माझ्या माहेरचा मान मलाच जपायला हवा भाग १०


#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_१०

©जया पाटील

भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_54.html

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_23.html

भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_24.html

भाग चार वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_25.html

भाग पाच वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_27.html

भाग सहा वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_49.html

भाग सात वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_28.html

भाग आठ वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_30.html

भाग नऊ वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/04/blog-post.html


भाग दहा वाचा 👇👇

मागील भागात आपण पाहिलं की आदिराज आणि निर्मलाताईंचा अवंतीच्या माहेरच्या परिस्थितीवरून वाद होतो. शब्दाला शब्द वाढतो आणि दोघंही एकमेकांसोबत बोलणं बंद करतात. मायलेकरांचा हा अबोला एकनाथरावांना व्यथित करतो. घरातील वातावरण पुन्हा पूर्वी सारखं व्हावं म्हणून एकनाथराव आदिराजच्या आजीला , निर्मलाताईंच्या आईला अर्थातच रमा आजींना गावाहून त्यांच्या घरी घेऊन येतात.

अवंती रमा आजींची खूप काळजी घेते. निर्मलाताईंचं अवंतीविषयीचं मत फारसं चांगलं नाही हे रमाआजींच्या लक्षात येतं. त्या अवंतीची बाजू घेऊन निर्मलाताईंना समजावण्याचा प्रयत्न करतात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. संक्रातीच्या दिवशी अवंतीच्या राहणीमानामुळे पुन्हा निर्मलाताई तिचा अपमान करतात. रमाआजी हे सगळं पाहून व्यथित होतात. आता पुढे...

संक्रातीच्या दिवशी निर्मलाताईंनी अवंतीचा खूप अपमान केला तरीही ती त्यांच्यासोबत नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होती. रमाआजीही परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत होत्या. निर्मलाताई क्षणोक्षणी अवंतीचा अपमान करत होत्या. निर्मलाताईंना रमाआजी समजावण्याचा खूप प्रयत्न करत होत्या पण त्यात त्या अपयशी ठरत होत्या.  

निर्मलाताई चुकीच्या आहेत हे रमाआजींना कळत होतं पण आताच्या परिस्थितीत आदिराज आणि एकनाथराव अवंतीसाठी निर्मलाताईंच्या विरोधात उभे होते. अश्यावेळी रमाआजींसोबत घरातील सगळेच जण जर निर्मलाताईंच्या विरोधात गेले तर त्या डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात किंवा अजून काहीतरी वाकडं पाऊल उचलू शकतात असा विचार रमाआजींच्या डोक्यात आला. काहीतरी वेगळी युक्ती वापरून हा गुंता सोडवायला हवी असाही विचार त्यांच्या डोक्यात डोकावू लागला.

अवंती निर्मलाताईंना प्रतिउत्तर करत नाही त्यामुळे निर्मला तिचा जास्त अपमान करते, तिला गृहीत धरते. अवंतीच्या चांगुलपणाचा निर्मलाताई  जास्तच गैरफायदा घेता आहेत ही बाब रमाआजीच्या लक्षात आली त्यामुळे आपण आता निर्मलाला समजावून सांगण्यापेक्षा अवंतीला बोलतं करायला हवं असं त्यांनी मनाशी ठरवलं.

एक दिवस एकनाथराव,आदिराज, निर्मलाताई आणि रमाआजी जेवण करत असताना ,अवंतीने निर्मलाताईंना आग्रहाने भात वाढला. त्यामुळे चिडून निर्मलाताईंनी अवंतीचा खूप पाणउतारा केला. अवंती काहीच न बोलता किचन मध्ये निघून गेली. निर्मलाताईंच्या वागण्याचा रमाआजींना मात्र खूप राग आला. त्या उठून अवंतीच्या मागे गेल्या..

अवंती आपल्या डोळ्यात आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती. रमाआजी तिचा हात हातात घेऊन तिच्यासोबत बोलू लागल्या..

