तुम्हीच माझे नंद-यशोदा संपूर्ण कथा

तुम्हीच माझे नंद-यशोदा संपूर्ण कथा 

जान्हवीचे सासूसासरे आणि पती अनिकेत मेंदूला प्रचंड मार लागल्यामुळे वाचू शकले नाही पण जान्हवी मात्र उपचारांना साथ देत होती. जान्हवीला शुद्ध आली पण आपल्या कुटुंबियांच्या मृत्यूबाबतीत समजल्यावर ती खूप खचली. सुदैवाने जान्हवीची दोन महिन्याची लेक अन्वी मात्र सुखरूप होती. जान्हवीची तब्येत पुन्हा ढासळू लागली. अन्वीची जबाबदारी निहारिका आणि ऋषिकेशवर टाकून जान्हवी निजधामाच्या प्रवासाला निघून गेली. आता पुढे ...


जान्हवीने अन्वीचा निहारिकाच्या हातात दिलेला छोटासा हात पाहून निहारिकाला एकदम भरून आलं. तिने निपचित पडलेल्या जान्हवीचे डोळे दोन्ही हाताने बंद केले आणि कृतज्ञतेने देवाच्या घरी गेलेल्या जान्हवीच्या शांत देहाकडे पाहत निहारिका म्हणाली...


" मी आयुष्यभर सुखी रहावं म्हणून हे मातृत्वाचं दान तू माझ्या पदरात टाकून गेलीस जान्हवी. खरं तर ज्यावेळी मी अन्वीला पहिल्यांदा माझ्या कुशीत घेतलं त्याच क्षणी मी तिची आई झाली होती पण तुझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तिच्यावर कशी हक्क सांगणार होती..? तुझी अमानत म्हणून तिला जपत होती मी ,पण आज मात्र किती मोठ्या मनाने तू तुझ्या मातृत्वाचा ,अन्वीवरचा हक्क सोडून मला कृतार्थ करून या जगातून निघून गेलीस."

" प्रत्येक आईसाठी आपलं बाळ सगळ्यात अमूल्य असतं आणि त्याला दुसऱ्याकडे सोपवतांना किती त्रास होतो हे फक्त एक आईच समजू शकते. तुलाही खूप त्रास झाला असेल ना जान्हवी ..? तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही पण काळजी करू नकोस. जान्हवी आणि अनिकेतची आठवण असलेल्या आपल्या अन्वीला मी जीवापाड जपेन. मी तिची आई होईल ....आई ..."

इतकं बोलत असताना निहारिकाला अश्रू अनावर झाले. ऋषिकेशने तिला सावरलं. त्याचवेळेस अलकाताई आणि रविंद्रराव देखील हॉस्पिटलला पोहोचले. जान्हवीचे आईबाबा सदाशिवराव आणि मेघाताई पण तिथेच उपस्थित होत्या. आपल्या लेकीचा , जावयाचा मृत्यू पचवणं त्यांना खरंच खूप अवघड होतं पण जान्हवीने अन्वीला निहारिकाकडे सोपविण्याचा निर्णय मात्र त्यांना मनापासून मान्य होता.

कोणी कोणाला समजवावे आणि कोणी कोणाचे अश्रू थांबवावे कोणालाच काही समजत नव्हते. खरंतर ती वेळच तशी होती. देवाने दुश्मनावरही अशी वेळ आणू नये. ऋषिकेशने जान्हवीच्या आईबाबांना धीर दिला. अलकाताई आणि रविंद्रराव पण त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते.


 तुम्हीच माझे नंद-यशोदा भाग एक

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_14.html

तुम्हीच माझे नंद-यशोदा भाग दोन 

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_15.html

तुम्हीच माझे नंद-यशोदा भाग तीन 

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_16.html

तुम्हीच माझे नंद-यशोदा भाग चार 

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_17.html

तुम्हीच माझे नंद-यशोदा भाग पाच 

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_18.html

तुम्हीच माझे नंद-यशोदा भाग सहा 

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_19.html

Post a Comment

0 Comments