणे चालूच होते त्यामुळे मंथरेचे काम दिपाली अचूक करत होती. श्वेताला अनिकेत समजावून समजावून थकला होता की दिशा आणि माझ्यात मैत्रीशिवाय कुठलेही नातं नाही. 


पण मनी वसे ते स्वप्नी दिसे... अशीच काहीशी अवस्था श्वेताची झाली होती. तिच्या मनातील शंकाना ती दूर ठेवूच शकत नव्हती आणि त्यात या वाईट विचारांना खत-पाणी घालायला दिपाली होतीच .... ज्या गोष्टी प्रत्यक्षात घडत नव्हत्या  त्यांचा देखील समज श्वेता तिच्या मनानेच करून घेत होती. 


आपल्या मित्राच्या संसारात आपला त्रास नको म्हणुन दिशाने अनिकेतला भेटणे बंद केले होते परंतु श्वेताला आपल्यावर विश्वास नाही ही एकच गोष्ट अनिकेतला खूप खटकत होती. श्वेता आणि अनिकेत मधील वाद वाढू लागले होते. एक दिवस भांडणात श्वेताने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे देखील नुकसान केले. अनिकेत श्वेताच्या वागण्याने त्रस्त झाला होता. 


श्वेता राग आल्यावर दिशाला ई-मेल करून करून त्रास देत होती. एक दिवस तर श्वेता चक्क रोहन म्हणजे दिशाच्या नवऱ्याला भेटायला गेली. तिथे तिने दिशा आणि अनिकेत बद्दल रोहनला काहीही सांगायला सुरुवात केले. रोहनला या सगळ्या गोष्टींची कल्पना आधीच होती त्यामुळे त्याने तिच्या कडे लक्ष दिले नाही. अनिकेतला हे माहिती पडल्यावर मात्र अनिकेतचा राग अनावर झाला. 

आपल्या संसाराचे तर वाटोळं झाल आहे पण दिशाच्या संसारात तरी काही त्रास नको असे अनिकेतला वाटत होते. 


पुनीत आणि दिशाला अनिकेतची खूप काळजी वाटत होती..पण आता पुढे काय करावे सुचत नव्हते. अनिकेतची काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आली होती.


क्रमश:


अनिकेत श्वेताचा गैरसमज दूर करण्यासाठी काय करेल ? त्याचा निर्णय काय असेल ? हे सगळे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा. 


उर्वरित भागांच्या लिंक खालीलप्रमाणे 👇

संशयाचे मळभ .. भाग 5

संशयाचे मळभ भाग 6 अंतिम


तुमचे या लेखाबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील 





Post a Comment

0 Comments