" अवंती , का सहन करते आहेस तु निर्मलेचं असं वागणं..? तुझ्या मुळेच या घराला घरपण आहे. या घराची लक्ष्मी आहेस तु. अगदीच काही दिवसातच या घराला आपलंसं केलं आहे तु.खूप कष्ट करते आहे तु हे घर जपण्यासाठी. पण तुझ्या चांगुलपणाची जाणीव नाही माझ्या निर्मलेला आणि जोपर्यंत ही जाणीव तू तिला करवून देणार नाही , तोपर्यंत असंच चालू राहिल. त्यामुळे उलट बोलायला शिक अवंती. तुझ्या हक्कासाठी.. तुझ्या स्वाभिमानासाठी बोलायला शिक. मी आहे तुझ्या सोबत.. नेहमीच...! "

"  बाळ अवंती , दिवसभर तू घरासाठी राब राब  राबतेस. तरीही निर्मला तुझ्यावर सतत चिडचिड करते. तुझी चुकी नसली तरी देखील तू तुझा अपमान सहन करतेस? निर्मलेला प्रतिउत्तर का करत नाहीस? अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो हे माहित आहे ना तुला...? "  

रमा आजींचं बोलणं ऐकून अवंतीला खूप भरून आलं.तिने रमा आजींच्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

" थँक्यू आजी , तुम्ही मला समजून घेतलं म्हणून. आई चिडचिड करतात मान्य आहे मला आजी, पण त्यांना प्रतिउत्तर करून या घरातील शांतता अजून खराब नाही करायची मला. मी आईंना कधीच पसंत नव्हते पण आदिराजच्या हट्टापुढे नमून त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला. त्यांच्यावर हे नातं लादलं गेलं आहे आजी त्यामुळे त्या मला स्वीकारण्यास वेळ घेणारच ना. बाबा, आदिराज आणि आता तुम्ही मला इतकं समजून घेता आहात हेच खूप आहे माझ्यासाठी. "

" असंही दिवसभर ऑफिसचं खूप टेंशन असतं बाबा आणि आदिराज दोघांनाही. त्यामुळे आईंसोबत वाद घालून , त्यांना उलटं बोलून मला बाबांचं आणि आदिराजचं टेन्शन वाढवायचं नाहीये अजून. ऑफिसचा ताण असतोस त्यांना आणखीन आईंना क्रॉस करून घरातील वातावरण नाही खराब करायचं मला. माझ्यामुळे अजून टेन्शन नाही वाढवायचं मला आदिराज आणि बाबांचं. असंही मी आईंची सून आहे. मी त्यांच्या हक्काची आहे. त्यामुळे त्या चिडतात माझ्यावर. या घरातील शांतता टिकवण्यासाठी मी माझा हवा तितका अपमान सहन करायला तयार आहे आजी.."

अवंतीचं बोलणं ऐकून रमा आजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रमाआजी अवंतीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाल्या..

" किती समजूतदार आहेस ग पोरी ..! इतक्या लहान वयात पण किती समजूतदारपणा आहे तुझ्यात आणि एकीकडे माझी लेक वयाने इतकी मोठी असून सुद्धा सुड घेण्याच्या हट्टाला पेटली आहे. मला माफ कर अवंती. निर्मलेच्या वतीने मी माफी मागते तुझी."

असं म्हणून रमा आजींनी अवंतीसमोर हात जोडले. रमा आजींचे हात हातात घेऊन अवंती त्यांना म्हणाली..

"अहो आजी, हे काय करता आहात तुम्ही. तुम्ही माझ्या पेक्षा वयाने ,मानाने आणि अनुभवाने देखील खूप मोठ्या आहात त्यामुळे माझी माफी मागुन मला असं लाजवु नका. फक्त तुमचा स्नेह आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या सोबत ठेवा. "  

अवंती स्वतःचा अपमान सहन करेल , पण स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी निर्मलेला प्रतिउत्तर करणार नाही ही गोष्ट रमा आजींच्या  लक्षात आली. आता अवंतीसाठी आपणचं निर्मलेची कानउघाडणी करायला हवी असं रमाआजींनी मनोमन ठरवलं म्हणूनच समजावणीच्या सुरात त्या अवंतीला म्हणाल्या..

