माझ्या माहेरचा मान मलाच जपायला हवा भाग ९


#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_९

©️जया पाटील

भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_54.html

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_23.html

भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_24.html

भाग चार वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_25.html

भाग पाच वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_27.html

भाग सहा वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_49.html

भाग सात वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_28.html

भाग आठ वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_30.html


भाग नऊ वाचा पुढे...👇👇

मागील भागात आपण पाहिलं की अवंतीचा तिच्या सासरच्या घरातील पहिला दिवस खूपच छान गेला पण दुसऱ्याच दिवशी निर्मलाताईंनी शेजारच्या बायकांना अवंतीला भेटण्यासाठी बोलावलं. त्यावेळेस शेजारच्या लेलेंताईंनी निर्मलाताईंचा अवंतीच्या माहेरच्या परिस्थितीमुळे अपमान केला. अवंतीने त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. निर्मलाताईंना त्यांचा अपमान सहन झाला नाही. त्यामुळे निर्मलाताईंनी अवंतीला चांगलंच सुनावलं. अवंतीची काही एक चूक नसतांना निर्मलाताईंनी तिला खूप काही ऐकवलं ही गोष्ट आदिराजला पटली नाही. त्यामुळे निर्मलाताई आणि आदिराज यांच्यात वाद झाला. त्यामुळे अवंती आणि एकनाथराव व्यथित झाले. आता पुढे...

आदिराज आणि निर्मलाताई दोघांचाही वाद झाला आणि चिडून ते आपापल्या रूममध्ये निघून गेले. मायलेकराच्या या वादामुळे एकनाथराव खूप व्यथित झाले. निर्मलाताई आणि आदिराज मधील भांडण मिटवण्यासाठी त्यांना काहीच उपाय सुचत नव्हता तेव्हा एकनाथराव घरातल्या देवघरात गेले. देवापुढे हात जोडून मनोमन प्रार्थना करू लागले..

" देवा , माझ्या गोकुळासारख्या घराला कोणाची दृष्ट लागली? भांडण तर सोडा पण या घरात कोणी ऊंच आवाजात सुद्धा बोललं नाही आज पर्यंत आणि आज मायलेकरामधला वाद इतका प्रकोपाला नेलास देवा ? आदिराज आमचा एकुलता एक मुलगा आहे. आमचं आयुष्य आहे तो. त्याच्या पासूनच निर्मलेला असं दुरावू नकोस. आदिराजचा राग नाही सहन करू शकणार निर्मला ... कोलमडून पडेल रे ती... आई लेकराला असं दुरावू नको रे परमेश्वरा ...! आता तुच काहीतरी मार्ग सुचव या संकटातून बाहेर येण्याचा..."  

देवाला विनंती करत एकनाथराव तिथेच बसून होते. आपल्या घरातील शांतता परत यावी म्हणून काहीतरी उपाय करायला हवा असा विचार ते मनाशी करत होते. देवावर त्यांचा खूप विश्वास होता त्यामुळे आपल्या घरातील सगळ्यांचा एकमेकांविषयी असलेला राग नक्कीच कमी होईल अशी त्यांना मनापासून खात्री होती. बरेच दिवस लोटले पण आदिराज आणि निर्मलाताईंमधला अबोला कायम होता.  

अवंती आणि एकनाथराव दोघांनाही आपापल्या परीने समजावण्याचा प्रयत्न करतच होते पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. एकनाथराव दिवसेंदिवस व्यथित होत होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्यामुळे आदिराज आणि आईंमध्ये दुरावा निर्माण झाला असा विचार करून अवंती पण खूप दुःखी होत होती. आदिराज आणि निर्मलाताई दोघंही खूप हट्टी होते त्यामुळे मनात वाटत असलं तरीही कोणीही एकमेकांशी स्वतःहून बोलायला तयार होत नव्हतं. दोघांचाही इगो त्याच्या आड येत होता.  

अश्यातच एक महिना निघून गेला पण घराच्या वातावरणात काहीच सुधारणा झाली नाही. एकनाथराव आणि अवंतीचे आदिराज आणि निर्मलाताईंना एकमेकांसोबत बोलते करण्याचे प्रयत्न फोल ठरत होते. कोणीतरी असाच व्यक्ती यांच्यातील वाद मिटवू शकेल जो दोघांनाही खूप जवळून ओळखतो. जो दोघांच्याही मनाच्या जवळ असेल असा विचार एकनाथरावांच्या मनात आला. हा विचार करत असतांना एकनाथरावांच्या मनात एक विचार आला रमा आजीला तिथे बोलावण्याचा.  

रमा आजी म्हणजे एकनाथरावांच्या सासूबाई अर्थातच निर्मलाताईंच्या आई. आदिराज तर रमाआजीच्या मनाच्या खूप जवळ होता. दोघंही नातू आजीमध्ये खूप सुंदर बॉण्डिंग होते. रमा आजी खूप हुशार आणि चाणाक्ष व्यक्तिमत्व होते. सगळयांना योग्य समज देऊन हा जवळचा आणि तो दूरचा असा फरक न करता प्रत्येकाला किंवा योग्य व्यक्तीला योग्य न्याय देणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे आपल्या घराची विस्कटलेली घडी आता रमा आजीचं बसवू शकतात हे एकनाथरावांनी हेरले.  

आदिराजच्या लग्नाच्या वेळेस तब्बेत बरी नसल्यामुळे रमाआजी असंही लग्नाला येऊ शकल्या नव्हत्या त्यामुळे आता त्यांना इथे बोलवायची हीच योग्य वेळ आहे हे एकनाथरावांच्या लक्षात आले. रमा आजींना आता इथे बोलवायचं असा विचार करून ते रूममध्ये आले.  

निर्मलाताई एकनाथरावांसोबत थोडं फार बोलत असल्या तरीही झालेल्या प्रसंगामुळे त्या अजूनही रुसलेल्याच होत्या. एकनाथराव रूम मध्ये आले. निर्मलाताईंचा मूड ठीक करण्यासाठी ते इकडच्या तिकडच्या गप्पा करू लागले. आधीच्या भांडणाचा कुठलाच विषय न काढता ते निर्मलाताईंना म्हणाले ...

" निर्मला , बरेच दिवस झाले मनात एक विचार येतो आहे माझ्या. रमा आईंना गावाकडून बोलवावं आपल्याकडे. आदिराजच्या लग्नाच्या वेळी तब्बेत खराब असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत आपल्याकडे. आता त्यांची तब्येत बरी आहे तर बोलावून घ्यावं म्हटलं त्यांना काही दिवस इकडे. तेवढंच तुला पण छान वाटेल. आपलं घर ही भरल्यासारखं वाटेल. तुझी काय इच्छा आहे ते सांग मग मी आजच गावी फोन करून तिकडच्या मंडळीला त्यांना इथे आणण्याबद्दल लगेच कळवतो."  

प्रत्येक स्त्रीच्या जीवनात माहेर आणि माहेरची माणसं यांचं स्थान मौल्यवान असतं. आपली आई  इथे येणार ही गोष्ट ऐकताच निर्मलाताईंची कळी खुलली आणि त्यांनी लगेचच एकनाथरावांना होकार दिला. एकनाथरावांनी लगेचच निर्मलाताईंच्या भावाला फोन करून रमा आजीला तिथे आणण्याबद्दल कळवलं. एकनाथरावांनी दुसऱ्याच दिवशी रमाआजीला आणण्यासाठी गावी जायचं ठरवलं. सगळ्या गोष्टींची निर्मलाताईंना कल्पना देऊन ते बाहेर निघून गेले.

आपली आई येणार म्हणून निर्मलाताई खूप खुश होत्या. "अवंती ,आदिराज आणि एकनाथराव तिघंही एकाबाजूने होऊन मला एकटे पाडतात ना. आता येऊ देत माझ्या आईला.तेव्हा एकेकाला पाहून घेईल मी. " असा विचार निर्मलाताईंच्या मनात आला. आपली आई आल्यावर ती फक्त आपल्यालाच सप्पोर्ट करेन याची निर्मलाताईंना खात्री होती. त्यामुळे आपल्याला अवंतीचा बदला घेण्यासाठी आईची साथ मिळणार असा विचार करून त्या खूप आनंदी होत्या.  