" माझा आशीर्वाद नेहमीच असेल अवंती बाळा तुझ्या सोबत पण तुला अजून खूप काही सांगायचं आहे बाळा मला. निर्मलाचं जेव्हा एकनाथरावांसोबत लग्न झालं तेव्हा निर्मलेच्या माहेरची म्हणजे आमची परिस्थिती खूप बेताची होती. दोन वेळ खायला मिळायला देखील अवघड होतं आम्हाला. त्या उलट एकनाथरावांची परिस्थिती अतिशय सधन होती पण एकनाथरावांच्या आईबाबांनी आम्हाला प्रत्येक क्षणी साथ दिली. आम्हाला ,आमच्या अडचणींना समजून घेतलं. आमच्या परिस्थितीवरून निर्मलेला ते कधीही अपशब्द बोलले नाहीत. "  

"अग , निर्मलेचे लग्न झालं तेव्हा तिचं फक्त दहावी  पर्यन्त शिक्षण झालं होतं. एकनाथरावांच्या आईबाबांनी निर्मलेला पुढे शिकवलं. तिचं ग्रॅज्युएशन तिने लग्नानंतर पूर्ण केलं. तिला चांगली नोकरी मिळाली. तेव्हा निर्मलेला करियरवर लक्ष केंद्रित करता यावं म्हणून त्यांनी आदिराजचा सांभाळ केला. मुलगा आणि सून दोघांमध्ये त्यांनी कधीच फरक केला नाही. निर्मला..तिने मात्र काय केलू ..? चार पैसे कमावले तर डोक्यात हवा गेली तिच्या. त्यामुळेच तिच्या समोर असलेल्या तुझ्या सारख्या हिऱ्याची पारख नाहीये तिला. "  

" अवंती , मला एक सांग. निर्मला तुझ्या सोबत वागते आहे तसं जर एकनाथरावांचे आईबाबा तिच्यासोबत वागले असते तर सहन केलं असतं का तिने..? मला नाही वाटत तिच्या माहेरचा, आमचा अपमान ती सहन करू शकली असती. "

" अवंती , मान्य आहे लग्न करून तु तुझ्या सासरी आली आहेस पण आजवर तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी जे कष्ट केलेत. त्यांनी तुला शिकवलं, वाढवलं. चांगले संस्कार दिलेत. त्यांचं काहीच मोल नाही का ? मी आदिराजची आजी किंवा निर्मलेची आई म्हणून बोलत नाहीये तर एक स्त्री म्हणून तुला विचारते आहे. तुझ्या लग्नाला दोन महिने झाले तरीही तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या सासऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून तु निर्मलाचं बोलणं सहन करते आहे. पण ज्या आईवडिलांनी तुला जन्म दिला ,ज्या आईने तुला पोटात नऊ महिने वाढवलं , ज्या बाबांनी तुला तळहातांच्या फोडाप्रमाणे पंचवीस वर्ष सांभाळलं ,तुला जपलं. त्यांचा अपमान कसा सहन करू शकतेस तु अवंती..?? तुझ्या आईबाबांचा ,तुझ्या माहेरचा मान तुलाच जपायला हवा. "  

रमा आजींना अवंतीचा स्वभाव माहिती होता.ती कधीच निर्मलाताईंच्या या वाईट वागण्याचा प्रतिकार करू शकणार नाही, हे देखील त्यांना माहित होते. म्हणूनच रमाआजीनी निर्मलाताईंना चांगलाच धडा शिकवायचा ठरवला. त्या अवंतीला म्हणाल्या..

" अवंती बाळा , तु निर्मलेला काही बोलू शकत नाही , हे माहिती आहे मला पण मला मात्र तुझ्या चांगुलपणाची किंमत कळवून द्यायची आहे निर्मलेला. माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे.पण या सगळ्यात मला तुझी साथ हवी आहे आणि हो या सगळ्यात तुला लगेचचं निर्मलेला काहीच बोलायची गरज नाही. त्यामुळे तुझं काम सोपं होईल. आता तरी देशील ना मला साथ ..? "

रमा आजींनी स्वतःचा हात पुढे करत अवंतीला विचारलं. आपल्या आजेसासूबाईंचं आपल्यावरील प्रेम पाहून अवंतीला भरून आलं. स्वतःचा हात रमा आजींच्या हातात देत अवंती म्हणाली..