दुसऱ्या दिवशी एकनाथराव रमाआजींना आणायला गावी गेले. आपल्या नात सुनेला पहिल्यांदा पहायला मिळणार म्हणून रमाआजी खूप आनंदात होत्या. प्रवास करून रमा आजी घरी आल्या. आल्यावर लगेचच अवंतीने त्यांचा नमस्कार केला. त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था पाहिली. रमाआजीचे पाय प्रवासात सुजले होते म्हणून तिने आजीच्या पायांना गरम पाण्याच्या पिशवीने शेक दिला. आपल्या नात सुनेने केलेल्या या सेवेमुळे रमा आजी खूपच आनंदी झाल्या.  

रमा आजींनी एक चांदीचा करंडा अवंतीला सूनमुख पाहायचं शगुन म्हणून भेट दिला.

" निर्मले ,नशिब काढून आलीस हा , म्हणूनच अवंती सारखी गुणाची लेक तुझी सून झाली. माझ्या आदिराजच्या लग्नाला यायला जमलं नाही म्हणून खूपच दुःखी होती मी पण आज अवंतीला पाहून खूपच समाधान वाटतंय. माझ्या आदिराजच्या पसंतीचा मला खूप अभिमान वाटतोय. "  

रमा आजीच्या या बोलण्याचा निर्मलाताईंना खूप राग आला. त्यांना काहीच न बोलता नाक मुरडून निर्मलाताई तिथून निघून गेल्या. निर्मलाताईंचं

काहीतरी बिनसलं आहे हे रमा आजीच्या लक्षात आलं. रमाआजीला वाईट वाटायला नको म्हणून नाईलाजाने का होईना आदिराज आणि निर्मलाताई एकमेकांसोबत बोलू लागले. एकनाथरावांना या गोष्टीचा खूप आनंद झाला. सगळं काही सुरळीत होईल अशी आशेची किरण त्यांना दिसू लागली.

रमा आजी घरी आल्यावरही अवंती घरातील कामं आणि ऑफिस दोघांचही काम व्यवस्थित सांभाळत होती. रमाआजींची पण ती  खूप काळजी घेत होती. त्यांना हवं नको ते सगळं काही अवंती अगदी व्यवस्थित पाहत होती. निर्मलाताईंसोबत पण अवंती अगदी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होती पण निर्मलाताईंचं  मात्र छोट्या छोट्या कारणावर अवंतीचा अपमान करणं सुरूच होतं. हळूहळू रमा आजीच्या नजरेत घरातील परिस्थिती आली. घरातील अवंतीचं स्थान रमाआजींच्या लक्षात आलं. रमा आजींनी एकदा-दोनदा अवंतीची बाजू घेऊन निर्मलाताईंसोबत बोलण्याचा प्रयत्नही केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.  

संक्रांतीचा सण जवळ आला. रमाआजींनी अवंतीचा पहिल्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम करायला निर्मलाताईंना सांगितलं. नाखुशीनेच का होईना पण जगाला दिखावा करण्यासाठी 

निर्मलाताईंनी अवंती साठी नवीन दागिने बनवले. हळदीकुंकवाचा मोठा कार्यक्रम ठेवला. अवंतीला खूप छान तयार होण्यासाठी सांगितले. अवंती तयार झाली पण निर्मलाताईंना हवं होतं तसं मात्र नाही कारण विनाकारण दिखावा करणं तिला कधीच मान्य नव्हतं. हळदीकुंकवाला येणारी प्रत्येक स्त्री फक्त एकच बोलून जात होती...  

"निर्मलाताई , सून छान आहे पण तुम्हा दोघींच्या आवडीनिवडी मात्र खूपच वेगळ्या आहेत. आदिराजची निवड तुमच्या पेक्षा खूपच वेगळी आहे. तुमच्यापेक्षा तुमची सून खूपच साधी आहे ." 

निर्मलाताईंना खूपच वाईट वाटलं. रागारागात त्यांनी अवंतीसाठी केलेले सगळे दागिने परत घेतले. एकनाथरावांनी ,आदिराज आणि रमा आजीनी सगळ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. निर्मलाताईंनी त्या रात्री सगळ्यांसमोर अवंतीला सांगितलं ...