" हो आजी. मी तुमची नक्कीच साथ देईल. आता यापुढे माझ्या आईबाबांची चुकी नसतांना मी त्यांचा अपमान सहन करणार नाही कारण तुमच्या सांगण्याप्रमाणे माझ्या माहेरचा मान मलाच जपायला हवा आणि मी तो जपणार. "

अवंती लग्न करून घरात आल्यापासून निर्मलाताईंनी घरकामाला हात लावणंच बंद केल होतं. त्यामुळे रमा आजींना सगळ्यात पहिले निर्मला ताईंना अवंतीच्या कष्टाची जाणीव करू द्यायची होती म्हणून त्यांनी एका मस्त प्लॅन बनवला आणि त्यात एकनाथराव आणि आदिराजला पण सामील करून घेतलं.

दोन दिवस निघून गेले. त्यानंतरच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं नाही, झोपायचं नाटक करायचं, असं रमा आजींनी अवंतीला सांगून ठेवलं. अवंती पण रमा आजींच्या सांगण्यावरून झोपून राहिली.

सकाळचे साडे आठ वाजले. निर्मलाताई झोपेतून उठून फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसल्या. आताशा त्यांनी अवंती सगळं काही पाहते म्हणून उशिरा उठायला सुरुवात केली होती. निर्मलाताईंच्या मागोमाग आदिराज पण झोपेतून उठून फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसला आणि निर्मलाताईंना म्हणाला..

" आई , चहा आणि नाश्ता आण ना ग पटकन. मला ऑफिसला जायला उशीर होतो आहे."

" मी नाश्ता बनवू..? का तुझी लाडकी बायको नाही बनवणार का नाश्ता..? "

निर्मलाताई वैतागून आदिराजला म्हणाल्या.

" अग आई , सॉरी तुला सांगायलाच विसरलो. सध्या काही दिवस ती अगदी महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करते आहे. रात्री उशीरा पर्यंत काम सुरु होतं तिचं म्हणुन झोपली आहे ती. त्यामुळे तिला सकाळचा नाश्ता,जेवण बनवणं जमणार नाही ग. त्यामुळे प्लीज आता काही दिवस ही सगळी कामांची जबाबदारी तुलाच सांभाळून घ्यावी लागेल."

तितक्यात एकनाथराव पण वॉक करून आले.

" निर्मला, माझं गरम पाणी आणि औषधं घेऊन ये. मला लवकर ऑफिसला जायचं आहे आज. " 

एकनाथरावांची ऑर्डर पाहून निर्मलाताईं वैतागल्या आणि चिडून किचन मध्ये नाश्ता बनवण्यासाठी निघून गेल्या. अवंती हे सगळं लपून पाहत होती. निर्मलाताईंना वैतागलेलं पाहून ती घाबरली. ती किचन मध्ये जायला निघणार तितक्यात रमा आजी तिथे आल्या आणि त्यांनी खुणेनेच अवंतीला रूम मध्ये थांबायला सांगितलं.

निर्मलाताईंनी चिडचिड करत करत नाश्ता बनवला. जेवण बनवण्याच्या तयारीला सुरुवात केली. त्यात निर्मलाताई खूप थकल्या. खरंतर निर्मलाताईंना या कामात मदत करण्यासाठी आधी एक मदतनीस मावशी होत्या पण अवंतीला त्रास व्हायला हवा म्हणून त्यांनी मदतनीस मावशींना कामावरून काढून टाकलं होतं. त्यामुळे एकटीला काम करतांना त्यांची खूपच ओढाताण होत होती. रमा आजी हे सगळं पाहत होत्या. हळूहळू का असेना आपण निर्मलेला अवंतीच्या चांगुलपणाची जाणीव करवून देऊ याची त्यांना खात्री वाटत होती.

क्रमश :

निर्मलाताईंचा अवंतीवरचा राग दूर करण्यासाठी रमा आजी काय युक्ती करतील? निर्मलाताई सून म्हणून अवंतीला स्वीकारतील का? देशमुखांच्या घरातील आनंद पुन्हा परत आणण्यासाठी रमा आजी करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल का?रमाआजी निर्मलाताईंना त्यांच्या चुकीची जाणीव करून देऊ शकतील का? निर्मलाताई आणि अवंतीच्या नात्याचं भविष्य काय असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा पुढचा अंतिम भाग वाचायला मात्र विसरू नका.

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - Pinterest/Google 




 




Post a Comment

0 Comments