" अवंती , तू माझ्या आदिराजसाठी बायको म्हणून मला कधीच पसंत नव्हती. तरीही नाखुशीने का होईना त्याची बायको म्हणून मी तुला स्वीकारलं. तुझ्याकडून खूप काही अपेक्षा होत्या माझ्या , पण तु मात्र त्या पूर्ण करण्याकडे कधीच लक्ष दिलं नाहीस. "

"  तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं. तुझ्यामुळे माझा नवरा माझ्या विरोधात गेला. त्यामुळे सून म्हणून माझ्या मनातून, माझ्या कडून मिळणाऱ्या सगळ्या अधिकारांतून मी तुला बेदखल करते आहे. माझ्यानंतर माझ्या स्त्रीधनावर सुद्धा तुझा अधिकार मला मान्य नाही. माझ्या संपूर्ण स्त्रीधना वर अर्थातच माझ्या सगळ्या दागिन्यांवर देखील तुझा कधीच  अधिकार असणार नाही. "

एवढं बोलून निर्मलाताई रूम मध्ये निघून गेल्या. त्यांच्या मागोमाग रमाआजी त्यांना समजावण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये गेल्या. रमाआजींनी निर्मलाताईंना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण निर्मलाताई मात्र काही एक ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. 

" आई , सगळे माझ्या विरोधात गेलेच आहेत. तुलाही माझ्या विरोधात जायचं असेल तर खुशाल जा. मी सवय केली आहे आता एकटं जगण्याची.."  

असं निर्मलाताई चिडून रमाआजीला म्हणाल्या. निर्मलाताईंची स्वतःची मनःस्थिती देखील खूप खराब झाली आहे हे रमाआजींच्या लक्षात आले त्यामुळे निर्मलाताईंना पुढे काहीच न बोलता त्या शांत राहिल्या.  

संक्रान्तीच्या दिवशी निर्मलाताईंच्या बोलण्यामुळे अवंतीला खूपच वाईट वाटलं मात्र तिने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. ती पुन्हा निर्मलाताईंसोबत नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करू लागली. तिने तिच्या कर्तव्यात कुठलीच कसूर ठेवली नाही.  

हळूहळू रमाआजी घरातील परिस्थिती नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होत्या. एक दिवस निर्मलाताई घरी नसतांना रमा आजींनी एकनाथरावांना निर्मलाताईंच्या अश्या वागण्यामागचं कारण विचारलं तेव्हा एकनाथरावांनी रमा आजीला सगळ्या गोष्टींची कल्पना दिली.  

निर्मलाताई चुकीच्या आहेत हे रमाआजींना कळत होतं पण आताच्या परिस्थितीत आदिराज आणि एकनाथराव अवंतीसाठी त्यांच्या विरोधात उभे होते. अश्यावेळी रमाआजींसोबत घरातील सगळेच जण जर निर्मलाताईंच्या विरोधात गेले तर त्या डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात किंवा अजून काहीतरी वाकडं पाऊल उचलू शकतात असा विचार रमाआजींच्या डोक्यात आला. काहीतरी वेगळी युक्ती वापरून हा गुंता सोडवायला हवी असाही विचार त्यांच्या डोक्यात डोकावू लागला.

क्रमश:

निर्मलाताईंचा अवंतीवरचा राग दूर करण्यासाठी रमाआजी काय करतील? निर्मलाताई सून म्हणून अवंतीला स्वीकारतील का? देशमुखांच्या घरातील आनंद पुन्हा परत आणण्यासाठी रमा आजी कोणते प्रयत्न करतील? रमा आजींच्या प्रयत्नांना यश मिळेल का? निर्मलाताई आणि अवंतीच्या नात्याचं भविष्य काय असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा पुढचा  भाग वाचायला मात्र विसरू नका.

काही अपरिहार्य कारणामुळे या कथेचा हा भाग पोस्ट करण्यास उशीर झाला त्याबद्दल मनापासून क्षमा मागते. यापुढेही तुम्हा वाचकांचे प्रेम असंच राहू द्या आणि आम्हाला समजून घ्या हीच अपेक्षा. धन्यवाद 🙏🙏

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Pinterest/Google 




 


Post a Comment

0 Comments